मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज सुरु
| योजनेचे नाव | Mukhyamantri Vayoshri Yojana |
| घोषणा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे |
| योजनेची सुरुवात | ७ मार्च, २०२४ पासून |
| उद्देश | महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे. |
| बजेट रक्कम | ४८० करोड रुपये |
| लाभ | ३ हजार रुपये आर्थिक मदत, उपकरणे खरे |
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना फायदा हा मोठ्या प्रमाणावर होणार आहे, या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदती बरोबरच इतर बरेच लाभ मिळणार आहेत.
- मुख्यमंत्री वयोश्री योजना द्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये DBT द्वारे थेट बँक खात्यात मिळणार आहेत.
- योजनेद्वारे ३००० रुपये, वर्षाला मदत स्वरूपात शासन पैसे देणार आहे.
आर्थिक मदत ही वृध्द लोकांसाठी वेगवेगळे उपकरणे खरेदी करण्यासाठी केली जाणार आहे, जर ज्येष्ठ व्यक्ती अपंग असेल किंवा वयोमान अशक्त असेल तर या उपकरणांचा त्यांना मोठा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत मिळणारे उपकरणे
योजने द्वारे दिली जाणारी ३ हजार रुपयांची आर्थिक मदत हि वृद्धांना उपकरणे खरेदी करण्यासाठी असणार आहे, पैसे DBT द्वारे थेट लाभार्थी जेष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आणि उपकरणासाठी जेवढा खर्च येणार तो पूर्णपणे राज्य सरकार भरणार आहे.
- श्रवणयंत्र
- फोल्डिंग वॉकर
- बॅक सपोर्ट बेल्ट
- व्हील चेयर
- सर्वाइकल कॉलर
- चष्मा
- ट्रायपॉड
- स्टिक व्हीलचेयर
- कमोड खुर्ची
- नि-ब्रेस लंबर बेल्ट
Mukhyamantri Vayoshri Yojana Elegibility Criteria (पात्रता निकष)
महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार जे व्यक्ती पात्र ठरतील त्यांनाच या योजनेत सहभागी होता येणार आहे.
- ज्येष्ठ नागरिकाचे वय हे किमान ६५ वर्षे असावे.
- ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे २ लाखा पेक्षा कमी असावे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
जे अर्जदार वरील पात्रता निकषांची पूर्तता करतील, के त्यांनाच मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये सहभागी होता येईल.
Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra Document List (कागदपत्रे)
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- वयाचा पुरावा
- रेशनकार्ड
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- राष्ट्रीयकृत बँकेची खाते पासबुक प्रत
- स्वयं-घोषणा पत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
वर दिलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करताना सादर करायचे आहेत. कागदपत्रे Soft Copy आणि Hard Copy दोन्ही स्वरूपात असावेत. या कागदपत्रांसोबत शासनाने ओळख निश्चित करण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे देखील लागणार आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना निधी वितरण (अर्थसहाय्य)
मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे वर सांगितल्याप्रमाणे आर्थिक मदत हि केली जाणार आहे. सोबतच पैसे हे थेट बँकेत जमा केले जाणार आहेत.
- थेट वितरण (DBT) प्रणाली द्वारे रु. ३०००/- च्या मर्यादेत निधी वितरण.
- राज्य शासनाद्वारे वृद्धांना उपकरणे खरेदी करण्यासाठी १००% पर्यंत अर्थसहाय्य.

.jpeg)











