नमस्कार शेतकरी बंधूंनो आता पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शासकीय अनुदानावर बियाणे हवे असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या कारण बियाणे अनुदान योजना 2023 ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. तरी या योजनेचा भरपूर शेतकर्यांनी फायदा घ्यावा. चला तर मित्रांनो आता आपण बघूया या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करतात.
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ?
महाडीबीटी पोर्टल वर खत बियाणे औषधे याचा अर्ज करत असताना लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
1) 7/12 उतार
2) 8- अ उतारा
3) आधार कार्ड
4) बँक पासबुक
महाडीबीटी Maha dbt राज्य शासनाच्या या पोर्टलवर शेतकरी योजना शीर्षका या अंतर्गत बी -बियाणे, औषधे आणि खते इत्यादी घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा हि उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण यामध्ये तुर, मुग,सोयाबीन,मका ,कापुस, उडीद, खरीप ज्वारी या बियाणे करीत तुम्ही अर्ज हे करू शकता. या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची/ लाभार्थ्यांची निवड प्राप्त सर्व अर्जा मधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याकजी निवड हि करण्यात येईल. या लॉटरी पद्धतीद्वारे ज्या शेतकरी बंधूंची निवड होईल त्याच लाभार्थ्याला अनुदाना स्वरूपावर बी- बियाणे मिळेल. अर्ज ज्या पिकाच्या बियाण्यासाठी केला आहे, उपलब्धतेनुसार त्याच पिकाचे बियाणे व वाण मिळेल.
▶बियाण्यास १००% अनुदान हे पिक प्रात्यक्षिका करिता राहील .
▶कमाल ५०% मर्यादेपर्यंत प्रमाणित बियाण्याकरिता अनुदान दिले जाईल.
*जर तुम्हाला शासकीय योजना विषयी अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईट भेट द्या*.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा