गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना



प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

या योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेसंबंधी असं म्हटलं जातंय की, गुरु-शिष्य परंपरेला चालना देणे आणि कारागिरांच्या कौटुंबिक-आधारित पारंपारिक व्यवसायाला बळ मिळेल हा यामागचा उद्देश आहे.

शिवाय कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे. तसेच या कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक विक्री साखळीशी जोडणे ही या योजनेची इतर उद्दिष्टे आहेत.

या योजनेअंतर्गत लोकांना काय मिळणार?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि हस्तकला कामगारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळेल.

तसेच, पहिल्या टप्प्यात 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये 5% व्याजासह मिळतील.

कोणते व्यवसायिक लाभ मिळू शकतात?

संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना या योजनेत सामावून घेतले जाईल.

सुरुवातीला खालील अठरा पारंपरिक व्यवसायांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • सुतार
  • सोनार
  • कुंभार
  • शिल्पकार/मूर्तिकार
  • चांभार
  • गवंडी
  • विणकर/चटई/झाडू बनविणारे, दोऱ्या वळणारे /बेलदार
  • पारंपारिक खेळणी बनविणारे
  • नाभिक
  • हार-तुरे तयार करणारे
  • धोबी
  • शिंपी
  • मासेमारीचे जाळे बनवणारा
  • होड्या बांधणारे
  • चिलखत तयार करणारा
  • लोहार
  • कुलूप तयार करणारे
  • कुऱ्हाड आणि इतर लोखंडी हत्यार बनविणारे

प्रमाणपत्र, कर्ज याशिवाय या योजनेत आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेविषयी आणखीन माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, या योजनेअंतर्गत कारागिरांना प्रशिक्षण दिले जाई.

ही प्रशिक्षणे मूलभूत प्रशिक्षण आणि प्रगत प्रशिक्षण अशा दोन स्वरूपात दिली जातील.

प्रशिक्षणार्थींना दररोज 500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. तसेच, औद्योगिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये आर्थिक मदत दिली जाईल.

या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी पाच लाख कुटुंबांना लाभ मिळणार असून पाच वर्षांत एकूण 30 लाख कुटुंब या योजनेचा लाभ घेतील.




👉कौशल्य विकास : या योजनेअंतर्गत कारागिरांना मूलभूत आणि प्रगत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण सरकारी आणि खाजगी संस्थांद्वारे प्रदान केले जाईल.

👉आर्थिक सहाय्य : या योजनेअंतर्गत पात्र कारागिरांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 5% व्याजदराने दिले जाईल. हे कर्ज कारागिरांना त्यांच्या व्यवसायाची सुरुवात किंवा विस्तार करण्यासाठी वापरता येईल.

👉प्रोत्साहनपर अर्थसहाय्य : या योजनेअंतर्गत पात्र कारागिरांना त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी 15,000 रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाईल. हे सहाय्य कारागिरांना नवीन उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा त्यांच्या व्यवसायाच्या प्रमोशनसाठी वापरता येईल.

👉प्रमाणपत्र आणि ओळखपत्र : या योजनेअंतर्गत लाभार्थी कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र त्यांना सरकारी योजना आणि संस्थांमधून लाभ घेण्यास मदत करेल.

“प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” ही भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पारंपारिक उद्योगांचा वाटा वाढवण्यासाठी आणि कारागिरांना सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि त्यांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्यास मदत होईल


“प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” मुख्य उद्दिष्ट

👉पारंपारिक उद्योग आणि कारागिरांना सक्षम करणे

👉भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पारंपारिक उद्योगांचा वाटा वाढवणे

👉कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देणे

👉कारागिरांच्या उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे

👉कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेशी जोडणे

PM विश्वकर्मा योजना कागदपत्रे (Documents)

आधार कार्ड

पॅन कार्ड

मोबाईल क्रमांक

ई-मेल आयडी

पासपोर्ट आकाराचा फोटो

जातीचा दाखला

बँक पासबुक



सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

पीक विम्याची तक्रार कुठे व कशी नोंदवाल

पीक विम्याची तक्रार कुठे व कशी नोंदवाल?, ‘ही’ आहे तक्रार निवारणाची पध्दत



तक्रार करण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या पातळीवरील पुढील मुद्दे तपासावे:


१) सर्वप्रथम शेतकऱ्याने घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीची पूर्वसूचना (इंटिमेशन) दिली आहे की नाही?

२) पूर्वसूचना कशी द्याल? : मोबाईलमधील Crop Insurance App (क्रॉप इन्शुरन्स) ॲपद्वारे https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central&pcampaignid=web_share    

किंवा विमा कंपनीला टोल फ्री क्रमांकाद्वारेफोन नंबर - एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. टोलफ्री क्रमांक 14447




३) ॲप सुरू करण्यात इंटरनेट वा अन्य समस्या असल्यास किंवा टोल फ्री नंबर सतत एंगेज येत असल्यास काय कराल?: तातडीने आपल्या बँकेत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा महसुल विभागाच्या कार्यालयात समक्ष जाऊन पूर्वसूचना द्या. पोच घ्या.


४) बॅंका, कृषी विभाग, महसुल विभागावर काय जबाबदारी आहे?: शेतकऱ्याला मार्गदर्शन करणे व त्याची पूर्वसूचना नोंदवून घेत ती विमा कंपनीला कळविणे.

५) तुमची पूर्वसूचना नोंदवून घेतली जात नाही किंवा तुम्हाला योग्य उत्तर मिळत नसल्यास काय कराल?: अशा स्थितीमध्ये थेट तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समितीकडे जावे. समितीचे अध्यक्ष असलेले तहसीलदार किंवा सदस्य सचिवपदावर असलेले तालुका कृषी अधिकारी तुमच्या तक्रारीची दखल घेतात. उपलब्ध अधिकार व कार्य पद्धतीच्या आधारावर कार्यवाही करतात. लक्षात ठेवा की, या समितीला जे काही तक्रारीच्या स्वरूपात मांडाल, त्याची पोच अवश्य घ्या. पोच अर्जावरचा सही, शिक्का हा तुम्ही दिलेल्या तक्रारीचा अधिकृत पुरावा आहे.


तालुकास्तरीय विमा समितीच्या जबाबदाऱ्या काय आहेत?


१) विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे.

२) योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्याकडून तक्रार आल्यास या तक्रार निवारणासाठी कामकाज करणे.

३) शेतकऱ्याच्या तक्रारीचे निवारण करताना मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करणे.

४) विमा योजनेबाबत आपले सरकार सेवा केंद्रांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

५) तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बॅंकांच्या शाखांद्वारे विमा योजनेबाबत होत असलेल्या सहभागाचे संनियंत्रण (Monitering) करणे.


६) तालुका स्तरावरील या समितीचे अध्यक्षपद तहसीलदाराने तर सदस्य सचिव म्हणून तालुका कृषी अधिकाऱ्याने आपली जबाबदारी पार पाडणे.

७) या समितीकडे विविध लोकप्रतिनिधी किंवा शेतकऱ्यांकडून तक्रारी येऊ शकतात.

८) या तक्रारींचे निराकरण स्थानिक स्तरावर होण्याच्या दृष्टिकोनातून तहसीलदार समिती काम करते.

९) नोंदणीबाबत तक्रारी असल्यास त्याची पडताळणी करणे व आवश्यकतेनुसार जिल्हा किंवा विभागीय समितीला शिफारस करणे, ही जबाबदारी या समितीची आहे.


अशी असते तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समिती

अध्यक्ष – तहसीलदार

सदस्य सचिव – तालुका कृषी अधिकारी

सदस्य – गटविकास अधिकारी (पंचायत समिती), मंडळ कृषी अधिकारी, दोन शेतकरी प्रतिनिधी, अग्रणी बॅंकेचा तालुकास्तरीय प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा प्रतिनिधी, विमा कंपनीचा प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्रचालक किंवा त्याचा प्रतिनिधी


तालुका कृषी अधिकाऱ्याने दोन शेतकरी प्रतिनिधी नेमले का?

-शेतकरी आपल्या पीक विम्यासंबंधी नियम किंवा कामकाजाबाबत शंका, अडचणी असल्यास तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याला संपर्क साधू शकतात.


तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समितीवर नियमानुसार दोन शेतकरी प्रतिनिधी नेमले आहेत का, असल्यास ते कोण आहेत, याची माहिती प्रत्येक विमाधारकाने जाणून घ्यावी.

-तालुका समितीमधील शेतकरी प्रतिनिधींना आपली समस्या समजावून सांगितल्यास, ती सोडविण्यास ते मदत करू शकतात

-या समितीमध्ये बॅंक, विमा कंपनी, आपले सरकार केंद्राचा चालक तसेच मंडळ कृषी अधिकारी देखील असतो. त्यांच्याशी संबंधित समस्या असल्यास तहसीलदार समिती मार्गदर्शन करू शकते.

-तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्याने समितीच्या सर्व सदस्यांची नावे, संपर्क क्रमांक असलेला फलक लावणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित मार्गदर्शन होण्यास मदत मिळते.


अशी असते जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय पीक विमा समिती

-अध्यक्ष – जिल्हाधिकारी

-सदस्य सचिव – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील उपसंचालक

-सदस्य – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच विमा कंपनीचा प्रतिनिधी, जिल्हा अग्रणी बॅंकेचा अधिकारी, नाबार्डचा जिल्हा उपव्यवस्थापक, तीन शेतकरी प्रतिनिधी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ किंवा संशोधन संस्थेचे प्रतिनिधी निमंत्रित सदस्य असतात.


प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्याने स्वतःहून लक्षात किंवा लिहून ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या बाबी:

१) विम्यासंबंधी सर्व कागदपत्रे, पोचपावत्या, पत्रव्यवहार जपून ठेवा.


२) कागदपत्रांचे फोटो, शेतातील पिकांचे फोटो किंवा व्हिडिओ क्लिप काढून ती मोबाईलमध्ये जपून ठेवावी. (त्यासाठी अडचण येत असल्यास घरातील, गावातील शिकलेल्या मंडळींची मदत घ्या.)

३) गावचा कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी हे आपले खरे मार्गदर्शक आहेत. त्यांचे नाव, नंबर, मुख्यालयाची ठिकाणे याची माहिती जपून ठेवा.


४) पीक पंचनामा समितीत कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचे नाव, नंबर जपून ठेवा. त्यांनी शेताला भेटी दिल्यास छायाचित्रे जपून ठेवा.

५) विमा कंपनीचे पर्यवेक्षक, अधिकारी, कंपनीचे पूर्ण नाव, पत्ता, इ-मेल, फोन नंबर जपून ठेवावेत. आपण कोणत्या पिकाचा व कोणत्या कंपनीकडे विमा काढला आहे, ते पाहून त्याच कंपनीशी संपर्क साधावा. इतर कंपनीशी बोलू नये.


६) विमासंबंधी कोणतीही तक्रार तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समितीकडे नेता येते. तेथे समाधान होत नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय विमा तक्रार निवारण समितीचे मार्गदर्शन घ्यावे.

७) विमा योजनेसंबंधी कृषी खाते, महसुल खाते, विमा कंपन्यांद्वारे प्रसारित होणारी माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच, विविध शेतकरी संघटना, अभ्यासक, लोकप्रतिनिधी यांच्याकडून मिळणारी माहिती जपून ठेवावी.


८) विमा कंपन्यांशी शासनाने नेमके काय करार केले आहेत, काय अटी त्यात टाकल्या आहेत हे समजावून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी शेतकरी गटांचे मार्गदर्शक, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या पदाधिकाऱ्यांची मदत घ्यावी. त्यामुळे आपली समस्या व अटी यांचा ताळमेळ बसतो. तक्रार योग्य नसल्यास अकारण मनस्ताप होत नाही.


जिल्हाधिकारी नेमू शकतात तीन शेतकरी प्रतिनिधी

-शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकरी लवकर जाणून घेऊ शकतात. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीवर जास्तीत जास्त तीन शेतकरी प्रतिनिधी नेमण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व कृषी उपसंचालकाला दिले गेले आहेत.


-शेतकऱ्यांनी अशा शेतकरी प्रतिनिधींची नावे जाणून घेतली पाहिजेत.

-जिल्हाधिकाऱ्यांची समिती जिल्हापातळीवर तक्रारींचे निरसन करते. या समितीला एखाद्या तक्रारीवर उपाय काढता येत नसल्यास, ती तक्रार विभागीय समितीकडे पाठवावी लागते.

-केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शेतकरी, बॅंक, विमा कंपनीकडून आलेली तक्रार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय कृषी अधिकाऱ्याने सात दिवसांत सोडवली पाहिजे.


-अशी तक्रार सोडवता येत नसल्यास जिल्हाधिकारी समितीकडे मांडली पाहिजे. या समितीने १५ दिवसांत तक्रार निवारण केले पाहिजे.

-या समितीचा निवाडा मान्य नसल्यास तो या समितीनेच राज्यस्तरीय समितीकडे १५ दिवसात पाठविला पाहिजे.


विभागीय विमा तक्रार निवारण समितीची रचना

-अध्यक्ष – विभागीय आयुक्त

-सदस्य सचिव – कृषी सहसंचालक

-सदस्य – दोन शेतकरी प्रतिनिधी, कृषी विद्यापीठाचा शास्त्रज्ञ, विमा कंपनीचा प्रतिनिधी, तसेच संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी.


विभागीय तक्रार निवारण समितीची भूमिका मोलाची

-तालुका व जिल्हास्तरीय समित्यांकडून अनेक वेळा तक्रारींची निरसन होत नाही. त्यामुळे असे मुद्दे विभागीय समितीकडे येतात.

-मार्गदर्शक सूचना काय आहेत, हे तपासून विभागीय समिती आलेल्या तक्रारीची पडताळणी व अभ्यास करते.

-विभागीय समितीला ही तक्रार सोडवता येत नसल्यास कृषी आयुक्तालयाला प्रकरण सादर केले जाते. म्हणून या समितीचे भूमिका मोलाची आहे.

-विभागीय कृषी सहसंचालकांना संपूर्ण तपशिलासह आपल्या अभिप्रायासह सदर प्रकरण कृषी आयुक्तालयात पाठवावे लागते.

-आयुक्तालयात हे प्रकरण नेमके कोण हाताळतो, हे मात्र नियमावलीत दिलेले नाही. त्यामुळे शेतकरी थेट आयुक्तांना भेटून कैफियत मांडू शकतात.


राज्यस्तरीय समितीत असतात दोन शेतकरी प्रतिनिधी


राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीत दोन शेतकरी प्रतिनिधी नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, हे दोन राज्य सदस्य नेमके कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

-जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार करूनही सात दिवसात चर्चा न झाल्यास किंवा या जिल्हा समितीचा निर्णय मान्य नसल्यास किंवा अनेक जिल्ह्यात हीच समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यास किंवा विमा योजनेतील एखाद्या घटकाने करार भंग केल्यास किंवा प्रकरण २५ लाखापेक्षा अधिक रकमेचे असल्यास ते थेट राज्यपातळीवर चर्चेला आणता येते.

-केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यसमितीत कोणत्याही शेतकऱ्यासाठी किंवा बॅंक, विमा कंपनी, जिल्हा समितीत नसलेली इतर यंत्रणा यांच्या तक्रारीचे निवारण करू शकते.

-या समितीत आवश्यकतेनुसार विद्यापीठे, हवामानशास्त्र विभाग, संशोधन संस्था, वायदेबाजार, सुदूरसंवेदन उपयोगिता केंद्रातील तज्ज्ञांना निमंत्रित करता येते.

-राज्य समितीला तक्रार प्राप्त होताच १५ दिवसांत निकाली काढावी लागते. समितीचा निर्णय वादी-प्रतिवादींना मान्य करावा लागतो.

-राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या सभा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होतात. त्यांच्या मंजुरीनंतरच योजनेचे कामकाज सुरू होते.


अशी आहे राज्यस्तरीय विमा तक्रार निवारण समिती


अध्यक्ष- कृषी सचिव

-सदस्य सचिव – कृषी उपसचिव

-सदस्य – कृषी आयुक्त, सहकार आयुक्त, राज्यस्तरीय बॅंकर्स समितीचा समन्वयक, नाबार्डचा मुख्य सरव्यवस्थापक, दोन शेतकरी प्रतिनिधी, तक्रारप्राप्त जिल्ह्यातील दोन विधिमंडळ सदस्य.

-यंदा पंतप्रधान पीक विमा योजनेचे खरीप व रब्बी हंगामाची नियम, निकष, कार्यपद्धतीचे निर्णयपत्र उपसचिव बा. कि. रासकर यांनी जारी केले आहे.


कृषी आयुक्तांकडे नेमकी काय जबाबदारी आहे

-आयुक्तालयात थेट कृषी आयुक्त हेच पीक विमा योजनेचे राज्यस्तरीय काम हाताळतात. या योजनेचे सनियंत्रण (Monitering) आणि पर्यवेक्षण (Supervision) करणे.

-राज्यात कोणत्या पिकाला विमा लागू करायचा व तो भाग कोणता असेल (म्हणजेच अधिसूचित क्षेत्र) ठरविणे.

-अधिसूचित क्षेत्रात (Notified Area) संबंधित अधिसूचित पिकांची (Notified Crops) कापणी प्रयोग झाल्यानंतर सरासरी उत्पन्नाची आकडेवारी विमा कंपनीला देणे.


-पीक विमा योजनेतील विविध मुद्द्यांबाबत आयुक्त थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवतात.

-गंभीर मुद्द्यांवर आयुक्त संबंधित कंपनी, अधिकारी किंवा यंत्रणेवर कारवाईची शिफारस देखील मंत्रालयाकडे करतात.

-कृषी आयुक्त हे या योजनेचे नियंत्रण अधिकारी (Controlling Officer) देखील आहेत.


विमा योजनेतील काही महत्त्वाच्या तरतुदी

-शेतकऱ्याचा पूर्ण अर्ज भरून देण्याची जबाबदारी बॅंकेवर असते. अर्ज भरता येत नसलेल्या शेतकऱ्याला विम्यापासून वंचित ठेवता येत नाही.


बॅंकेने केलेल्या चुकीमुळे, त्रुटीमुळे, हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला जर देय विमा नुकसान भरपाई मिळाली नाही तर ती देण्याची जबाबदारी बॅंकेची असते.

बॅंकेत विम्याची भरपाई जमा होताच ती शेतकऱ्याच्या खात्यात सात दिवसाच्या आत जमा करावी लागते. तसे न केल्यास बॅंकेला व्याजासह भरपाई जमा करावी लागते.

नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी बॅंकेला नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करावी लागते.

बॅंका शेतकऱ्यांची कामे मोफत करीत नसतात. जमा झालेल्या विमा हप्त्याच्या चार टक्के रक्कम बॅंकांना सेवा शुल्क म्हणून मिळते.

शेतकऱ्यांच्या नावाने काही ‘आपले सरकार’ केंद्र चालक बनावट पावत्या तयार करतात. अशा पावत्या सापडल्यास त्याला शेतकरी जबाबदार नसून, पोलिसांनी केंद्रचालकावर कारवाई करायला हवी.

जनसुविधा केंद्रावर गावपातळी सेवक (व्हिलेज लेव्हल सर्व्हंट) नेमलेला असतो. त्याच्या गैरव्यवहारामुळे, त्रुटीमुळे विम्यापासून वंचित राहण्याची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्याने सर्व कागदपत्रे, पावत्या जपून ठेवाव्यात.

विमा कंपनीच्या प्रतिनिधीने चूक केल्यास मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याला भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते.

शेतकऱ्यांनी कशाची काळजी घेतली पाहिजे

-स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास कर्जदार शेतकऱ्याने ४८ तासात पूर्वसूचना (इंटिमेशन) देणे बंधनकारक आहे.

-स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास बिगर कर्जदार शेतकऱ्याने ७२ तासात इंटिमेशन देणे बंधनकारक आहे.


-एकाच जमिनीवर विविध बॅंकांकडून कर्ज घेणे, जादा विमा प्रस्ताव दाखल करणे असे गैरप्रकार करू नयेत.

-गैरप्रकार सिद्ध झाल्यास कर्जदार शेतकऱ्याला विमा भरपाई मिळत नाहीच; उलट विमा हप्ता रक्कम जप्त होते. प्रशासकीय कारवाई देखील होते.


बिगर कर्जदार शेतकऱ्याने जादा पीक दाखविल्यास दावा हक्क आणि विमा हप्ता रक्कम यावरील हक्क काढून घेतला जातो.

अर्ज भरताना काही चूक झाल्यास शेतकरी पुढील ३० दिवसात लेखी हरकत नोंदवू शकतात.

हवामानाची माहिती फक्त स्कायमेट वेदर व राज्य शासनाचीच वापरली जाते. कृषी विभाग किंवा विमा कंपन्या इतर माहिती ग्राह्य धरत नाहीत.



मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 10949 जागांसाठी मेगा भरती


महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 10949 जागांसाठी मेगा भरती




प्रवेशपत्र निकाल
Grand Total: 10949 जागा (6939+4010)
Down Arrow6939 जागांसाठी भरती  (Group C)  (Click Here)
Down Arrow4010 जागांसाठी भरती (Group-D)  (Click Here) 

Total: 6939 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र.पदाचे नाव पद क्र.पदाचे नाव
1गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल29अभिलेखापाल
2भांडार नि वस्त्रपाल30आरोग्य पर्यवेक्षक
3प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)31वीजतंत्री
4प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी32कुशल कारागिर
5प्रयोगशाळा सहाय्यक33वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
6क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी34कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
7रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी35तंत्रज्ञ (HEMR)
8औषध निर्माण अधिकारी36वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)
9आहारतज्ज्ञ37दंत आरोग्यक
10ECG तंत्रज्ञ38सांख्यिकी अन्वेषक
11दंत यांत्रिकी39कार्यदेशक (फोरमन)
12डायलिसिस तंत्रज्ञ40सेवा अभियंता
13अधिपरिचारिका (शासकीय)41वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
14अधिपरिचारिका (खासगी)42वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक
15दूरध्वनीचालक43उच्चश्रेणी लघुलेखक
16वाहनचालक44निम्नश्रेणी लघुलेखक
17शिंपी45लघुटंकलेखक
18नळकारागीर46क्ष-किरण सहाय्यक
19सुतार47ECG टेक्निशियन
20नेत्र चिकित्सा अधिकारी48हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
21मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती)49आरोग्य निरीक्षक
22भौतिकोपचार तज्ञ50ग्रंथपाल
23व्यवसायोपचार तज्ञ51वीजतंत्री
24समोपदेष्टा52शस्त्रक्रियागृह सहाय्यक
25रासायनिक सहाय्यक53मोल्डरूम तंत्रज्ञ
26अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ54बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
27अवैद्यकीय सहाय्यक55कनिष्ठ पर्यवेक्षक
28वार्डन/गृहपाल

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि  (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
  4. पद क्र.4: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
  5. पद क्र.5:  रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
  6. पद क्र.6: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  7. पद क्र.7: रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  8. पद क्र.8: (i) B.Pharm  (ii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: B.Sc. (Home Science)
  10. पद क्र.10: कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी  किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी+ कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  11. पद क्र.11: 12वी उत्तीर्ण   (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स
  12. पद क्र.12: (i) B.Sc (PCB)   (ii) DMLT
  13. पद क्र.13: GNM डिप्लोमा
  14. पद क्र.14: B.Sc (नर्सिंग)
  15. पद क्र.15: 10वी उत्तीर्ण
  16. पद क्र.16: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) टेलरिंग & कटिंग कोर्स
  18. पद क्र.18: (i) साक्षर  (ii) 02 वर्षे अनुभव
  19. पद क्र.19: ITI (सुतार)
  20. पद क्र.20: क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी
  21. पद क्र.21: MSW
  22. पद क्र.22: 12वी उत्तीर्ण फिजिओथेरपी डिप्लोमा
  23. पद क्र.23: विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी)
  24. पद क्र.24: मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी  (ii) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम  (iii) 05 वर्षे अनुभव
  25. पद क्र.25: M.Sc (बायो-केमिस्ट्री) किंवा B.Sc. (केमिस्ट्री)
  26. पद क्र.26: M.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र)
  27. पद क्र.27: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
  28. पद क्र.28: B.Sc.(Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी
  29. पद क्र.29: (i) पदवीधर. ii) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
  30. पद क्र.30: B.Sc.
  31. पद क्र.31: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव
  32. पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव
  33. पद क्र.33: 1(i) 0वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  34. पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव
  35. पद क्र.35: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  36. पद क्र.36: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव
  37. पद क्र.37: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण
  38. पद क्र.38: B.Sc (Maths & Statistics) किंवा B.Com (Statistics) किंवा B.A (Economics & Statistics)
  39. पद क्र.39: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  40. पद क्र.40: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 03 वर्षे अनुभव
  41. पद क्र.41: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे (iii) अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान    (iii) 05 वर्षे अनुभव
  42. पद क्र.42: MSW
  43. पद क्र.43: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 120 श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
  44. पद क्र.44: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 100 श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
  45. पद क्र.45: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 80  श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
  46. पद क्र.46: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  47. पद क्र.47: न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
  48. पद क्र.48: हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये  पदवी  किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  49. पद क्र.49: (i) B.Sc   (ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
  50. पद क्र.50: लायब्ररी सायन्स डिप्लोमा
  51. पद क्र.51: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र
  52. पद क्र.52: 10 वी उत्तीर्ण
  53. पद क्र.53: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  54. पद क्र.54: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण
  55. पद क्र.55: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Feeखुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

सुलाई शासकीय योजना व नोकरीं व्हाट्सअप ग्रुप खाली लिंक आहे

https://chat.whatsapp.com/CSw4kPDh6PXCftvPXVhcV2

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

धुळे जिल्ह्यातील शिरपूर उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत कोतवाल पदांच्या भरती

धुळे जिल्ह्यातील शिरपूर  उपविभागीय दंडाधिकारी,  कार्यालयांतर्गत  कोतवाल  पदांच्या  भरती  



शिक्षण पात्रता (Qualifications) –

1) उमेदवार कोतवाल पदासाठी किमान 4थी उत्तीर्ण असावा.
2) उमेदवाराला मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

 

पगार | Maharastra Kotwal Bharti 2023 Salary

वेतन – महाराष्ट्र कोतवाल भरती मध्ये पात्र झाल्यानंतर तुम्हाला 15,000/- महिना पगार मिळणार आहे

वयाची अट (Age Limit) – उमेदवाराचे वय 18 ते 40 दरम्यान असावे





धुळे पोलिस पाटीलच्या 129 जागांसाठी भरती सुरु

 

धुळे पोलिस पाटीलच्या 129 जागांसाठी भरती सुरु



Police Patil Education Qualification [ शैक्षणिक पात्रता ]

  • अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी पास असावा व त्याने अधिकृत अशा शासनमान्य विद्यापीठातून शिक्षण घेतले असल्यास तो उमेदवार पोलीस पाटील या पदासाठी अर्ज करू शकत


Police Patil Age Limit [ पोलीस पाटील पदासाठी वयाची अट ]

  • पोलीस पाटील या पदासाठी तुमचे वय हे कमीत कमी 25 वर्षे इतके असावे. जास्तीत जास्त वय 45 वर्ष.
  • [ SC/ST- उमेदवारांना :- 5 वर्ष सुट ]
  • [ OBC उमेदवारांना :- 3 वर्षे सुट ]

Police Patil Selection Process [ पोलीस पाटील पदाची निवड पद्धत ]

मित्रांनो पोलीस पाटील पदाची निवड पद्धत महाराष्ट्र पोलीस खात्यामार्फत होते.
परीक्षेसाठी उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागते.
मुलाखत.
त्यानंतर उमेदवाराची कौशल्य चाचणी होते.

Police Patil Salary [पोलीस पाटील पगार]

सुरुवातीच्या काळात तुम्हाला येथे 9500/- ते 34,000/- दर महिना वेतन भेटू शकते.

Police Patil Bharti Marathi Information [पोलीस पाटील पदाबद्दल थोडक्यात माहिती]

  • मित्रांनो हे जे पद आहे हे गाव पातळीवर काम करणारे खूप जुनं पद आहे. शिवरायांच्या काळात देखील गाव पातळीवर हे पद अस्तित्वात होते या पदाचे काम गावचा कारभार कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबर सामाजिक घटकांमधील तेढ सोडवण्याचा हे आहे.
  • त्यानंतर इंग्रजांच्या काळात पोलीस पाटील या पदाकडे महसूल कायदा व सुव्यवस्था यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य पोलीस पाटील करत असे.
  • जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांनी नेमलेल्या काही वंशपरंपराग पदे रद्द करण्यात आली. व त्यानंतर 17 डिसेंबर 1967 रोजी पुन्हा एकदा पोलीस पाटील या पदाला कायदेशीर मान्यता मिळाली.
  • व आता या पदाचे काम गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे व सामाजिक घटकांमधील तेढ सोडवणे इत्यादी.

Police Patil Required Document List [ महत्त्वाची कागदपत्र ]

  • शालांतर शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी दहावी बारावीच्या कागदपत्रांची ओरिजनल प्रत
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म तारखेचा दाखला यांची ओरिजिनल प्रत
  • उमेदवार हा संबंधित गावाचा स्थानिक रहिवासी असल्याचा तहसीलदार यांचे अधिवास प्रमाणपत्र तसेच ग्रामपंचायत कडून घर कर आकारणी पत्र किंवा शेतजमीन असलेला सातबारा उतारा व आठ अ उतारा इत्यादी लागतील.
  • जर उमेदवार आरक्षित वर्गातील असेल तर संबंधित उमेदवाराने जातीचे प्रमाणपत्र ची सत्यप्रत जोडणे.
  • कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे तलाठी ग्रामसेवक यांचा दाखला.
  • दोन पासपोर्ट साईज फोटो जे की तुम्ही अलीकडील काही काळात काढले असावेत.
  • कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात दंड अगर शिक्षा न झाली असल्याचे पोलीस पाटील पदासाठी चारित्र्य व वर्तणूक चांगले असल्याचे तेथील संबंधित पोलीस निरीक्षक सह पोलीस निरीक्षक यांचा दाखला

How To Apply For Dhule Police Patil Jobs 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • ऑनलाईन अर्ज 04 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

ड्रोनसाठी 5 लाखांपर्यंत अनुदान

 

ड्रोनसाठी 5 लाखांपर्यंत 
अनुदान 



Drone Subsidy Maharashtra

या चाचण्यांचे निष्कर्ष पाहून ड्रोनसाठी थेट अनुदान देण्याचा केंद्राने निर्णय घेतला व त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अभियानातील निधी वापरास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधरांनाही ड्रोनच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा होत असलेला प्रयत्न हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे.

त्यामुळे कृषी पदवीधारकांना पाच लाखांपर्यंत, तर केवळ  दहावी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला आता चार लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

ड्रोन अनुदान योजना

•ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके कोण घेऊ शकते? : कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी उत्पादन संस्था व कृषी विद्यापीठे

•विद्यापीठे व सरकारी संस्थांना किती अनुदान मिळेल? :  ड्रोन खरेदीच्या १०० टक्के म्हणजे १० लाखांपर्यंत. शेतकरी उत्पादन संस्थांना किती अनुदान मिळेल? : ड्रोन खरेदीच्या ७५ टक्के म्हणजे ७.५० लाखांपर्यंत.

• संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास कितीअर्थसाह्य मिळेल? :  प्रतिहेक्टरी ६ हजार रुपयांपर्यंत.

• संस्थांनी ड्रोन प्रात्यक्षिके राबविल्यास किती अर्थसाह्य मिळेल? : प्रतिहेक्टरी ३ हजार रुपयांपर्यंत. ‘Drone Subsidy Maharashtra’

• अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदीसाठी किती अनुदान मिळेल? : ड्रोन किमतीच्या ४० टक्के म्हणजे ४ लाखांपर्यंत.

• कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास किती अनुदान मिळेल? : ड्रोन किमतीच्या ५० टक्के म्हणजे ५ लाखांपर्यंत.

• ग्रामीण नव उद्योजकाला किती अनुदान मिळेल? : चार लाखांपर्यंत. मात्र तो दहावी उत्तीर्ण, तसेच मान्यताप्राप्त रिमोट ट्रेनिंग संस्थेकडून (दूरस्थ प्रशिक्षण संस्था) प्रशिक्षित असावा.

Drone Subsidy Documents

  1. आधार कार्ड/फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत.
  2. खरेदी करावयाच्या ड्रोन चे अधिकृत विक्रेत्याचे दरपत्रक/कोटेशन.
  3. बँक पासबुकाच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत / रद्द केलेला धनादेश.
  4. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र.
  5. संस्थेशी संबंधीत व्यक्तीच्या बॅन्क खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधीकृत केले असल्यास प्राधीकृत केल्याचे पत्र.
  6. अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील (कागदपत्रे जोडण्यात यावी )
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
*या योजनाने साठी  मार्च महिन्यात ऑफलाईन फॉर्म भरावाला लागतो*

 

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...