PM Kisan Samman nidhi योजना पुन्हा सुरु २००० रुपयासाठी करा अर्ज
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर PM-Kisan योजनेसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे
PM Kisan Samman nidhi संदर्भातील अर्ज पक्रिया.
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या २००० रुपयांच्या हफ्त्यासाठी कोणती प्रोसेस असते ते समजवून घेवूयात.
- pm kisan sanman nidhi.gov.in या संकेत स्थळावर शेतकऱ्यांना त्यांची ऑनलाईन नोंदणी करावी लागते.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढावी.
- ऑनलाईन अर्जाची प्रिंट, संबधित कागदपत्रे आणि तलाठी याचा फॉर्म तहसील कार्यालय येथे सादर करावा.
PM किसान नोंदणी साठी कागदपत्रे
- आधार कार्ड (मोबाईल लिंक पाहिजे )
- बँक पासबुक
- 7/12 डिजिटल
- रेशन कार्ड RC नंबर
- मोबाईल
शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती farmer personal details.
वैयक्तिक माहिती या सदरामध्ये शेतकऱ्याने खालीलप्रमाणे माहिती भरणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याने त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, राष्ट्र, नाव, लिंग आणि कॅटेगरी व्यवस्थित टाकावी.
- शेतकऱ्यांचा प्रकार या मध्ये जर शेतकरी लहान वर्गातील असेल म्हणजे १ ते २ हेक्टर जमीन असेल तर small हा पर्याय निवडावा आणि यापेक्षा मोठा असेल तर other हा पर्याय निवडावा.
- शेतकऱ्याने त्यांचे खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेचे नाव, ifcs code, खाते नंबर इत्यादी माहिती व्यवस्थित टाकावी.
- शेतकऱ्याने त्यांचा पूर्ण पत्ता, पोस्टल पिनकोड नंबर, ८ अ वरील खाते नंबर, राशन कार्ड नंबर, जन्मतारीख इत्यादी माहिती व्यवस्थित टाकावी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा