आयुष्मान भारत योजना' ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना 'आयुष्मान भारत गोल्डन कार्ड' (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मोदी केअर योजना म्हणूनही ओळखले जाते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्याखालील प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येईल. 10 कोटी बीपीएल धारक कुटुंब (सुमारे 50 कोटी लोक) या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम असतील.भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी 14 एप्रिल 2018 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातून या योजनेचा शुभारंभ केला.
वैशिष्ट्ये
या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील सर्व गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करेल. याचा अर्थ असा की या योजनेस पात्र असणारी कोणतीही गरीब व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकते.
आयुष्मान भारत योजनेची गावाची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर जा
आयुष्मान भारत योजन चे कार्ड डॉनलोड करण्यासाठी खालील लिंकवर जा
आयुष्मान भारत योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे :-
- या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बीपीएल कुटुंबाला शासना कडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल. या योजनेचा लाभ शासना कडून सुमारे 50 कोटी बीपीएल कुटुंबांना देण्यात येणार आहे.
- या योजनेतर्गत पात्र लाभार्थींना शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतील.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे.
- एखाद्याचे नाव लाभार्थींच्या यादीमध्ये नसेल आणि ते या योजनेस पात्र असतील तर आयुष्मान मित्राच्या साहाय्याने या योजनेअंतर्गत त्याची नोंदणी केली जाऊ शकते. एवढेच नाही तर गोल्डन कार्डही रुग्णालयात बनवले जाते.
- या योजनेत, अनेक प्रकारच्या गंभीर आजारांवर उपचार केले जातील, ज्यामध्ये रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्चही सरकारकडून खर्च करावा लागतो.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे आधार कार्ड आवश्यक आहे.
- आपल्या शहरातील किंवा खेड्यातील कोणत्या रुग्णालयाला या योजनेचा लाभ मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा