सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्र



मराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023 मध्ये मोदी आवास घरकुल योजना चा शुभारंभ झालेला आहे, या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना दहा लाखाहून अधिक घरे तीन वर्षात बांधून देण्याचा निश्चय राज्य सरकारने केला आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये याच मोदी आवास घरकुल योजनेबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा

मोदी आवास घरकुल योजना पात्रता (Modi Awas Gharkul Yojana Elegeblity)

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
  • अर्जदार OBC प्रवर्गातील असावा.
  • अर्जदाराची वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
  • प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अर्जदाराला कोणत्याही स्वरूपाची घरकुल मिळालेले असू नये.
  • इतर सरकारी गृहनिर्माण योजनेचा अर्जदार लाभ घेत नसावा.

मोदी आवास घरकुल योजना साठी लागणारे कागदपत्रे (Modi Awas Gharkul Yojana Document list)

  • आधार कार्ड
  • EWS प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

मोदी आवास घरकुल योजना साठी अटी 

1) मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

2) या संदर्भात पंतप्रधान आवास योजनेत अपात्र ठरलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे, या योजनेत पात्र राहूनही इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना लाभ मिळत नव्हता. मात्र आता मोदी आवास योजनेतून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल.

3) इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा जास्त नसावे.

4) कुटुंबीयांच्या मालकीची राज्यात पक्के घर नसावे.

5) गृह कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

6) लाभार्थी हा पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत च्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट नसावा अशी अट अशा अटी पंतप्रधान मोदी आवास योजनेसाठी लागू करण्यात आलेले आहेत.

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती

 

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती



Total: 4497 जागा

 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)

04

2

निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)

19

3

कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)

14

4

वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)

05

5

आरेखक (गट-क)

25

6

सहाय्यक आरेखक (गट-क)

60

7

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)

1528

8

प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)

35

9

अनुरेखक (गट-क)

284

10

दफ्दर कारकुन (गट-क)

430

11

मोजणीदार (गट-क)

758

12

कालवा निरीक्षक (गट-क)

1189

13

सहाय्यक भांडारपाल (गट-क)

138

14

कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क)

08

Total

4497

शैक्षणिक पात्रता: 

1.      पद क्र.1: 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी

2.      पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

3.      पद क्र.3: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी

4.      पद क्र.4: भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा

5.      पद क्र.5: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव

6.      पद क्र.6: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा

7.      पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

8.      पद क्र.8: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी

9.      पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा

10. पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

14. पद क्र.14: (i) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण (ii) ITI भूमापक (सर्वेक्षक)  (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य

वयाची अट: 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023



पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...