गुरुवार, २० एप्रिल, २०२३

ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येणार आहे.

 सरकारनं आर्थिक वर्ष 2022-23 आणि 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमे इतके अनुदान देण्यात येणार आहे



Sugarcane harvester subsidy अटी शर्ती

राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक (Entrepreneur), सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) हे ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानास पात्र राहतील.

Sugarcane harvester subsidy in Maharashtra योजना राज्यस्तरीय असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (RKVY) आर्थिक वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून राबविण्यात येणार आहे.

वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी किंमतीच्या (Tax Invoice नुसार) ४० टक्के अथवा रु.३५.०० लाख (अक्षरी रुपये पस्तीस लाख) यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देय राहील. (जी.एस.टी. रक्कम वगळून)

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना मार्गदर्शक सूचना : –

ऊस तोडणी यंत्र अनुदान लक्षांक :

राज्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता ४५० व सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ४५० असे एकूण ९०० ऊस तोडणी यंत्रांचे लक्षांक साध्य करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या महिला, अनु. जाती व अनु. जमातीच्या लाभार्थ्यांकरीता प्रचलित असलेल्या धोरणानुसार ऊस तोडणी यंत्रांकरीता अनुदान देय राहील.

राज्यासाठी निर्धारीत केलेल्या ऊस तोडणी यंत्रांच्या लक्षांकाच्या व अनुदानासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीस तसेच ऊस तोडणी यंत्राच्या उपलब्धतेच्या अधिन राहूनच अर्जांना मंजूरी दिली जाईल व अनुदान वितरीत केले जाईल.

“ऊस तोडणी यंत्र अनुदान” घटकाच्या लक्षांक व्यवस्थापनाचे कामकाज साखर आयुक्तालय स्तरावरून करण्यात येईल. सदर घटकाकरिता प्राप्त होणारा लक्षांक महा डीबीटी पोर्टलवर भरणेची कार्यवाही साखर आयुक्तालय स्तरावरून करण्यांत येईल.

साखर आयुक्तालयातील सहसंचालक (विकास) हे राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान घटकाचे योजना व्यवस्थापक (Scheme Manager) असतील. तसेच त्यांचेवर ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या घटकाच्या लक्षांकाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असेल.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेंतर्गत क्षेत्रिय स्तरावर स्थानिक वर्तमानपत्रे, कृषि मासिके याबरोबरच आकाशवाणी, दूरदर्शन, भित्तीपत्रके, दृकश्राव्य माध्यमाव्दारे सदर योजनेस व्यापक प्रसिध्दी द्यावी.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया:

इच्छुक अर्जदारांनी महा डीबीटी MAHADBT FARMER SCHEME पोर्टलद्वारे अर्ज करणे :

कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीद्वारे अर्जदारांना त्यांच्या पसंतीच्या ऊस तोडणी यंत्र निवडीचे स्वातंत्र्य देण्यांत आले आहे. या योजनेतंर्गत पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार आहे.

संकेतस्थळ : https://mahadbtmaharashtra.gov.in/Farmer/login/login

हे महा डीबीटी पोर्टलचे mahadbt farmer scheme संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे अर्ज भरावा. स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्जदार अर्ज करू शकतील.

अर्जदार नोंदणी :

अर्जदारांनी प्रथमत: वापरकर्त्याचे नाव (User Name) व संकेत शब्द (Password) तयार करून नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर पुन्हा लॉग-इन करून त्यांचे प्रोफाईल तयार करावे.. अर्जदारांना ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या घटकासाठी “वैयक्तिक लाभार्थी/ उद्योजक” व “शेती सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक संस्था / साखर कारखाने” असे नोंदणी पर्याय उपलब्ध असतील. अर्जदारांनी पर्याय निवडल्यानंतर महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती युजर मॅन्युअलद्वारे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक घटकाने अर्ज कशा पद्धतीने करावा तसेच अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत याबाबतची सविस्तर माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे.

अर्जदाराने वैयक्तिक तपशील भरणे :-

“वैयक्तिक लाभार्थी/ उद्योजक” म्हणून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः त्यांचा वैयक्तिक तपशील भरणे बंधनकारक आहे. या सदरामध्ये तारांकित (1) बाबींची माहिती देणे अनिवार्य आहे. सदर माहिती भरल्यानंतरच लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र अनुदान या घटकासाठी अर्ज करता येईल.

अर्ज शुल्क :

ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना अर्जदारांना रक्कम रु.२०/- अधिक रक्कम रु. ३.६० पैसे वस्तू व सेवाकर असे एकूण रक्कम रू.२३.६० पैसे अर्ज शुल्क म्हणून ऑनलाईन भरावयाचे आहे.

अर्जाची नोंदणी झाल्यानंतर प्राप्त अर्जातून लाभार्थ्याची निवड संगणकीय सोडत (mahadbt farmer scheme Lottery) पद्धतीने केली जाईल व याबाबत लघुसंदेशाद्वारे (SMS) संबंधितास कागदपत्रे अपलोड करणाबाबत कळविण्यात येईल.

नोंदणी करताना ७/१२ व ८अ उतारा, आधार कार्ड व आधार लिंक बँक पासबुकची प्रत पोर्टलवर अपलोड करावी. सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांचे बाबतीत नोंदणी प्रमाणपत्र व संस्थेचे नावाचे बँक पासबुकची प्रत पोर्टलवर अपलोड करावी.

कागदपत्रे सादर करणे संगणकीय सोडतीत निवड झालेल्या अर्जदारांना ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या बाबीसाठी त्यांनी महा डीबीटी पोर्टलवर नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने ऊस तोडणी यंत्राचे दरपत्रक (Quotation) व केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या संस्थेचा वैध तपासणी प्रमाणपत्र / अहवाल ही कागदपत्रे विहित मुदतीत अपलोड करावीत. जे अर्जदार विहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड करणार नाहीत त्यांची निवड रद्द होईल. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन केली असल्यामुळे संगणकीय सोडतीनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांशिवाय इतर कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करू नयेत.

प्राप्त अर्ज व त्यासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्याकरिता महा डीबीटी पोर्टलमध्ये साखर आयुक्तालय स्तरावर कक्ष (Desk) निर्माण केलेला आहे.

छाननीमधे पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती पत्र निर्गमित करण्यात येईल. सदर पूर्वसंमती पत्रे अर्जदारांना त्यांच्या महा डीबीटी पोर्टलवरील खात्यामध्ये (Login) उपलब्ध होतील.

पूर्वसंमती पत्र मिळालेल्या लाभार्थ्यांनी पूर्वसंमती पत्र दिलेल्या दिनांकापासून तीन (३) महिन्याचे आत यंत्र खरेदीची कार्यवाही पूर्ण करावी. यंत्र खरेदी केल्यानंतर अनुदान मागणी करिता ऊस तोडणी यंत्र खरेदीचे बील (Tax Invoice), परिवहन विभागाकडील नोंदणी प्रमाणपत्र / नोंदणी करिता अर्ज केल्याची पावती ही कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत. जर लाभार्थीने पूर्वसंमती मिळाल्याच्या दिनांक पासून तीन महिन्यात यंत्र खरेदी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांची निवड रद्द करणेत येईल.

ऊस तोडणी यंत्राची भौगोलिक स्थान निश्चितीची (Geotagging ) (जेथे कार्यरत असेल तेथे) प्रत्यक्ष मोका तपासणी प्रादेशिक सहसंचालक (साखर) त्यांचे अधिनस्त अधिकारी यांचे मार्फत करतील व त्यानंतर परिशिष्ट – ३ प्रमाणे मोका तपासणी प्रमाणपत्र संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी अपलोड करावे. तद्नंतर साखर आयुक्त कार्यालयाकडून लाभार्थीना अनुदान वितरणाची कार्यवाही करणेत येईल.

विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्य स्तरावरून राज्य नोडल यंत्रणेच्या बँक खात्यातून कृषि विभागामार्फत केंद्रीय पद्धतीने लाभार्थीच्या कर्ज खात्यावर अनुदान रक्कम वितरीत करतील.

लाभार्थी निवडीची एकत्रित संगणकीय सोडत :

महा डीबीटी पोर्टलवर कृषि विभागाने विकसीत केलेल्या प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान योजनेचा लाभ देण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडील क्रमांक: ०९१९ / प्र.क्र. २२१ / १४- अ, दि.०४/११/२०२० मधील परिपत्रकीय सूचनांनुसार कार्यवाही केली जाईल. त्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत ‘ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ देण्यांत येईल. महा डीबीटी पोर्टलद्वारे या योजनेसाठी राज्य स्तरावर एकत्रित संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीत प्रत्येक निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी पोर्टलवर प्रवर्गनिहाय प्रसिध्द करण्यात येईल.

संगणकीय सोडतीत निवड झालेल्या अर्जदारांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) त्यांचे निवडीबाबत अवगत करण्यात येईल. सदर सोडतीत ज्या शेतकऱ्यांची निवड झाली नसेल त्यांना प्रतिक्षा यादीत ठेवण्यात येईल. प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची संबंधीत आर्थिक वर्षांत निवड न झाल्यास ते त्या आर्थिक वर्षात प्रतिक्षा यादीत राहतील आणि ते लाभार्थी पुढील वर्षी देखील (योजना कालावधीत ) त्याच अर्जाच्या आधारे निवडीस पात्र राहतील.

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता सनियंत्रण अधिकाऱ्यांनी खाली नेमून दिलेल्या प्रमाणात तपासणी करावी व तपासणी अहवाल सादर करावा. योजनेचे संनियंत्रण साखर आयुक्त हे करीत असल्याने सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही तक्रारी / अनियमितता आढळल्यास याबाबत साखर आयुक्त हे जबाबदार राहतील.

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

सौर प्रकल्पासाठी जमीन भाड्याने द्या आणि कमवा लाखो रुपये

  

सौर प्रकल्पासाठी जमीन भाड्याने द्या आणि कमवा लाखो रुपये





सौर कृषि वाहिनी योजनेची उद्दिष्टे

  • सोलर वीज प्रकल्प उभारून 🥹शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे.

  • शेतीप्रधान क्षेत्रांमध्ये असलेल्या उपकेन्द्राच्या ५ किमी परीक्षेत्रामध्ये २ ते १० मेगावॉट क्षमतेचे सोलर वीज प्रकल्प उभार
  • जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जास्त ५० एकर असावे.

सौर कृषि वाहिनी योजनेची ठळक वैशिष्ठे

  • सोलर वीज प्रकल्प उभारणीसाठी महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्रांची यादी उपलब्ध क्षमतेसहित पोर्टलवर उपलब्ध

  • शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अतिरिक्त जमीन असल्यास सदर प्रकल्पासाठी भाडेतत्वावर देण्याची सुविधा

  • महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सरकारी जागेसाठी ३० वर्षासाठी रु. १/- भाडे राहील.

  • खाजगी जमीन भाडेतत्वावर दिल्यास वार्षिक प्रती एकर रु. ३०,०००/- भाडे राहील.

  • आवश्यक कागदपत्रे :

    • ७/१२ उतारा प्रत
    • आधार कार्ड प्रत
    • बँकेची रद्द केलेली चेकबूक प्रत/पासबुक प्रत
    • ८ अ उतारा
    • फेरफार उतारा
    • अधिकृत पत्र

  • जागेसाठी कोण अर्ज करू शकतात

    • स्वतः शेतकरी

    • शेतकऱ्याचा गट

    • सहकारी संस्था

    • वॉटर युसर असोसिएशन

    • साखर कारखाने

    • जल उपसा केंद्र

    • ग्रामपंचायत

    • उद्योग

जागेची पात्रता

  • जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जास्त ५० एकर असावे.

  • महावितरण च्या ३३/११ K .V




  • सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक

    https://chat.whatsapp.com/L2Ucb7TRzNJ6gNWb6AmEx6


  • ´ÖÆüÖ

    SR NO

    DISTRICT

    TALUKA

    SUBDIVISION NAME

    SUBSTATION NAME

    SUBSTATION

    NUMBER

    INSTALLED

    CAPACITY

    SPARE CAPACITY

    AVAILABLE

    718

    DHULE

    SINDKHEDE

    DONDAICHA

    33/11KV MALPUR SUBSTATION

    094075

    5

    2.92

    719

    DHULE

    SINDKHEDE

    DONDAICHA

    33/11KV VIKHARAN(DEVACHE) SUBS

    094070

    5

    5

    720

    DHULE

    SINDKHEDE

    DONDAICHA

    NIMGUL 33/11 KV S/S

    094047

    5

    3.53

     

    SR NO

    DISTRICT

    TALUKA

    SUBDIVISION NAME

    SUBSTATION NAME

    SUBSTATION

    NUMBER

    INSTALLED

    CAPACITY

    SPARE CAPACITY

    AVAILABLE

    721

    DHULE

    SINDKHEDE

    NARDANA

    33/11 KV SUB BABHALE

    094045

    5

    1

    722

    DHULE

    SINDKHEDE

    NARDANA

    33/11 KV SUB BETAWAD

    094057

    5

    2.08

    723

    DHULE

    SINDKHEDE

    NARDANA

    33/11 KV SUB NARDANA

    094001

    10

    3.04

    724

    DHULE

    SINDKHEDE

    NARDANA

    33/11 KV SUB SUKWAD

    094019

    10

    2.56

    725

    DHULE

    SINDKHEDE

    SHINDKHEDA

    33/11 KV BAMHANE SUB-STATION

    094024

    10

    4.04

    726

    DHULE

    SINDKHEDE

    SHINDKHEDA

    33/11KV CHIMTHANE SUB-STATION

    094017

    10

    5.51

    727

    DHULE

    SINDKHEDE

    SHINDKHEDA

    33/11KV LANGHANE SUB-STATION

    094071

    5

    2.48

    728

    DHULE

    SINDKHEDE

    SHINDKHEDA

    33/11KV SAWAI MUKTI SUB-STATIO

    094051

    10

    4.33

    729

    DHULE

    SINDKHEDE

    SHINDKHEDA

    33/11KV SHINDKHEDA SUB-STATION

    094005

    20

    6.66

    ×¾ÖŸÖ¸üÞÖ ÛÓú¯Ö®ÖßÃÖ ³ÖÖ›êŸÖŸ¾ÖÖ¾Ö¸ü ¤êüÞµÖÖŸÖ µÖêÞÖÖ·µÖÖ 

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...