धुळे जिल्ह्याचा कुसुमचा कोठा हा पूर्ण झाला आहे
प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावाखाली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फोन कॉल द्वारे किंवा फेक मोबाईल एप्लीकेशन द्वारे व फेक साईट द्वारे पैसे जमा करण्याचे संदेश किंवा ऑनलाईन पेमेंट चे ऑप्शन शेतकऱ्यांची लूट होत आहे तरी शेतकऱ्यांनी सावधान राहावे धुळे जिल्ह्याचा कुसुमचा कोठा हा पूर्ण झाला आहे याची शेतकऱ्यानी नोद घ्यावी
प्रधानमंत्री कुसुम योजनेची लिंक
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरु नयेत. तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषिपंपाकरीता अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.
तसेच असे निदर्शनास आले आहे की उपरोक्त योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषिपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषिपंप महाकृषि ऊर्जा अभियन पीएम- कुसुम घटक-ब योजने अंतर्गत आस्थापित करुन घेतात. अशी बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषिपंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिस्सा रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध FIR करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
आदेशानुसार
सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा