मुदतवाढ दिली
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अखेर आधार कार्ड-पॅनकार्ड जोडणीला मुदतवाढ दिली. गेल्यावर्षी निश्चित केल्याप्रमाणे ही मुदतवाढ 31 मार्च 2023 ही होती. आता ही तारीख वाढवून 30 जून, 2023 करण्यात आली आहे. सीबीटीडीनुसार, ही जोडणी करण्यासाठी नागरिकांना थोडी मुभा देण्यात आली आहे. ज्यांनी आतापर्यंत ही जोडणी केली नाही. त्यांनी 30 जूनपर्यंत ही जोडणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पाचवेळा मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
पॅनकार्ड होईल निष्क्रिय
आता ही शेवटची संधी नागरिकांना देण्यात आली आहे. जर त्यांनी 30 जूनपर्यंत ही जोडणी केली नाही तर त्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल. त्यांना पुन्हा जोडणीची संधी देण्यात येणार नाही. पॅनकार्ड निष्क्रिय झाल्याबरोबर त्यांचे बँक खाते, डीमॅट खाते इतर ठिकाणाचा व्यवहार ठप्प होईल. त्यांना व्यवहार करताना अडचणी येतील. त्यामुळे या अंतिम मुदतीपूर्वी आधार कार्ड आणि पॅनकार्डची जोडणी करणे आवश्यत आहे. पण केंद्र सरकारने शुल्क माफीबद्दल एक चकार शब्दही काढला नाही.
पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक चेक करण्यासाठी लिंकवर पहा
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status
तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले आहे की नाही, याविषयी शंका असेल, तर घरबसल्या तुम्हाला सोप्या पद्धतीने स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे लागेल.
पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी लिंकवर पहा
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar
स्टेप 1: सर्वात अगोदर, आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे. त्यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकवर क्लिक करावे लागेल
स्टेप 2: याशिवाय तुम्हाला 10 आकड्यांचा पॅन क्रमांक आणि 12 आकडी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर व्ह्यू लिंकवर जाऊन आधार स्टेटवर क्लिक करावे लागेल.
स्टेप 3: त्यानंतर तुमचा 10 अंकी पॅन कार्ड क्रमांक आणि 12 अंकी आधार क्रमांक टाका, त्यानंतर व्ह्यू लिंकवर आधार स्टेट्सवर क्लिक करा. जर तुमचा आधार क्रमांक अगोदरच लिंक असेल तर आधार क्रमांक दिसेल. तुमचा आधार क्रमांक अपडेट नसेल तर तुम्हाला लिकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
आयकर विभागाने एसएमएसच्या माध्यमातून पॅन-आधारकार्ड लिकिंग स्टेट्स चेक करण्याचा पर्याय दिला आहे. त्यासाठी करदात्यांना 567678 अथवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवणे आवश्यक आहे. जर दोन्ही कार्ड जोडण्यात आले असतील, तर त्याची माहिती तुम्हाला मिळेल.
एसएमएस फॉर्मेट असा असेल : UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन कार्ड क्रमांक>
यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या ते पहा!
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आधार क्रमांक
- मोबाईल नंबर
पॅन कार्ड हे आधार क्रमांक आपण www.incometax.gov.in या संकेतस्थळावरती भेट द्यावी.
हे संकेतस्थळ सुरू होताच मुख्य पानावर आपल्याला होम पेज (home page) लिंक वरती पॅन विथ आधार (pan with aadhar) असे इंग्रजी भाषेत लिहिलेल दिसेल आणि या पर्यायावर आपण क्लिक (click) करा.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा