नवीन विहिरीसाठी 4 लाख अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु
मनरेगा याजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्यक्रमाने विहिर मंजुर केली जाते
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- ईतर मागास वर्ग
- भटक्या जमाती
- विमुक्त जाती
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
- विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत शेतजमीन)
- अल्प भूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत शेतजमीन)
मनरेगा योजनेअंतर्गत सिंचन विहीरीसाठी अनुदान मिळवण्यासाठी लाभधारकाची पात्रता
- विहीर खोदण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे 1 एकर सलग शेतजमीन असावी.
- पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदणे गरेजेचे आहे.
- दोन विहिरींमध्ये 150 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही आणि खासगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
- लाभधारकाच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये.
- एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे 8-अ उतारा असावा.
- एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील, एकूण जमिनीचे सलग क्षेत्र 1 एकरपेक्षा जास्त असावे.
- अर्जदार हा जॉब कार्डधारक असावा.
सिंचन विहीरीसाठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा?
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी ग्रामपंचायतीकडे तसेच ऑनलाईन अर्जप्रणाली सुरू झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करता येतो. शासन निर्णयात या अर्जासाठीचा नमुना दिला असून तो तुम्ही खालील फोटोत पाहू शकता. त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला संमतीपत्र सुद्धा द्यावे लागते. संमतीपत्राचा नमुना शासन निर्णयासोबत जोडला आहे. तसेच शासन निर्णयाची लिंक खाली देत आहोत.
सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- सात-बारा उतारा
- आठ-एक उतारा
- जॉब कार्डची प्रत
- जमिनीचा पंचनामा
- गरज भासल्यास सामुदायिक विहीर करार.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा