सर्वसमावेशक पिक विमा योजना ३ वर्षासाठी
नैसर्गिक अप्पतीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढत असतात.
पिक विमा काढतांना शेतकऱ्यांना पिक विम्याची काही रक्कम भरावी लागत होती. त्यामुळे आता केवळ १ रुपयात सर्वसमावेशक पिक विमा करता येणार असल्याने शेतकरी बांधवाना याची नक्कीच मदत होणार आहे.
१ रुपयात जरी पिक विमा नोंदणी होत असली तरी पिक विम्याची जी रक्कम असेल ती सर्वसाधारण विमा हफ्ता अनुदान म्हणून राज्य शासन भरणार आहे. म्हणजेच पिक विमा संदर्भात शासन अधिकचा भार उचलून शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पिक विमा योजनेचा लाभ देणार आहे. हि योजना तीन वर्षासाठी लागू असणार आहे.
ज्या पिक विमा कंपन्या केवळ १ रुपयांमध्ये पिक विमा काढणार आहे त्या कंपन्याची निवड देखील झालेली आहे ती खालीलप्रमाणे आहे.
पिक विमा कंपन्याची यादी पहा
| जिल्हा | कंपनी |
|---|---|
| अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा. | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. |
| परभणी, वर्धा, नागपूर. | आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. |
| जालना, गोंदिया, कोल्हापूर. | युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. |
| नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. |
| औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड. | चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. |
| वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार. | भारतीय कृषी विमा कंपनी. |
| हिंगोली, अकोला, धुळे, पुणे. | एचडीएफसी ईर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड |
| यवतमाळ, अमरावती, गडचिरोली. | रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. |
| उस्मानाबाद | एचडीएफसी ईर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. |
| लातूर | एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. |
| बीड | भारतीय कृषी विमा कंपनी. |
पिक विमा सादर करण्याचा अंतिम दिनांक देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो खालीलप्रमाणे आहे.
२०२३ या वर्षासाठी खरीप पिक विमा अर्ज सादर करण्याचा दिनांक ३१ जुलै २०२३ असा आहे २०२४ साठी १५ जुलै तर २०२५ या वर्षासाठी १५ जुलै या अंतिम तारखा निर्धारित करण्यात आलेल्या आहेत.
पीक विमा योनजेचे उद्दिष्टय-
- नैसर्गिकआपत्ती जसे कि अतिवृष्टी, दुष्काळ तसेच कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकांचे नुकसान होते, म्हणून शासन पीक विमा योजनेच्या साहाय्याने शेतकऱ्याला संरक्षित करणे हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्टय आहे.
- पिकांचे नुकसान झालेल्या काळात शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य सुधारण्यासाठी आणि परत शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मदतीचा हात या योजनेअंतर्गत देत असते. तसेच नाविन्यपूर्ण शेती आणि सुधारित तंत्रज्ञान आणि सामुग्री वापरण्यास हि या योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते.
- शेती उत्पादन घेताना येणाऱ्या जोखमींपासून शेतकऱ्यांचे संरक्षण आणि कृषी क्षेत्राचा विकास हा या योजनेचा हेतू आहे.
लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता कोणती आहे?
- प्रधानमंत्री पीक विमा या योजना लाभ कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
- या योजनेचा लाभ अधिसूचित क्षेत्रासाठी आणि अधिसूचित पिकांसाठीच शेतकऱ्याला घेता येणार आहे.
- याव्यतिरिक कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कोणत्या बाबींवर प्रधानमंत्री विमा रक्कम देय असणार?
या योजनेअंतर्गत काही जोखमीच्या बाबींवर विमा रक्कम देय असणार आहे. त्यामध्ये खरीप हंगामाकरिता आणि रब्बी हंगामाकरिता कोणत्या बाबी असणार आहेत ते पाहुयात.
अ. खरीप हंगामाकरिता –
- पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, वादळ, वीज पडणे, चक्रीवादळ, दुष्काळ,पावसातील खंड, कीड किंवा रोग, नैसर्गिक आग, पूर, भुस्खलन, इत्यादी गोष्टींमुळे उत्पादनात येणाऱ्याघटेमुळे होणारे नुकसान
- खरीप हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसान
- हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी आणि लागणी न झाल्यामूळे होणारे नुकसान
- नैसर्गिक परिस्थिमुळे काढणीपश्चात पिकाचे होणारे नुकसान
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुले होणारे पिकांचे नुकसान
ब. रब्बी हंगामाकरिता –
- रब्बी हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसान
- पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, वादळ, वीज पडणे, चक्रीवादळ, दुष्काळ,
- पावसातील खंड, कीड किंवा रोग, नैसर्गिक आग, पूर, भुस्खलन, इत्यादी गोष्टींमुळे उत्पादनात येणाऱ्या घटेमुळे होणारे नुकसान
- नैसर्गिक परिस्थिमुळे काढणीपश्चात पिकाचे होणारे नुकसान
- नैसर्गिक परिस्थिमुळे काढणीपश्चात पिकाचे होणारे नुकसान
कोणत्या पिकांसाठी अनुदान देय असणार आहे?
अ. खरीप हंगामाकरिता अनुदान देय पिके-
- तृणधान्य व कडधान्य पिके– भात,मूग, मका, उडीद, तूर,नाचणी(रागी), ज्वारी, बाजरी
- गळीत धान्य पिके– सोयाबीन, तीळ, भुईमूग, सूर्यफूल, कारळे
- नगदी पिके– कांदा, कापूस
ब. रब्बी हंगामाकरिता अनुदान देय पिके-
- तृणधान्य व कडधान्य पिके– रब्बी ज्वारी (बागायत आणि जिरायत), गहू (बागायत), उन्हाळी भात, हरभरा
- नगदी पिके– रब्बी कांदा
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा