प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या रब्बी हंगामात सहभागी व्हा; कृषी विभागाचे आवाहन
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.
रब्बी हंगाम 2023-24 मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) करिता 30 नोव्हेंबर, 2023, गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा करिता 15 डिसेंबर, 2023 व उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग पिकाकरिता 31 मार्च, 2024 अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय (PMFBY) ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे .
आता मिळणार फक्त १ रुपया मध्ये पिक विमा योजना.तुमच्या गावात CSC केंद्रात पिक योजनेचा फॉर्म भरण्यास सुरवात झाली आहे. तरी आपण सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. केवळ शेतकऱ्यांना १₹ भरून पिक विमा योजनेचा लाभ घेण्याकरिता ” सर्व समावेशक पिक विमा योजना “ ही योजना राबविण्यात येत आहे.सदर योजना आधीसुचित क्षेत्रातील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे खरीप व रब्बी हंगामी पिकांसाठी ही योजना राबवण्यास् सुरवात झाली आहे.
- सहभाग प्रक्रिया :
पिक विमा पात्र शेतकरी :
कर्जदार. बिगर कर्जदार शेतकरी.
भाडेपट्टीवर शेती करणारे शेतकरी .
तसेच सर्व शेतकरी.
कर्जदार शेतकरी :
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी ऐच्छिक असतील किंवा अधिसूचित पिकाचा विमा करायचा नसेल तर त्यांनी योजनेच्या अंतिम दिनाकाच्या ७ दिवस आधी संबधित बँक शाखेत विहित नमुन्यात घोषणापत्र भरून देणे आवश्यक, अन्यथा आधीसुचित पिकांचा विमा बँके मार्फत करण्यात येईल.
- बिगर कर्जदार शेतकरी:
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव भरून देण्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे:
- ७/१२ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पेरणी घोषणा पत्र व
- विम हप्त्याची रक्कम ज्या बँकेत आहे त्या बँक शाखेत अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी.
2. भाडेपट्टीवर शेती करणारे शेतकरी:
भाडेपट्टी कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्याने विमा करतेवेळी जी भाडेपट्टी करार( Registered Agreement )नोंदणी केली आहे,ती करार नोंदणी अपलोड करने बंधन कारक आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा