राष्ट्रीय पशुधन मिशन योजना 50 लाख पर्यंत अनुदान
Main Features of NLM Scheme 2023
- शेळी, मेंढीपालन क्षेत्रामध्ये उद्योजक निर्माण करणे.
- शेळी, मेंढीपालन व्यवसायाचे शाश्वत मॉडेल विकसित करणे.
- उद्योजकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन तसेच फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजच्या निर्मितीद्वारे असंघटित असलेले शेळी-मेंढीपालन क्षेत्राचे संघटित क्षेत्रामध्ये रूपांतर करणे.
- शेळी, मेंढीपालन व्यवसायाच्या शास्त्रोक्त संगोपन पद्धतीचा तसेच पोषण आहार आणि रोग प्रतिबंध इत्यादींबाबत जागरूकता निर्माण करणे.
- बंदिस्त शेळी, मेंढीपालनास प्रोत्साहन.
- एकात्मिक ग्रामीण शेळी मेंढी उत्पादन साखळी विकसित करण्याकरिता वैयक्तिक उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट तसेच कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना प्रोत्साहन देणे.
NLM Scheme योजनेद्वारे वैयक्तिक व्यक्ती, स्वयंसाह्यता गट (SHG), शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संस्था (FPO), शेतकरी सहकारी संस्था (FCOs), संयुक्त दायित्व गट (JLGs) आणि कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना भांडवली खर्चावर अनुदान देऊन उद्योजकांची निर्मिती.
पात्र व्यक्ती अथवा संस्था १०० + ५, २००+१०, ३००+१५, ४००+२०, ५०० +२५ शेळ्या किंवा मेंढ्यांच्या क्षमतेचा पैदास प्रकल्पाची स्थापना.
दूध, मांस आणि लोकर उत्पादनासाठी उपयुक्त असणाऱ्या उच्च आनुवंशिक जातींच्या शेळ्या, मेंढ्यांचे पैदास प्रकल्पाची स्थापना. यासाठी केंद्र शासनामार्फत प्रकल्पाच्या भांडवली खर्चासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते.
NLM Scheme सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान अर्थसाह्याचे स्वरूप
अर्थसाह्याचे स्वरूप बघितल्यास या योजनेमध्ये खाली दर्शविल्यानुसार दोन समान हप्त्यांमध्ये प्रकल्पाच्या भांडवली खर्चावर ५० टक्के अनुदान देण्यात येते.
१०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + ५ (बोकड अथवा नर मेंढे ) १० लाख
२०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + १० (बोकड अथवा नर मेंढे) २० लाख
३०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + १५ (बोकड अथवा नर मेंढे) ३० लाख
४०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + २० (बोकड अथवा नर मेंढे) ४० लाख
५०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + २५ (बोकड अथवा नर मेंढे) ५० लाख
NLM योजनेचा लाभ
- व्यक्तीगत व्यावसायीक,
- स्वयंसहाय्यता बचत गट,
- शेतकरी उत्पादक संस्था,
- शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी,
- सहकारी दुध उत्पादक संस्था,
- सह जोखिम गट (जेएलजी),
- सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट अप ग्रूप इत्यादी घेवू शकतात.
अर्ज सादर करताना
- सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर),
- पॅनकार्ड,
- आधार कार्ड,
- रहिवाशी पूरावा (मतदान ओळखपत्र,
- वीज देयकाची प्रत), छायाचित्र,
- अनुभवाचे प्रमाणपत्र,
- वार्षिक लेखामेळ,
- आयकर रिटर्न,
- प्रशिक्षण प्रमाणपत्र,
- जमिनीचे कागदपत्र,
- बॅंकेचा रद्द केलेला धनादेश इत्यादी सादर करणे (अपलोड) अनिवार्य असून,
- जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे.
Rashtriya pashudhan vikas abhiyan या अभियानाच्या सर्व मार्गदर्शक सुचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://www.nlm.udyammitra.in यावर उपलब्ध आहे.
योजनेच्या लाभासाठी https://www.nlm.udyammitra.in संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.
सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान या ‘पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी’ योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त इच्छूक नागरिक किंवा संस्थानी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.



.png)


.jpeg)

.jpeg)

.jpeg)