शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ! आता मागेल त्याला योजना मिळणार

कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ! आता मागेल त्याला योजना मिळणार




शेतकऱ्यांना दिलासा देत कृषी विभागाकडून 25 एप्रिल 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना मागील ती योजना मिळणार आहे.

MahaDBT मागेल त्याला योजना

हा शासनाचा उपक्रम मागेल त्याला योजना या नावाने ओळखला जाणार असून यामध्ये शेततळे, फळबाग, प्लास्टिक अस्तरीकरण, कॉटन श्रेडर, बीबीएफ पेरणी यंत्र, ठिबक, तुषारसह अनेक योजनांचा समावेश असणार आहे.



राज्यातील शेतकऱ्यांना शेती करत असताना विविध नैराश्यातून सामोरे जावे लागते, त्यासाठी त्यांना आर्थिक (Financial) मदत व विविध घटकांचे वाटप महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अनुदान तत्त्वावर शासनाकडून करण्यात येते.

2023-24 साठी 1 हजार कोटी मंजूर

त्या अनुषंगाने आता मागील त्याला शेततळे, फळबाग, प्लास्टिक अस्तरीकरण, कॉटन श्रेडर, बीबीएफ पेरणी यंत्र, ठिबक, तुषार हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्थापित आहे. या विविध योजनांकरता चालू वर्ष 2023-24 साठी 1 हजार कोटी रूपये नियतव्यय प्रस्तावित आहेत.

शासन परिपत्रक सुरू

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेला घटक मागणी केल्यानंतर तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठीचा शासन परिपत्रक सुरू करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना सदर घटक/बाब कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रचलित योजनाअंतर्गत व त्यांच्या ठरविण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार उपलब्ध करून देण्यात येतील, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • मागेल त्याला योजना या अंतर्गत विविध योजनांसाठीचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे (DBT Transfer) वितरित करण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत/घटकांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना यापूर्वी शेतकऱ्यांनी कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नाही याची खात्री करावी.
  • सदर योजनेची कृषी विभागामार्फत प्रचार प्रसिद्धी स्थानिक पातळीवर करण्यात यावी.

आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात-

7/12 व 8 अ,

बँक पास बुक,

आधार कार्ड,

 यंत्राचे कोटेशन,

 परिक्षण अहवाल,

 जातीचा दाखला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...