सोमवार, २७ मार्च, २०२३

आयुष्मान भारत योजना 5 लाख पर्यंत मोफत उपचार

 आयुष्मान भारत योजना' ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना 'आयुष्मान भारत गोल्डन कार्ड' (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मोदी केअर योजना म्हणूनही ओळखले जाते.

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्याखालील प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येईल. 10 कोटी बीपीएल धारक कुटुंब (सुमारे 50 कोटी लोक) या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम असतील.भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी 14 एप्रिल 2018 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातून या योजनेचा शुभारंभ केला. 


वैशिष्ट्ये 

या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील सर्व गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करेल. याचा अर्थ असा की या योजनेस पात्र असणारी कोणतीही गरीब व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकते.

आयुष्मान भारत योजनेची गावाची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर जा


आयुष्मान भारत योजन चे  कार्ड डॉनलोड करण्यासाठी खालील लिंकवर जा

आयुष्मान भारत योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे :-

  1. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बीपीएल कुटुंबाला शासना कडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल. या योजनेचा लाभ शासना कडून सुमारे 50 कोटी बीपीएल कुटुंबांना देण्यात येणार आहे.
  2. या योजनेतर्गत पात्र लाभार्थींना शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतील.
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे.
  4. एखाद्याचे नाव लाभार्थींच्या यादीमध्ये नसेल आणि ते या योजनेस पात्र असतील तर आयुष्मान मित्राच्या साहाय्याने या योजनेअंतर्गत त्याची नोंदणी केली जाऊ शकते. एवढेच नाही तर गोल्डन कार्डही रुग्णालयात बनवले जाते.
  5. या योजनेत, अनेक प्रकारच्या गंभीर आजारांवर उपचार केले जातील, ज्यामध्ये रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्चही सरकारकडून खर्च करावा लागतो.
  6. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे आधार कार्ड आवश्यक आहे.
  7. आपल्या शहरातील किंवा खेड्यातील कोणत्या रुग्णालयाला या योजनेचा लाभ मिळत आहे.


आयुष्मान भारत गोल्डन कार्ड e-kyc कुठे व कशी करता येईल ?

आपल्या शहरातील व गावातील CSC Center किव्हा आपले सरकार सेवा केंद्र यांचाशी संपर्क साधा व यादीत आपले नाव चेक करा नाव असल्यास सदरील केंद्र चालक यांनी सागीतल्या प्रमाणे कागद पत्र सादर करा व आपली आयुष्मान भारत गोल्डन कार्ड e-kyc करून घ्या..

जर आपण e-kyc केली नाही तर आपण वरील योजने पासून वंचित राहणार...

सदरी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड e-kyc नि शुल्लक आहे.

बुधवार, २२ मार्च, २०२३

आता राज्य मध्ये सरकारी नोकरी नाही फक्त ९ खाजगी कंपनी मध्ये होणार भरती शासनाचा नवीन GR

आता राज्य मध्ये  सरकारी नोकरी नाही फक्त ९ खाजगी कंपनी मध्ये होणार भरती शासनाचा नवीन GR 

Privatization of Government Jobs : शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी नोकरभरती (Government Job) ही मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या खासगी नऊ कंपन्यामार्फत केली जाणार आहे. तसा निर्णय उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांनी घेतला आहे. प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं आहे. आता या धोरणाची व्याप्ती वाढवत सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण (Privatization) करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारशी सबंधित अन्य कार्यालयातील बाह्य यंत्रणेमार्फत नोकरभरती केली जाणार आहे.



प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यानुसार सुरुवातीला सफाई कामगार, शिपाई अशी चतुर्थ श्रेणीतील काही कर्मचारी बाह्ययंत्रणेतून घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता या धोरणाची व्याप्ती वाढवत सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

या नऊ कंपन्यांमार्फत होणार नोकरभरती

मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) नोकरभरती धोरणास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत उद्योग-कामागार विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णयही जारी केला आहे. या निर्णयानुसार आता कोणत्याही विभागाला नोकरभरती (Government Job) करताना सरकारने नेमलेल्या मनुष्यबळ पुरवठा एजन्सीकडूनच करावी लागेल. अ‍ॅक्सेंट टेक सर्व्हिसेस लि., सी.एम.एस. आयटी सव्‍‌र्हिसेस लि., सी.एन.सी ई-गव्‍‌र्हनन्स सर्व्हिसेस इंडिया लि., इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि., क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि., एस-2 इन्फोटेक इंटरनॅशनल लि., सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि., सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि., उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस या नऊ कंपन्यांमार्फत नोकरभरती होणार आहे. 


मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थांची नेमणूक पाच वर्षांसाठी

मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थांची नेमणूक पाच वर्षासाठी करण्यात आली आहे. तसेच संस्थाच्या पॅनलचे संपूर्ण व्यवस्थापन करण्यासाठी कामगार आयुक्तांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा या संस्था करणार असून त्याच्याकडून सरकार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थाना भरती करावी लागणार आहे.

GR पाहण्यासाठी खाली लिंक पहा 👇

https://drive.google.com/file/d/1FqiUNNdd1lLgduxicEj8wHWfSAtOeozt/view?usp=drivesdk


मंगळवार, १४ मार्च, २०२३

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी पाचवी यादी

  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोसाहनपर लाभ योजना



महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेची पाचवी यादी जाहीर 

 

 यात शिंदखेडा तालुक्यातील एकाही गावाचे यादीत नाव नाही
फक्त शिरपूर चे 2गाव व साक्री चे 1

रविवार, १२ मार्च, २०२३

१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची योजना सुरु

 केंद्र सरकार आणि राज्य शासन देशातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवित असतात.या योजनांपैकीच एक योजना म्हणजे महाज्योती फ्री टॅबलेट योजना जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्थेसोबत मिळून इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची योजना सुरु केली आहे.
MH-CET / IEL / NEET या परीक्षांच्या २०२३ पूर्व तयारीसाठी इमाव (OBC), वी जा भ ज (VJNT), वि मा प्र (SBC) या प्रवर्गामधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.




१०वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर, मेडिकलसाठी तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नसते अशा विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेने ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षण उपक्रम सुरु केला आहे.

जर तुम्हाला फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घायचा असेल तर शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करायची सर्व पद्धत आम्ही खाली दिलेली आहे
आम्ही आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे आपण हा लेख जरूर वाचावा व या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा

विशेष सूचना: आम्ही महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी विद्यार्थी असतील जे महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण महाज्योती फ्री टॅबलेट योजना काय आहे, Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra, महाज्योती फ्री टॅबलेट योजना ऑनलाईन अर्ज, महाज्योती फ्री टॅबलेट योजना फायदे, महाज्योती फ्री टॅबलेट योजना वैशिष्ट्य काय आहेत, महाज्योती फ्री टॅबलेट योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र लाभ घेण्यासाठी किती टक्के गुणांची आवश्यकता आहे, फ्री टॅबलेट योजना कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे, फ्री टॅबलेट योजनेसाठी पात्रता काय आहे, फ्री टॅबलेट योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत,संपर्क क्रमांक, फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करायची पद्धत, फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

योजनेचे नावMahajyoti Free Tablet Yojana Maharashtra
विभागशिक्षण विभाग
राज्यमहाराष्ट्र
योजना कोणी सुरु केलीमहाज्योती संस्था
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी
लाभअभ्यासक्रमासाठी मोफत टॅबलेट वितरण
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र उद्देश

Mahajyoti Free Tablet Yojana Purpose

  • महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांनी इयत्ता ११वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे त्यांना ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.जेणेकरून विद्यार्थी घरी बसून स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांचे महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या सहाय्याने जीवनमान सुधारणे.
  • विद्यार्थ्यांना डिजिटल युगासोबत जोडणे.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे.
  • राज्यात डिजिटली शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे
  • विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षा पूर्ण करता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये

Maharashtra Free Tablet Yojana Features

  • या योजनेअंतर्गत १० वी पास झालेले विद्यार्थी ज्यांनी ११ वी सायन्स ला प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येते आहेत तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी दररोज ६ GB इंटरनेट सुविधा आणि उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके देण्यात येत आहेत.
  • या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या टॅबलेट साठी विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत टॅबलेट चा लाभ दिला जातो.
  • महाज्योति फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनद्वारे करण्यात आली आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली महाज्योती फ्री टॅबलेट योजना एक अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त अशी योजना आहे.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यात 30 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप करण्याचा उद्देश्य निर्धारित करण्यात आलेला आहे.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींना देखील लाभ दिला जाणार आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्याने शैक्षणिक भविष्य सुधारण्यासाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळालेल्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थ्यांना देशातील विविध घडामोडींची माहिती मिळेल व त्यांचा सर्वांगीण विकास होईल.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे लाभार्थी

Mahajyoti Free Tablet Yojana Beneficiary

महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक गुण

इयत्ता १०वीशहरी भागातील विद्यार्थी७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी
उत्तीर्ण झालेला असावा.
इयत्ता १०वीग्रामीण भागातील विद्यार्थी६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी
उत्तीर्ण झालेला असावा.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना फायदे

  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज ६ GB इंटरनेट सेवा मोफत दिली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके दिली जाणार आहेत.
  • पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत JEE, NEET आणि CET ऑनलाईन कोचिंग क्लासेस ची मोफत सुविधा दिली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट चा वापर करून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
  • टॅबलेट च्या साहाय्याने विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसेच आपल्या शिक्षकांसोबत अभ्यासासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतील.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी विविध प्रकारचे ऑनलाईन शिक्षण व कोर्से पूर्ण करू शकतील.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटली दुनियेत एक पाऊल पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • महाज्योती फ्री टॅबलेट च्या अंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी शिक्षणासाठी उपयुक्त पुस्तके डाउनलोड करून अभ्यास करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःची इतर कामे सुद्धा करू शकतील

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र आवश्यक पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थी इयत्ता १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या अटी

  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी मध्ये सायन्स ला प्रवेश घेतलेला असावा.
  • शहरी भागातील विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्यांने जर शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत टॅबलेट चा लाभ मिळवला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील सरकारी नोकरीत कार्यरत असतील तर अशा विद्यार्थाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.


महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

  • OBC (इ मा व)
  • VJNT (वि जा भ ज)
  • SBC (वि मा प्र)

महाज्योती फ्री टॅबलेट योजना कागदपत्रे

  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा.
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • घरपट्टी
  • विज बिल
  • दहावी उत्तीर्ण मार्कशीट (ग्रामीण भागात ६० टक्के / शहरी भागात ७० टक्के)
  • विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
  • विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र.
  • नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट
  • विद्यार्थ्याने अकरावी मध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्याची पावती / पुरावा.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ई-मेल
  • मोबाईल क्रमांक

गुरुवार, ९ मार्च, २०२३

Pm किसान 6 हजार व राज्य शासन कडून 6 हजार असे 12हजार मिळेल

 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची





नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी ६ हजारांच्या निधीत आणखी ६ हजारांची भर टाकण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहेत.3 hours ago

बुधवार, १ मार्च, २०२३

Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2024- 25अर्ज सुरु

 सर्व पालकांना महत्वाची सुचना RTE २५% प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु 





आवश्यक कागदपत्रे

         1.      पत्त्याचा पुरावा

        2.      जन्मतारीख प्रमाणपत्र

        3.      आधार कार्ड

        4.    फोटो

        5.      जात प्रमाणपत्र

        6.      उत्पन्नाचे प्रमाणपत्र

        7.      अपंगत्व प्रमाणपत्र

या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज


 Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2024- 25 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया लकरच सूरू होणारं आहे 

महत्वाची सूचना : आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन site स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

♦ एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही .
♦ एका बालकाचा एका पेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील. जन्म तारीख अथवा मोबाईल भरताना चुकल्यास तो अर्ज Delete करून पुन्हा नवीन अर्ज भरावा.

आरटीई 25% प्रवेशासाठी बालकांचे वय | RTE 25% Admission Age Limit
अ. क्र इयत्ता किमान वय कमाल वय
1 प्ले ग्रुप/ नर्सरी 3 वर्ष 4 वर्ष 5 महिने 30 दिवस
2 ज्युनिअर केजी 4 वर्ष 5 वर्ष 5 महिने 30 दिवस
3 सिनियर केजी 5 वर्ष 6 वर्ष 5 महिने 30 दिवस
4 इयत्ता 1 ली 6 वर्ष 7 वर्ष 5 महिने 30 दिवस
 

आवश्यक कागदपत्रे (Required Documents List in Marathi)
Online अर्ज करतांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीये, मात्र ऑनलाइन अर्ज सादर करतांना पुढील कागदपत्रे जवळ असावीत.

1) रहिवाशी पुरावा
2) जन्म दाखला
3) जातीचा दाखला (वडिलांचा/बालकांचा)
4) उत्पन्न दाखला
5) दिव्यांग मुलांसाठी वैद्याकिय प्रमाणपत्र पुरावा
6) अनाथ असल्यास त्याचा पुरावा.

ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना


1) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (C) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थ साहित्य शाळा तसेच खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रिया करीता पालकांकडून विहित मुदतीमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत.
2) आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकाला आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.
3) 25% प्रवेश प्रक्रिये करिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी.
4) अर्ज करताना पालकांनी घराचे व शाळेचे अंतर किती आहे याची काळजी घ्यावी.
5) प्रवेश प्रक्रियेच्या विहित मुदतीमध्ये पालकांनी अर्ज करावा, जर का अर्ज करताना इंटरनेट अथवा तांत्रिक अडचणी येत असतील तर अशा परिस्थितीत शक्य तितका लवकर अर्ज करावा.
6) प्रवेश प्रक्रिये दरम्यान काही समस्या असल्यास आरटीई पोर्टल वरती मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे त्यांच्याशी संपर्क करून समस्यांचे निराकरण करण्यात यावे.
7) पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक व खरी माहिती भरावी (उदा. घरचा पत्ता, जन्म तारीख, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, इतर.)
8) ज्या बालकांनी यापूर्वी आर टी 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
9) यापूर्वी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतलेले निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिक अर्ज भरण्याची निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
10) पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यात येऊ नयेत.


पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...