बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

रोजगार हमी विहिरीसाठी 4 लाख अनुदान ऑफलाईन व मोबाईल अँपने करू शकतात

 


मागेल त्याला विहीर 4 लाख अनुदान 










विहीर अनुदानसाठी हे अँप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👇👇👇


MAHA-EGS Horticulture/Well App


विहीर अनुदान योजना लाभार्थी निवड

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती.
  • भटक्या जमाती
  • नीरधीसूचित जमाती.
  • दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी.
  • स्त्री कर्ता असलेले कुटुंबे.
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे.
  • जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी.
  • इंदिरा आवास योजने खालील लाभार्थी.
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी.
  • सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी

योजनेसाठी लाभार्थी पात्रता

या योजनेसाठी लाभार्थी पात्रता जी आहे ती खालील प्रमाणे आहे.

  • लाभार्थ्यांकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे. म्हणजेच 40 आर किंवा ज्याला आपण एक एकर असे देखील म्हणू शकतो तर तेवढी जमीन असावी.
  • ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून ५०० मीटर विहीर नसावी.
  • दोन सिंचन विहिरीमधील १५० मीटर अंतरासाठी खालील अटी लागू करण्यात आलेल्या आहेत.
  • दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
  • लाभार्थीच्या सातबारावर अगोरच विहीर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच त्यांच्या ७/१२वर विहिरीची नोंद नसवी.
  • लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
  • लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा ल\लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र ०.४० पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे.

  • ७/१२ उतारा जो कि ऑनलाईन असावा.
  • ८ अ म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला तो देखील ऑनलाईन असावा.
  • जॉब कार्ड झेरॉक्स प्रत.
  • एखाद्या विहीर असेल परंतु ती जर सामुदायिक असेल तर अशावेळी सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...