गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना



प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

या योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेसंबंधी असं म्हटलं जातंय की, गुरु-शिष्य परंपरेला चालना देणे आणि कारागिरांच्या कौटुंबिक-आधारित पारंपारिक व्यवसायाला बळ मिळेल हा यामागचा उद्देश आहे.

शिवाय कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे. तसेच या कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक विक्री साखळीशी जोडणे ही या योजनेची इतर उद्दिष्टे आहेत.

या योजनेअंतर्गत लोकांना काय मिळणार?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि हस्तकला कामगारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळेल.

तसेच, पहिल्या टप्प्यात 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये 5% व्याजासह मिळतील.

कोणते व्यवसायिक लाभ मिळू शकतात?

संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना या योजनेत सामावून घेतले जाईल.

सुरुवातीला खालील अठरा पारंपरिक व्यवसायांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • सुतार
  • सोनार
  • कुंभार
  • शिल्पकार/मूर्तिकार
  • चांभार
  • गवंडी
  • विणकर/चटई/झाडू बनविणारे, दोऱ्या वळणारे /बेलदार
  • पारंपारिक खेळणी बनविणारे
  • नाभिक
  • हार-तुरे तयार करणारे
  • धोबी
  • शिंपी
  • मासेमारीचे जाळे बनवणारा
  • होड्या बांधणारे
  • चिलखत तयार करणारा
  • लोहार
  • कुलूप तयार करणारे
  • कुऱ्हाड आणि इतर लोखंडी हत्यार बनविणारे

प्रमाणपत्र, कर्ज याशिवाय या योजनेत आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेविषयी आणखीन माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, या योजनेअंतर्गत कारागिरांना प्रशिक्षण दिले जाई.

ही प्रशिक्षणे मूलभूत प्रशिक्षण आणि प्रगत प्रशिक्षण अशा दोन स्वरूपात दिली जातील.

प्रशिक्षणार्थींना दररोज 500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. तसेच, औद्योगिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये आर्थिक मदत दिली जाईल.

या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी पाच लाख कुटुंबांना लाभ मिळणार असून पाच वर्षांत एकूण 30 लाख कुटुंब या योजनेचा लाभ घेतील.




👉कौशल्य विकास : या योजनेअंतर्गत कारागिरांना मूलभूत आणि प्रगत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण सरकारी आणि खाजगी संस्थांद्वारे प्रदान केले जाईल.

👉आर्थिक सहाय्य : या योजनेअंतर्गत पात्र कारागिरांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 5% व्याजदराने दिले जाईल. हे कर्ज कारागिरांना त्यांच्या व्यवसायाची सुरुवात किंवा विस्तार करण्यासाठी वापरता येईल.

👉प्रोत्साहनपर अर्थसहाय्य : या योजनेअंतर्गत पात्र कारागिरांना त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी 15,000 रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाईल. हे सहाय्य कारागिरांना नवीन उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा त्यांच्या व्यवसायाच्या प्रमोशनसाठी वापरता येईल.

👉प्रमाणपत्र आणि ओळखपत्र : या योजनेअंतर्गत लाभार्थी कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र त्यांना सरकारी योजना आणि संस्थांमधून लाभ घेण्यास मदत करेल.

“प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” ही भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पारंपारिक उद्योगांचा वाटा वाढवण्यासाठी आणि कारागिरांना सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि त्यांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्यास मदत होईल


“प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” मुख्य उद्दिष्ट

👉पारंपारिक उद्योग आणि कारागिरांना सक्षम करणे

👉भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पारंपारिक उद्योगांचा वाटा वाढवणे

👉कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देणे

👉कारागिरांच्या उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे

👉कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेशी जोडणे

PM विश्वकर्मा योजना कागदपत्रे (Documents)

आधार कार्ड

पॅन कार्ड

मोबाईल क्रमांक

ई-मेल आयडी

पासपोर्ट आकाराचा फोटो

जातीचा दाखला

बँक पासबुक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...