सर्व पालकांना महत्वाची सुचना RTE २५% प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु
आवश्यक कागदपत्रे
1. पत्त्याचा पुरावा
2. जन्मतारीख प्रमाणपत्र
3. आधार कार्ड
4. फोटो
5. जात प्रमाणपत्र
6. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
7. अपंगत्व प्रमाणपत्र
या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज
Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2024- 25 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया लकरच सूरू होणारं आहे
महत्वाची सूचना : आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन site स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
| ♦ एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही . | |||
| ♦ एका बालकाचा एका पेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील. जन्म तारीख अथवा मोबाईल भरताना चुकल्यास तो अर्ज Delete करून पुन्हा नवीन अर्ज भरावा. आरटीई 25% प्रवेशासाठी बालकांचे वय | RTE 25% Admission Age Limit अ. क्र इयत्ता किमान वय कमाल वय 1 प्ले ग्रुप/ नर्सरी 3 वर्ष 4 वर्ष 5 महिने 30 दिवस 2 ज्युनिअर केजी 4 वर्ष 5 वर्ष 5 महिने 30 दिवस 3 सिनियर केजी 5 वर्ष 6 वर्ष 5 महिने 30 दिवस 4 इयत्ता 1 ली 6 वर्ष 7 वर्ष 5 महिने 30 दिवस आवश्यक कागदपत्रे (Required Documents List in Marathi) Online अर्ज करतांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीये, मात्र ऑनलाइन अर्ज सादर करतांना पुढील कागदपत्रे जवळ असावीत. 1) रहिवाशी पुरावा 2) जन्म दाखला 3) जातीचा दाखला (वडिलांचा/बालकांचा) 4) उत्पन्न दाखला 5) दिव्यांग मुलांसाठी वैद्याकिय प्रमाणपत्र पुरावा 6) अनाथ असल्यास त्याचा पुरावा. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना 1) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (C) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थ साहित्य शाळा तसेच खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रिया करीता पालकांकडून विहित मुदतीमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत. 2) आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकाला आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. 3) 25% प्रवेश प्रक्रिये करिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी. 4) अर्ज करताना पालकांनी घराचे व शाळेचे अंतर किती आहे याची काळजी घ्यावी. 5) प्रवेश प्रक्रियेच्या विहित मुदतीमध्ये पालकांनी अर्ज करावा, जर का अर्ज करताना इंटरनेट अथवा तांत्रिक अडचणी येत असतील तर अशा परिस्थितीत शक्य तितका लवकर अर्ज करावा. 6) प्रवेश प्रक्रिये दरम्यान काही समस्या असल्यास आरटीई पोर्टल वरती मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे त्यांच्याशी संपर्क करून समस्यांचे निराकरण करण्यात यावे. 7) पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक व खरी माहिती भरावी (उदा. घरचा पत्ता, जन्म तारीख, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, इतर.) 8) ज्या बालकांनी यापूर्वी आर टी 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. 9) यापूर्वी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतलेले निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिक अर्ज भरण्याची निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. 10) पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यात येऊ नयेत. |
.jpeg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा