शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

धुळे जिल्हा परिषद भरती 352 जागा

 धुळे जिल्हा परिषद भरती 352 जागा 



आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) ही पदे भरण्यात येणार आहेत. 


Dhule Saralseva bharti 2023) post details

रिक्त पदाची नावेरिक्त पद संख्या
आरोग्य पर्यवेक्षक०१
आरोग्य सेवक (पुरुष ) ५०% हंगामी कर्मचारी५९
आरोग्य परिचारिका (महिला आरोग्य सेवक )२०६
औषध निर्माण अधिकारी०७
कंत्राटी ग्रामसेवक०५
कनिष्ट अभियंता (स्थापत्य/बांधकाम)०६
कनिष्ट अभियंता(यांत्रिकी )०१
मुख्य सेविका /पर्यवेक्षिका०८
पशुधन पर्यवेक्षक११
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०३
वरिष्ठ सहाय्यक (लेखा )०३
विस्तार अधिकारी०१
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाठबंधारे)४१
एकूण३५२ जागा
  • एकूण जागा : 352
  • पदाचे नाव : विविध पदे
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : धुळे
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची सुरु होण्याची तारीख :  5 ऑगस्ट 2023
  • अर्जाची शेवटची तारीख :  25 ऑगस्ट 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

  •                   शासकीय योजना माहीती whatsapp  ग्रुप लिंक 👇🏼
                                          
  •                                        https://chat.whatsapp.com/CSw4kPDh6PXCftvPXVhcV2

  • वयाची अट - 25 ऑगस्ट 2023 रोजी 

    खुला प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

    राखीव प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे

    दिव्यांग उमेदवार - किमान 18 ते कमाल 45 वर्षे आहे

    टीप - 03 मार्च 2023 अंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार सर्व उमेदवारांना 02 वर्षाची अधिकची शिथिलता देण्यात येणार आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवार साठी 40 , मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 व दिव्यांग उमेदवारांसाठी 47 वर्षे आहे. तसेच पदांच्या संवर्गानुसार काही पदाची वयोमर्यादा ही वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी 
अर्जाची फी -  खुला प्रवर्ग :- 1000₹/-

राखीव प्रवर्ग :- 
(मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) :- 900₹/-


How To Apply For ZP Dhule Maharashtra Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही





गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

पोस्ट ऑफिस मध्ये 1899 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा

 पोस्ट ऑफिस मध्ये 1899 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा



Total: 1899 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पोस्टल असिस्टंट598
2सॉर्टिंग असिस्टंट143
3पोस्टमन585
4मेलगार्ड03
5मल्टी टास्किंग स्टाफ570
Total1899

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 & 2: (i) पदवीधर  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  2. पद क्र.3 & 4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  3. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू   (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयाची अट: 09 डिसेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023 

बुधवार, २६ जुलै, २०२३

या शेतकऱ्यांना PM किसान 14 हप्ता जमा होणार नाही

 या शेतकऱ्यांना PM किसान 14 व्हा हप्ता जमा होणार नाही

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना यंदाच्या आठवड्यात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १४वा हप्ता 27 जुलै रोजी हस्तांतरित होणार असून राजस्थानमधील नागौर येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी १४व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करतील. हे पैसे थेट ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जाणार आहेत. ही रक्कम फक्त त्या शेतकऱ्यांनाच दिली जाईल ज्यांनी ई-केवायसी सारखी इतर कामे केली आहेत

यादीत नाव असूनही पैसे अडकू शकतात

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचे नाव लाभार्थी यादीत पाहू शकता. तुमचे नाव बरोबर असणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही चूक असता कामा नये. खात्यातील नाव आणि अर्जातील नाव बरोबर असावे. यासोबतच खात्यातील नाव आणि आधार कार्डमधील नावही बरोबर असावे. शुद्धलेखनाची चूक असता कामा नये. त्यात काही चूक झाली तर लाभार्थी यादीत नाव आल्यानंतरही पुढील हप्त्याचे २०० रुपये अडकू शकतात. काही चूक झाली असेल तर ती लगेच सुधारावी.

ई-केवायसी करणे महत्त्वाचे

पीएम किसान योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी आता ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ई-केवायसीशिवाय पैसे मिळणे कठीण आहे. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन शेतकरी ओटीपीद्वारे ई-केवायसी करू शकतात. याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुम्ही हे काम करू शकता. अलीकडेच सरकारने ई-केवायसीसाठी मोबाइल ॲप लाँच केले आहे. याद्वारे शेतकरी घरबसल्या ई-केवायसी करू शकतात.



  • खाते NPCI शी लिंक असणे आवश्यक
  • शेतकऱ्यांचे बँक खाते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) शी जोडलेले असणे आवश्यक आहे. खाते लिंक नसेल तर १४व्या हप्त्याचे पैसे मिळणे कठीण होऊ शकते.
  • आधारशी जोडणे अनिवार्य
  • खाते आधारशी लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच पीएम किसान योजनेच्या १४व्या हप्त्याचा लाभ मिळेल.
  • खाते आधारशी जोडले जाते तेव्हा शेतकऱ्यांची अचूक माहिती सरकारपर्यंत पोहोचते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याने सरकारी अनुदानाचे पैसेही वेळेवर खात्यात येऊ लागतात


  • ज्या शेतकऱ्यांना PM किसान मानधन मिळत नसेल अश्या शेतकऱ्यांनी *PM किसान ई kyc व बँक  kyc या दोन्ही ई KYC करू घेणे आवश्यकता आहे.*



  • *PM किसान नवीन नोंद चालु  आहे*


  • *आवश्यक कागदपत्रे*

  • 1)आधार  कार्ड

  • 2)7/12

  • 3)बँक  पुस्तकं

  • 4)रेशन कार्ड



  • *PM किसान च्या आवश्यक साईड*

  • 1) पी एम किसान चा तुमचा तपशील पाहण्यासाठी

  • https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx


  • 2) पी एम किसान इ केवायसी करण्यासाठी

  • https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx


  • 3) पी एम किसान मध्ये आधार वरील नाव दुरुस्ती साठी

  • https://pmkisan.gov.in/EditAadharName_Pub.aspx


  • 4) पी एम किसान नवीन नोंदणीसाठी


  • https://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.असत

  • *पीएम किसान बद्दल काही अडचण असेल तर दर शुक्रवारी तहसील कार्यालय किंवा तुमच्या कृषी सहाय्यक याच्याशी संपर्क साधा*

गुरुवार, २९ जून, २०२३

पिक विमा 2023. शेतकऱ्यास एका अर्जासाठी भरावा लागेल 1 रुपया. पिक विमा कंपन्याची यादी पहा.

 


सर्वसमावेशक पिक विमा योजना ३ वर्षासाठी

नैसर्गिक अप्पतीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढत असतात.

पिक विमा काढतांना शेतकऱ्यांना पिक विम्याची काही रक्कम भरावी लागत होती. त्यामुळे आता केवळ १ रुपयात सर्वसमावेशक पिक विमा करता येणार असल्याने शेतकरी बांधवाना याची नक्कीच मदत होणार आहे.

१ रुपयात जरी पिक विमा नोंदणी होत असली तरी पिक विम्याची जी रक्कम असेल ती सर्वसाधारण विमा हफ्ता अनुदान म्हणून राज्य शासन भरणार आहे. म्हणजेच पिक विमा संदर्भात शासन अधिकचा भार उचलून शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पिक विमा योजनेचा लाभ देणार आहे. हि योजना तीन वर्षासाठी लागू असणार आहे.

ज्या पिक विमा कंपन्या केवळ १ रुपयांमध्ये पिक विमा काढणार आहे त्या कंपन्याची निवड देखील झालेली आहे ती खालीलप्रमाणे आहे.

पिक विमा कंपन्याची यादी पहा

जिल्हाकंपनी
अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा.ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
परभणी, वर्धा, नागपूर.आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
जालना, गोंदिया, कोल्हापूर.युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड.चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार.भारतीय कृषी विमा कंपनी.
हिंगोली, अकोला, धुळे, पुणे.एचडीएफसी ईर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
यवतमाळ, अमरावती, गडचिरोली.रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
उस्मानाबादएचडीएफसी ईर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
लातूरएसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
बीडभारतीय कृषी विमा कंपनी.

पिक विमा सादर करण्याचा अंतिम दिनांक देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो खालीलप्रमाणे आहे.

२०२३ या वर्षासाठी खरीप पिक विमा अर्ज सादर करण्याचा दिनांक ३१ जुलै २०२३ असा आहे २०२४ साठी १५ जुलै तर २०२५ या वर्षासाठी १५ जुलै या अंतिम तारखा निर्धारित करण्यात आलेल्या आहेत.

पीक विमा योनजेचे उद्दिष्टय-

  • नैसर्गिकआपत्ती जसे कि अतिवृष्टी, दुष्काळ तसेच कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकांचे नुकसान होते, म्हणून शासन पीक विमा योजनेच्या साहाय्याने शेतकऱ्याला संरक्षित करणे हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्टय आहे.
  • पिकांचे नुकसान झालेल्या काळात शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य सुधारण्यासाठी आणि परत शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मदतीचा हात या योजनेअंतर्गत देत असते. तसेच नाविन्यपूर्ण शेती आणि सुधारित तंत्रज्ञान आणि सामुग्री वापरण्यास हि या योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते.
  • शेती उत्पादन घेताना येणाऱ्या जोखमींपासून शेतकऱ्यांचे संरक्षण आणि कृषी क्षेत्राचा विकास हा या योजनेचा हेतू आहे.

लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता कोणती आहे?

  • प्रधानमंत्री पीक विमा या योजना लाभ कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
  • या योजनेचा लाभ अधिसूचित क्षेत्रासाठी आणि अधिसूचित पिकांसाठीच शेतकऱ्याला घेता येणार आहे.
  • याव्यतिरिक कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कोणत्या बाबींवर प्रधानमंत्री विमा रक्कम देय असणार?

या योजनेअंतर्गत काही जोखमीच्या बाबींवर विमा रक्कम देय असणार आहे. त्यामध्ये खरीप हंगामाकरिता आणि रब्बी हंगामाकरिता कोणत्या बाबी असणार आहेत ते पाहुयात.

 अ. खरीप हंगामाकरिता –

  • पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, वादळ, वीज पडणे, चक्रीवादळ, दुष्काळ,पावसातील खंड, कीड किंवा रोग, नैसर्गिक आग, पूर, भुस्खलन, इत्यादी गोष्टींमुळे उत्पादनात येणाऱ्याघटेमुळे होणारे नुकसान
  • खरीप हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसान
  • हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी आणि लागणी न झाल्यामूळे होणारे नुकसान
  • नैसर्गिक परिस्थिमुळे काढणीपश्चात पिकाचे होणारे नुकसान
  • स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुले होणारे पिकांचे नुकसान

ब. रब्बी हंगामाकरिता –

  • रब्बी हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसान
  • पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, वादळ, वीज पडणे, चक्रीवादळ, दुष्काळ,
  • पावसातील खंड, कीड किंवा रोग, नैसर्गिक आग, पूर, भुस्खलन, इत्यादी गोष्टींमुळे उत्पादनात येणाऱ्या घटेमुळे होणारे नुकसान
  • नैसर्गिक परिस्थिमुळे काढणीपश्चात पिकाचे होणारे नुकसान
  • नैसर्गिक परिस्थिमुळे काढणीपश्चात पिकाचे होणारे नुकसान

कोणत्या पिकांसाठी अनुदान देय असणार आहे?

अ. खरीप हंगामाकरिता अनुदान देय पिके-

  • तृणधान्य व कडधान्य पिके– भात,मूग, मका, उडीद, तूर,नाचणी(रागी), ज्वारी, बाजरी
  • गळीत धान्य पिके– सोयाबीन, तीळ, भुईमूग, सूर्यफूल, कारळे
  • नगदी पिके– कांदा, कापूस

ब. रब्बी हंगामाकरिता अनुदान देय पिके-

  • तृणधान्य व कडधान्य पिके– रब्बी ज्वारी (बागायत आणि जिरायत), गहू (बागायत), उन्हाळी भात, हरभरा
  • नगदी पिके– रब्बी कांदा

शुक्रवार, २३ जून, २०२३

खुशखबर! ४६४४ पदांची तलाठी भरती अधिकृत PDF जाहिरात आली, अर्ज २६ जून पासून!


तलाठी [Talathi]:

परीक्षा दिनांक : 17 औगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023

पात्रता : कोणतीही पदवी

वेतनमान : रु.25,500-81,100/-

वयोमर्यादा : 17 जुलै 2023 रोजी 

  • 18-32 वर्षे (SC/ST+5, OBC+3 वर्षे सूट)


अ.क्र. जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या

1 अहमदनगर 250 Posts 19 नागपूर 117 Posts

2 अकोला 41 Posts 20 नांदेड 119 Posts

3 अमरावती 56 Posts 21 नंदुरबार 54 Posts

4 औरंगाबाद 161 Posts 22 नाशिक 268 Posts

5 बीड 187 Posts 23 उस्मानाबाद 110 Posts

6 भंडारा 67 Posts 24 पालघर 142 Posts

7 बुलढाणा 49 Posts 25 पुणे 383 Posts

8 चंद्रपूर 167 Posts 26 रायगड 241 Posts

9 धुळे 205 Posts 27 रत्नागिरी 185 Posts

10 गडचिरोली 158 Posts 28 सांगली 98 Posts

11 गोंदिया 60 Posts 29 सातारा 153 Posts

12 हिंगोली 76 Posts 30 सिंधुदुर्ग 143 Posts

13 जालना 118 Posts 31 सोलापूर 197 Posts

14 जळगाव 208 Posts 32 ठाणे 65 Posts

15 कोल्हापूर 56 Posts 33 वर्धा 78 Posts

16 लातूर 63 Posts 34 वाशिम 19 Posts

17 मुंबई उपनगर 43 Posts 35 यवतमाळ 123 Posts

18 परभणी 105 Posts 36 मुंबई शहर 19 Posts


Maharashtra Talathi Recruitment 2023 Application Fees

Application Fees [अर्ज फीस]

  • खुला प्रवर्ग:- ₹ 1000/-
  • राखीव प्रवर्ग : ₹ 900/-
  • The mode of payment is Online UPI, Credit, Debit Etc.
  • परीक्षा-शुल्क नापरतावा (Non-Refundable)आहे.

बुधवार, २१ जून, २०२३

*PM किसान योजनेचा 14 वा हप्ता व महाराष्ट्र शासनाचे 2000 असे एकूण 4000 येत्या 10 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे*

 *PM किसान योजनेचा  14 वा हप्ता व महाराष्ट्र शासनाचे  2000  असे एकूण 4000 येत्या 10 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे*




ज्या शेतकऱ्यांना PM किसान मानधन मिळत नसेल अश्या शेतकऱ्यांनी *PM किसान ई kyc व बँक  kyc या दोन्ही ई KYC करू घेणे आवश्यकता आहे.*



*PM किसान नवीन नोंद चालु  आहे*


आवश्यक कागदपत्रे

1)आधार  कार्ड

2)7/12

3)बँक  पुस्तकं

4)रेशन कार्ड


PM किसान च्या आवश्यक साईड


1) पी एम किसान चा तुमचा तपशील पाहण्यासाठी


https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx


2) पी एम किसान इ केवायसी करण्यासाठी


https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx


3) पी एम किसान मध्ये आधार वरील नाव दुरुस्ती साठी


https://pmkisan.gov.in/EditAadharName_Pub.aspx


4) पी एम किसान नवीन नोंदणीसाठी


https://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.aspx


*पीएम किसान बद्दल काही अडचण असेल तर दर शुक्रवारी तहसील कार्यालय किंवा तुमच्या कृषी सहाय्यक याच्याशी संपर्क साधा*

शनिवार, २७ मे, २०२३

*10वी पासवर महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग मध्ये नवीन 446 जागांसाठी भरती जाहीर*

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग” मध्ये “पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, परिचर, उच्च श्रेणीचे लघुलेखक, निम्न श्रेणीचे लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, यांत्रिकी, बाष्पक परिचर पदाची भरती सुरु झाली आहे


.

🔔 पदाचे नाव: पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, परिचर, उच्च श्रेणीचे लघुलेखक, निम्न श्रेणीचे लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, यांत्रिकी, बाष्पक परिचर.

🔔  रिक्त पदे: 446 पदे

🔔  शैक्षणिक पात्रता: पशुधन पर्यवेक्षक: 10वी उत्तीर्ण/ पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य.

🔔  वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे. मागासवर्गीय: 18-43 वर्षे.

🔔  फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- , मागासवर्गीय: ₹900/-.

🔔 नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

🔔  अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.

🔔  अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 27 मे 2023.

🔔  अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023.

♦ शैक्षणिक पात्रता – 

  • Livestock Supervisor: 10th Pass, Livestock Supervisor Course Or Equivalent.
  • Attendant: 10th Pass Or Equivalent
♦ महत्वाच्या लिंक :
https://ibpsonline.ibps.in/idbiemar23/

गुरुवार, १८ मे, २०२३

सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी मुलाखतींचे या तारखेस धुळ्यात आयोजन

 

सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी मुलाखतींचे या तारखेस धुळ्यात आयोजन

* भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदाच्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. (Interview for Army Officer Pre Training held at 19 May Dhule news)या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी शुक्रवारी (ता. १९) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखतीला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. नीलेश पाटील यांनी केले आहे.सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी २९ मे ते ७ जून २०२३ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक-५३ साठी प्रशिक्षण देण्यात येईल. एस.एस.बी प्रवेशासाठी कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी परीक्षा (एनडीए) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असावे.एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये उमेदवार पास झालेला असावा. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी नियुक्तिपत्र असावे. तसेच विद्यापीठ एन्ट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस यादीत नावे असणारे उमेदवार पात्र राहतील.हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुलाखतीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे १९ मेस सकाळी अकराला उपस्थित राहावे.मुलाखतीस येताना विद्यार्थ्यांनी https://www.facebook.com/DSW.Maharashtra या फेसबुकवरील वेबपेजवर सैनिक कल्याण विभाग, पुणेवर सर्च करून त्यामधील एसएसबी-५३ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पूर्ण भरून सोबत आणावी. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक०२५३-२४५१०३२, ईमेल pctcoic@yahoo.in वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पाटील यांनी केले आहे.

शनिवार, १३ मे, २०२३

बियाणे अनुदान योजना 2023ऑनलाइन अर्ज सुरु.

 नमस्कार शेतकरी बंधूंनो आता पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शासकीय अनुदानावर बियाणे हवे असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या कारण बियाणे अनुदान योजना 2023 ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. तरी या योजनेचा भरपूर शेतकर्‍यांनी फायदा घ्यावा. चला तर मित्रांनो आता आपण बघूया या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करतात.



अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ?

महाडीबीटी पोर्टल वर खत बियाणे औषधे याचा अर्ज करत असताना लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.

1) 7/12 उतार

2) 8- अ उतारा

3) आधार कार्ड

4) बँक पासबुक

महाडीबीटी Maha dbt  राज्य  शासनाच्या या  पोर्टलवर शेतकरी योजना शीर्षका या अंतर्गत बी -बियाणे, औषधे आणि  खते इत्यादी घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा हि उपलब्ध करून देण्यात आली आहे.  आपण यामध्ये तुर, मुग,सोयाबीन,मका ,कापुस, उडीद, खरीप ज्वारी या बियाणे करीत तुम्ही  अर्ज हे करू शकता. या  योजनेमध्ये  अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची/ लाभार्थ्यांची  निवड प्राप्त सर्व अर्जा मधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याकजी निवड हि करण्यात येईल. या लॉटरी पद्धतीद्वारे  ज्या शेतकरी बंधूंची निवड होईल त्याच लाभार्थ्याला  अनुदाना स्वरूपावर बी- बियाणे मिळेल. अर्ज ज्या पिकाच्या बियाण्यासाठी केला आहे, उपलब्धतेनुसार त्याच  पिकाचे बियाणे व वाण  मिळेल.


▶बियाण्यास १००% अनुदान हे पिक प्रात्यक्षिका करिता राहील .

▶कमाल ५०% मर्यादेपर्यंत  प्रमाणित बियाण्याकरिता  अनुदान दिले जाईल.

*जर तुम्हाला शासकीय योजना विषयी अधिक माहिती साठी  आमच्या वेबसाईट भेट द्या* 

                                http://sulaicomputer.com





पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...