मित्रांनो नमस्कार
प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचा 13 वा हफ्ता *15 फेब्रुवारी 2023* रोजी लाभार्त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. *कृषि आणि किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली* मार्फत मिळालेल्या माहितीनुसार भारतातील 1.46 करोड तसेच महाराष्ट्रातील 14,08,401 लाभार्त्यांना आधार seeded बँक अकाउंट नसल्याने प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचा लाभ मिळत नाही आहे. यात आपल्या नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील बऱ्याच लाभार्त्यांचा समावेश आहे. आपल्याला सदर लाभार्त्यांचे खाते *10 फेब्रुवारी 2023* पर्यंत उघडण्याचे काम सोपविण्यात आले आहे जेणेकरून 15 फेब्रुवारी 2023 च्या आत सर्व खातेदारांचे आधार seeding पूर्ण होईल व सदर खातेदारांच्या IPPB खात्यात प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचे प्रत्येकी 2000 रुपये जमा होतील.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचे अंतर्गत IPPB अकाउंट उघडण्यासाठी special mandate तयार करण्यात आले आहे.
1. PM KISAN Premium
आपल्या अंतर्गत असलेल्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधि लाभार्त्यांची यादी आपल्या सर्वांना लवकरच देण्यात येईल. सदर यादीमध्ये *लाभार्त्यांचे नाव, गावाचे नाव आणि मोबाईल नंबर* दिलेले आहेत. सर्वांना विनंती आहे कि यादीमध्ये नाव असलेल्या लाभार्त्यांना लवकरात लवकर संपर्क करून त्यांचे IPPB अकाउंट काढून घ्यावे. सदर IPPB अकाउंट *दिलेल्या mandate मध्येच* आणि *आधार seeding करूनच* उघडावेत व सदर योजनेचा लाभ न घेऊ शकणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांचा प्रधानमंत्री किसान सम्मान निधि मिळवून देण्यात मदत करावी. धन्यवाद.
डाक निरीक्षक
नंदुरबार सब डिव्हिजन
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा