बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

वारसाची नोंद, ई – करार नोंदणी, बोजा चढविणे, बोजा कमी करणे, मयताचे नाव कमी करणे आदी ७/१२ दुरुस्ती कामे आता सेतू वरून करून शकतात


खालील कामासाठी महा सेतू वरून अर्ज सादर करता येणार 

.                                



 १) वारसाची नोंद करणे

२) ई – करार नोंदणी. 

३) बोजा चढविणे.                                       

४) बोजा कमी करणे. 

५) मयताचे नाव कमी करणे.                          

६) अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे. 

७) एकत्र कुटुंब कर्ताची नोंद कमी करणे.         

८) विश्वस्तांचे नाव बदलणे 

९) संगणीकृत सात बारा मधील चूक दुरुस्ती करणे.


जाणून घ्या फेरफार म्हणजे काय

जमिनीच्या कामकाजात आपण किती वेळा फेरफार हा शब्द ऐकल असेल. पण बऱ्याच जणांना फेरफार म्हणजे काय किंवा त्याची नोंद कशी करावी या बद्दल माहीत नसण्याची शक्यता असते.

फेरफार म्हणजे गाव नमूना नंबर ६ मधील नोंदवाही ज्याला हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही पण म्हणतात.

या नोंदवाहित जमिनीचे सर्व व्यवहार होतात. हे सर्व व्यवहार ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच तलाठी कार्यालयात जावून होत असत. पण आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

ई- फेरफार प्रणालीद्वारे कोणते काम होणार.

ई- फेरफार प्रणालीमधून केलेल अर्ज तलाठयांना फेरफारमध्ये रूपांतरित करता येणार आहे. त्यामुळे तलाठयांना पुन्हा डाटा एंट्री करायची गरज पडणार नाही त्यामुळे त्यांचे काम खूप सोपे होणार आहे. 

फेरफारची नोंदणी कोण मंजूर करतात असा प्रश्न पडतो. काही जणांना असेही वाटत असेल कि फेरफाराची मंजुरू तलाठी करत असावेत पण असे होत नाही.

तलाठयाकडून फक्त फेरफाराची नोंदणी केली जाते. नोंदणी मंजूर करण्याचे काम मंडळ अधिकारी किंवा सर्कल भाऊसाहेब प्रणालीत करत असतात. सध्या तरी अशीच पद्धत आहे भविष्यामध्ये यामध्ये बदलही होऊ शकतो.

फेरफार कसा नोंदविला जातो

फेरफार नोंदणीसाठी चार स्तंभ आखले जातात. 

  • पहिल्या स्तंभात फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहिला जातो. 
  • दुसऱ्या स्तंभात हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकारचे स्वरूप लिहिले जाते. तचेच यामध्ये व्यवहाराचे स्वरूप, संबंधित खतेदारचे नाव, व्यवहाराचा दिनांक, मोबदला रक्कम अशा बाबींचा पण समावेश असतो. 
  • तिसऱ्या स्तंभात जमिनीच्या व्यवहारासाठी लागणारे गट नंबर किंवा सर्वे नंबर लिहिला जातो. 

चौथा स्तंभात फेरफारबद्दल संबंधीतांना नोटिस देवून, चौकशी करून केलेला फेरफार बरोबर आहे का याची खात्री केले जाते. संबंधित अधिकाऱ्यांचा आदेश या मध्ये देवून पदनाम लिहून स्वाक्षरी करतात.  

सुलाई शासकीय योजना व नोकरीं विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...