सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

धुळे पोलिस पाटीलच्या 129 जागांसाठी भरती सुरु

 

धुळे पोलिस पाटीलच्या 129 जागांसाठी भरती सुरु



Police Patil Education Qualification [ शैक्षणिक पात्रता ]

  • अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी पास असावा व त्याने अधिकृत अशा शासनमान्य विद्यापीठातून शिक्षण घेतले असल्यास तो उमेदवार पोलीस पाटील या पदासाठी अर्ज करू शकत


Police Patil Age Limit [ पोलीस पाटील पदासाठी वयाची अट ]

  • पोलीस पाटील या पदासाठी तुमचे वय हे कमीत कमी 25 वर्षे इतके असावे. जास्तीत जास्त वय 45 वर्ष.
  • [ SC/ST- उमेदवारांना :- 5 वर्ष सुट ]
  • [ OBC उमेदवारांना :- 3 वर्षे सुट ]

Police Patil Selection Process [ पोलीस पाटील पदाची निवड पद्धत ]

मित्रांनो पोलीस पाटील पदाची निवड पद्धत महाराष्ट्र पोलीस खात्यामार्फत होते.
परीक्षेसाठी उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागते.
मुलाखत.
त्यानंतर उमेदवाराची कौशल्य चाचणी होते.

Police Patil Salary [पोलीस पाटील पगार]

सुरुवातीच्या काळात तुम्हाला येथे 9500/- ते 34,000/- दर महिना वेतन भेटू शकते.

Police Patil Bharti Marathi Information [पोलीस पाटील पदाबद्दल थोडक्यात माहिती]

  • मित्रांनो हे जे पद आहे हे गाव पातळीवर काम करणारे खूप जुनं पद आहे. शिवरायांच्या काळात देखील गाव पातळीवर हे पद अस्तित्वात होते या पदाचे काम गावचा कारभार कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबर सामाजिक घटकांमधील तेढ सोडवण्याचा हे आहे.
  • त्यानंतर इंग्रजांच्या काळात पोलीस पाटील या पदाकडे महसूल कायदा व सुव्यवस्था यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य पोलीस पाटील करत असे.
  • जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांनी नेमलेल्या काही वंशपरंपराग पदे रद्द करण्यात आली. व त्यानंतर 17 डिसेंबर 1967 रोजी पुन्हा एकदा पोलीस पाटील या पदाला कायदेशीर मान्यता मिळाली.
  • व आता या पदाचे काम गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे व सामाजिक घटकांमधील तेढ सोडवणे इत्यादी.

Police Patil Required Document List [ महत्त्वाची कागदपत्र ]

  • शालांतर शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी दहावी बारावीच्या कागदपत्रांची ओरिजनल प्रत
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म तारखेचा दाखला यांची ओरिजिनल प्रत
  • उमेदवार हा संबंधित गावाचा स्थानिक रहिवासी असल्याचा तहसीलदार यांचे अधिवास प्रमाणपत्र तसेच ग्रामपंचायत कडून घर कर आकारणी पत्र किंवा शेतजमीन असलेला सातबारा उतारा व आठ अ उतारा इत्यादी लागतील.
  • जर उमेदवार आरक्षित वर्गातील असेल तर संबंधित उमेदवाराने जातीचे प्रमाणपत्र ची सत्यप्रत जोडणे.
  • कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे तलाठी ग्रामसेवक यांचा दाखला.
  • दोन पासपोर्ट साईज फोटो जे की तुम्ही अलीकडील काही काळात काढले असावेत.
  • कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात दंड अगर शिक्षा न झाली असल्याचे पोलीस पाटील पदासाठी चारित्र्य व वर्तणूक चांगले असल्याचे तेथील संबंधित पोलीस निरीक्षक सह पोलीस निरीक्षक यांचा दाखला

How To Apply For Dhule Police Patil Jobs 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • ऑनलाईन अर्ज 04 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

ड्रोनसाठी 5 लाखांपर्यंत अनुदान

 

ड्रोनसाठी 5 लाखांपर्यंत 
अनुदान 



Drone Subsidy Maharashtra

या चाचण्यांचे निष्कर्ष पाहून ड्रोनसाठी थेट अनुदान देण्याचा केंद्राने निर्णय घेतला व त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अभियानातील निधी वापरास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधरांनाही ड्रोनच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा होत असलेला प्रयत्न हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे.

त्यामुळे कृषी पदवीधारकांना पाच लाखांपर्यंत, तर केवळ  दहावी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला आता चार लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

ड्रोन अनुदान योजना

•ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके कोण घेऊ शकते? : कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी उत्पादन संस्था व कृषी विद्यापीठे

•विद्यापीठे व सरकारी संस्थांना किती अनुदान मिळेल? :  ड्रोन खरेदीच्या १०० टक्के म्हणजे १० लाखांपर्यंत. शेतकरी उत्पादन संस्थांना किती अनुदान मिळेल? : ड्रोन खरेदीच्या ७५ टक्के म्हणजे ७.५० लाखांपर्यंत.

• संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास कितीअर्थसाह्य मिळेल? :  प्रतिहेक्टरी ६ हजार रुपयांपर्यंत.

• संस्थांनी ड्रोन प्रात्यक्षिके राबविल्यास किती अर्थसाह्य मिळेल? : प्रतिहेक्टरी ३ हजार रुपयांपर्यंत. ‘Drone Subsidy Maharashtra’

• अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदीसाठी किती अनुदान मिळेल? : ड्रोन किमतीच्या ४० टक्के म्हणजे ४ लाखांपर्यंत.

• कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास किती अनुदान मिळेल? : ड्रोन किमतीच्या ५० टक्के म्हणजे ५ लाखांपर्यंत.

• ग्रामीण नव उद्योजकाला किती अनुदान मिळेल? : चार लाखांपर्यंत. मात्र तो दहावी उत्तीर्ण, तसेच मान्यताप्राप्त रिमोट ट्रेनिंग संस्थेकडून (दूरस्थ प्रशिक्षण संस्था) प्रशिक्षित असावा.

Drone Subsidy Documents

  1. आधार कार्ड/फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत.
  2. खरेदी करावयाच्या ड्रोन चे अधिकृत विक्रेत्याचे दरपत्रक/कोटेशन.
  3. बँक पासबुकाच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत / रद्द केलेला धनादेश.
  4. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र.
  5. संस्थेशी संबंधीत व्यक्तीच्या बॅन्क खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधीकृत केले असल्यास प्राधीकृत केल्याचे पत्र.
  6. अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील (कागदपत्रे जोडण्यात यावी )
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
*या योजनाने साठी  मार्च महिन्यात ऑफलाईन फॉर्म भरावाला लागतो*

 

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

राष्ट्रीय पशुधन मिशन योजना 50 लाख पर्यंत अनुदान

 राष्ट्रीय पशुधन मिशन योजना 50 लाख पर्यंत अनुदान 


Main Features of NLM Scheme 2023

  • शेळी, मेंढीपालन क्षेत्रामध्ये उद्योजक निर्माण करणे.
  • शेळी, मेंढीपालन व्यवसायाचे शाश्वत मॉडेल विकसित करणे.
  • उद्योजकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन तसेच फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजच्या निर्मितीद्वारे असंघटित असलेले शेळी-मेंढीपालन क्षेत्राचे संघटित क्षेत्रामध्ये रूपांतर करणे.
  • शेळी, मेंढीपालन व्यवसायाच्या शास्त्रोक्त संगोपन पद्धतीचा तसेच पोषण आहार आणि रोग प्रतिबंध इत्यादींबाबत जागरूकता निर्माण करणे.
  • बंदिस्त शेळी, मेंढीपालनास प्रोत्साहन.
  • एकात्मिक ग्रामीण शेळी मेंढी उत्पादन साखळी विकसित करण्याकरिता वैयक्तिक उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट तसेच कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना प्रोत्साहन देणे.

NLM Scheme योजनेद्वारे वैयक्तिक व्यक्ती, स्वयंसाह्यता गट (SHG), शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संस्था (FPO), शेतकरी सहकारी संस्था (FCOs), संयुक्त दायित्व गट (JLGs) आणि कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना भांडवली खर्चावर अनुदान देऊन उद्योजकांची निर्मिती.

पात्र व्यक्ती अथवा संस्था १०० + ५, २००+१०, ३००+१५, ४००+२०, ५०० +२५ शेळ्या किंवा मेंढ्यांच्या क्षमतेचा पैदास प्रकल्पाची स्थापना.

दूध, मांस आणि लोकर उत्पादनासाठी उपयुक्त असणाऱ्या उच्च आनुवंशिक जातींच्या शेळ्या, मेंढ्यांचे पैदास प्रकल्पाची स्थापना. यासाठी केंद्र शासनामार्फत प्रकल्पाच्या भांडवली खर्चासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते.

NLM Scheme सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान अर्थसाह्याचे स्वरूप

अर्थसाह्याचे स्वरूप बघितल्यास या योजनेमध्ये खाली दर्शविल्यानुसार दोन समान हप्त्यांमध्ये प्रकल्पाच्या भांडवली खर्चावर ५० टक्के अनुदान देण्यात येते.

१०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + ५ (बोकड अथवा नर मेंढे ) १० लाख
२०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + १० (बोकड अथवा नर मेंढे) २० लाख
३०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + १५ (बोकड अथवा नर मेंढे) ३० लाख
४०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + २० (बोकड अथवा नर मेंढे) ४० लाख
५०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + २५ (बोकड अथवा नर मेंढे) ५० लाख

NLM योजनेचा लाभ 

  • व्यक्तीगत व्यावसायीक, 
  • स्वयंसहाय्यता बचत गट, 
  • शेतकरी उत्पादक संस्था, 
  • शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, 
  • सहकारी दुध उत्पादक संस्था, 
  • सह जोखिम गट (जेएलजी), 
  • सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट अप ग्रूप इत्यादी घेवू शकतात.

अर्ज सादर करताना 

  1. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), 
  2. पॅनकार्ड, 
  3. आधार कार्ड, 
  4. रहिवाशी पूरावा (मतदान ओळखपत्र, 
  5. वीज देयकाची प्रत), छायाचित्र, 
  6. अनुभवाचे प्रमाणपत्र,
  7. वार्षिक लेखामेळ,
  8. आयकर रिटर्न, 
  9. प्रशिक्षण प्रमाणपत्र, 
  10. जमिनीचे कागदपत्र, 
  11. बॅंकेचा रद्द केलेला धनादेश इत्यादी सादर करणे (अपलोड) अनिवार्य असून,   
  12. जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे.

Rashtriya pashudhan vikas abhiyan  या अभियानाच्या सर्व मार्गदर्शक सुचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in  व केंद्र शासनाच्या  पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://www.nlm.udyammitra.in  यावर उपलब्ध आहे.

योजनेच्या लाभासाठी https://www.nlm.udyammitra.in संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. 

सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान या ‘पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी’ योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त इच्छूक नागरिक किंवा संस्थानी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.














बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती

 महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती



Total: 2109 जागा

पदाचे नाव: कृषी सेवक

अ. क्र.विभाग जागा 
1अमरावती227
2छ. संभाजीनगर196
3कोल्हापूर250
4लातूर170
5नागपूर448
6नाशिक336
7पुणे188
8ठाणे294
Total 2109

शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट: 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल


शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

धुळे जिल्हा परिषद भरती 352 जागा

 धुळे जिल्हा परिषद भरती 352 जागा 



आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) ही पदे भरण्यात येणार आहेत. 


Dhule Saralseva bharti 2023) post details

रिक्त पदाची नावेरिक्त पद संख्या
आरोग्य पर्यवेक्षक०१
आरोग्य सेवक (पुरुष ) ५०% हंगामी कर्मचारी५९
आरोग्य परिचारिका (महिला आरोग्य सेवक )२०६
औषध निर्माण अधिकारी०७
कंत्राटी ग्रामसेवक०५
कनिष्ट अभियंता (स्थापत्य/बांधकाम)०६
कनिष्ट अभियंता(यांत्रिकी )०१
मुख्य सेविका /पर्यवेक्षिका०८
पशुधन पर्यवेक्षक११
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०३
वरिष्ठ सहाय्यक (लेखा )०३
विस्तार अधिकारी०१
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाठबंधारे)४१
एकूण३५२ जागा
  • एकूण जागा : 352
  • पदाचे नाव : विविध पदे
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : धुळे
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची सुरु होण्याची तारीख :  5 ऑगस्ट 2023
  • अर्जाची शेवटची तारीख :  25 ऑगस्ट 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

  •                   शासकीय योजना माहीती whatsapp  ग्रुप लिंक 👇🏼
                                          
  •                                        https://chat.whatsapp.com/CSw4kPDh6PXCftvPXVhcV2

  • वयाची अट - 25 ऑगस्ट 2023 रोजी 

    खुला प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

    राखीव प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे

    दिव्यांग उमेदवार - किमान 18 ते कमाल 45 वर्षे आहे

    टीप - 03 मार्च 2023 अंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार सर्व उमेदवारांना 02 वर्षाची अधिकची शिथिलता देण्यात येणार आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवार साठी 40 , मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 व दिव्यांग उमेदवारांसाठी 47 वर्षे आहे. तसेच पदांच्या संवर्गानुसार काही पदाची वयोमर्यादा ही वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी 
अर्जाची फी -  खुला प्रवर्ग :- 1000₹/-

राखीव प्रवर्ग :- 
(मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) :- 900₹/-


How To Apply For ZP Dhule Maharashtra Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही





गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

पोस्ट ऑफिस मध्ये 1899 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा

 पोस्ट ऑफिस मध्ये 1899 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा



Total: 1899 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पोस्टल असिस्टंट598
2सॉर्टिंग असिस्टंट143
3पोस्टमन585
4मेलगार्ड03
5मल्टी टास्किंग स्टाफ570
Total1899

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 & 2: (i) पदवीधर  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  2. पद क्र.3 & 4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  3. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू   (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयाची अट: 09 डिसेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023 

बुधवार, २६ जुलै, २०२३

या शेतकऱ्यांना PM किसान 14 हप्ता जमा होणार नाही

 या शेतकऱ्यांना PM किसान 14 व्हा हप्ता जमा होणार नाही

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना यंदाच्या आठवड्यात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १४वा हप्ता 27 जुलै रोजी हस्तांतरित होणार असून राजस्थानमधील नागौर येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी १४व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करतील. हे पैसे थेट ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जाणार आहेत. ही रक्कम फक्त त्या शेतकऱ्यांनाच दिली जाईल ज्यांनी ई-केवायसी सारखी इतर कामे केली आहेत

यादीत नाव असूनही पैसे अडकू शकतात

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचे नाव लाभार्थी यादीत पाहू शकता. तुमचे नाव बरोबर असणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही चूक असता कामा नये. खात्यातील नाव आणि अर्जातील नाव बरोबर असावे. यासोबतच खात्यातील नाव आणि आधार कार्डमधील नावही बरोबर असावे. शुद्धलेखनाची चूक असता कामा नये. त्यात काही चूक झाली तर लाभार्थी यादीत नाव आल्यानंतरही पुढील हप्त्याचे २०० रुपये अडकू शकतात. काही चूक झाली असेल तर ती लगेच सुधारावी.

ई-केवायसी करणे महत्त्वाचे

पीएम किसान योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी आता ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ई-केवायसीशिवाय पैसे मिळणे कठीण आहे. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन शेतकरी ओटीपीद्वारे ई-केवायसी करू शकतात. याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुम्ही हे काम करू शकता. अलीकडेच सरकारने ई-केवायसीसाठी मोबाइल ॲप लाँच केले आहे. याद्वारे शेतकरी घरबसल्या ई-केवायसी करू शकतात.



  • खाते NPCI शी लिंक असणे आवश्यक
  • शेतकऱ्यांचे बँक खाते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) शी जोडलेले असणे आवश्यक आहे. खाते लिंक नसेल तर १४व्या हप्त्याचे पैसे मिळणे कठीण होऊ शकते.
  • आधारशी जोडणे अनिवार्य
  • खाते आधारशी लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच पीएम किसान योजनेच्या १४व्या हप्त्याचा लाभ मिळेल.
  • खाते आधारशी जोडले जाते तेव्हा शेतकऱ्यांची अचूक माहिती सरकारपर्यंत पोहोचते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याने सरकारी अनुदानाचे पैसेही वेळेवर खात्यात येऊ लागतात


  • ज्या शेतकऱ्यांना PM किसान मानधन मिळत नसेल अश्या शेतकऱ्यांनी *PM किसान ई kyc व बँक  kyc या दोन्ही ई KYC करू घेणे आवश्यकता आहे.*



  • *PM किसान नवीन नोंद चालु  आहे*


  • *आवश्यक कागदपत्रे*

  • 1)आधार  कार्ड

  • 2)7/12

  • 3)बँक  पुस्तकं

  • 4)रेशन कार्ड



  • *PM किसान च्या आवश्यक साईड*

  • 1) पी एम किसान चा तुमचा तपशील पाहण्यासाठी

  • https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx


  • 2) पी एम किसान इ केवायसी करण्यासाठी

  • https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx


  • 3) पी एम किसान मध्ये आधार वरील नाव दुरुस्ती साठी

  • https://pmkisan.gov.in/EditAadharName_Pub.aspx


  • 4) पी एम किसान नवीन नोंदणीसाठी


  • https://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.असत

  • *पीएम किसान बद्दल काही अडचण असेल तर दर शुक्रवारी तहसील कार्यालय किंवा तुमच्या कृषी सहाय्यक याच्याशी संपर्क साधा*

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...