बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

सुकन्या समृद्धि योजना संपूर्ण माहिती

 



सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे :

  • कमीत-कमी २५० रुपये भरून खाते उघडता येते.
  • वर्षाला किमान २५० रुपये आणि कमाल १ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करता येते.
  • या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी २१ वर्षे आहेत.
  • सध्या , सुकन्या समृद्धी योजनेचे(SSY) अनेक कर (Tax) लाभ आहेत.
  • लघु बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर याचे आहे. (७.६% इतके)
  • जमा केलेली मुद्दल, संपूर्ण कालावधीत मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी लाभ कलम 80C अंतर्गत करमुक्त आहेत.
  • हे खाते भारतामध्ये एका पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर करता येते.
  • मॅच्युरिटी नंतर खाते बंद न केल्यास मुदतीनंतरही जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
  • मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची परवानगी आहे.
  • खाते चालू केल्यानंतर फक्त पंधरा वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता आणि अटी :

  • मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असावे.
  • मुलीच्या एका पालकाद्वारे मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराचे एकच खाते असावे.
  • एका कुटुंबातील फक्त दोनच मुलींचे खाते उघडले जाऊ शकते, परंतु जर पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्या प्रसुती वेळी जुळ्या मुलींचा जन्म झाला असेल, तसेच पहिल्या प्रसूती वेळेस जर तिळ्या मुलींचा जन्म झाला असेल तर अशा परिस्थितीत त्या तीनही मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलींच्या जन्म प्रमाणपत्रासह पालकांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यास उघडता येऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:

सुकन्या समृद्धी योजना खाते कोणत्याही सहभागी बँक अथवा पोस्ट ऑफिस शाखेमध्ये उघडले जाऊ शकते त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचा अवलंब करा.

  • तुम्हाला ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे त्या ठिकाणी जा.
  • तिथून सुकन्या समृद्धी योजना चा फॉर्म घ्या आणि आवश्यक माहिती सह फॉर्म भरा आणि सोबत लागणारी कागदपत्रांची झेरॉक्स जोडा.
  • कमीत कमी २६० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पण पण दीड लाखाच्या आत, इतके रक्कम तुम्ही भरणार असाल ती फॉर्म मध्ये आणि स्लिप वर लिहा.
  • तुमचा फॉर्म आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची पावती दिली जाईल व तुमच्या मुलीच्या नावे खाते चालू केले जाईल.
  • या खात्यासाठी तुम्हाला एक पासबुक सुद्धा दिले जाईल

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • मुलीचा जन्म दाखला.
  • पालकांचा फोटो असलेले ओळखपत्र उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी.
  • पालकांचा पत्त्याचा पुरावा उदा. रेशन कार्ड, लाईट बिल.
  • सुकन्या समृद्धी योजना फॉर्म.
  • जन्माच्या एका आदेशानुसार अनेक मुलांचा जन्म झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, व सोबत पालकांचे प्रतिज्ञापत्र.

सुकन्या समृद्धी योजना व्याजदर:

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर हा भारताच्या अर्थव्यवस्थेतील बदलांवर कमी-जास्त होत असतो. केंद्र सरकार या योजनेचे व्याजदर ठरवते आणि दर तिमाही सुधारित करते. या योजनेच्या सुरुवातीला म्हणजेच २०१५ मध्ये ९.१% इतके व्याजदर देण्यात आले होते. या योजनेचा व्याजदर २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये ७.६% एवढा होता आता तो २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी ८% करण्यात आला आहे. हा १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आला आहे. सुरुवाती पेक्षा सध्याच्या व्याजदर कमी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...