गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

महाराष्ट्र कृषी विभागात 218 जागांसाठी भरती

 महाराष्ट्र कृषी विभागात 218 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील: 

पदाचे नाव

पद संख्या

1

वरिष्ठ लिपिक

105

2

सहाय्यक अधीक्षक

53

Total

158

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंक वर जा   

https://ibpsonline.ibps.in/campmar23/

विभागीय तपशील: 

अ. क्र.

विभाग  

पद संख्या

वरिष्ठ लिपिक

सहाय्यक अधीक्षक

1

औरंगाबाद

11

04

2

पुणे

13

05

3

ठाणे

18

08

4

नाशिक

12

06

5

कोल्हापूर

14

04

6

नागपूर

14

10

7

अमरावती

09

10

8

 लातूर

14

06

Total 

105

53

Grand Total

158

शैक्षणिक पात्रता: 

1.      पद क्र.1: (i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

2.      पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: अमागास: ₹720/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023

Recruitment of Senior Clerk, Assistant Superintendent, Steno Typist, Stenographer (Lower Grade) and Stenographer (Higher Grade) in the Agriculture Department on the Establishment of various Recruitment Authorities under the Commissionerate of Agriculture-2023 / कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी भरती-2023

Important Events

Dates

Commencement of on-line registration of application

06/04/2023

Closure of registration of application

20/04/2023

Closure for editing application details

20/04/2023

Last date for printing your application

05/05/2023

Online Fee Payment

06/04/2023 to 20/04/2023

 




मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म महाराष्ट्र 2023 लाभ, पात्रता,कागदपत्रे,अर्ज

 नमस्कार मित्रांनो, आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शासन परिपत्रक GR, काय आहे हि योजना, उद्दिष्ट्य लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. मित्रांनो जर तुम्हला लहान मुलगी असेल तर हि योजना तिच्यासाठीच आहे. या योजनेचे लाभ हे सर्वाधिक मिळणारे आहेत. त्यामुळे या योजनेचे लाभ नक्कीच वाचा. पात्र असल्यास अवश्य या योजनेचा लाभ घ्या.



माझी कन्या भाग्यश्री योजना

राज्यात १३ फेब्रुवारी २०१४ रोजी सुकन्या योजना सुरू करण्यात आली. सुकन्या योजनेचा लाभ दिनांक १ जानेवारी २० पासून जन्मणाऱ्या मुलींकरता अनुज्ञेय राहणार आहे. केंद्र शासनाने बेटी बचाव बेटी पढाव योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू केलेली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे. त्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे. या केंद्रपुरस्कृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद व जालना यांची निवड करण्यात आलेली आहे. मुलींचा जन्मदर १,००० मुलांच्या मागे ८९४ इतका आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे आणि मुलांनी एकाच मुलींचाही जन्मदर वाढविणे या उद्दिष्टाने बेटी बचाव बेटी बेटी पढाव या योजनेच्या धर्तीवर मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, अशा सुरू असलेली सुकन्या योजना विलीन करून माझी कन्या भाग्यश्री ही एक नवीन योजना राबविण्यात येत आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट्ये –

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट्ये प्रमाणे असतील.

  • महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण आरोग्यामध्ये सुधारणा करणे.
  • त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे.
  • मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मकता आणणे.
  • बालिका भ्रूणहत्या रोखणे.
  • बालविवाह रोखणे.
  • मुलांनी इतकाच मुलींचा ही जन्मदर वाढवणे

माझी कन्या भाग्यश्री योजना शासन निर्णय –

राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्दिष्टांसाठी शासन निर्णयान्वये सुकन्या योजना दिनांक १ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये १ लाख एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल. अशी तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे.

माझी कन्या भाग्यश्री या नवीन योजनेमध्ये सध्या सुरू असलेली सुकन्या योजना की विलीन करण्यात आलेली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचे कायम ठेवून त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षे वयाची होईपर्यंत खालील तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे लाभ देण्यासाठी तसेच दारिद्र रेषेखालील एपीएल रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलीसाठी तक्ता क्रमांक दोन मधील एक लाभ देण्यात येणार आहेत.

माझी कन्या भाग्यश्री योजना लाभार्थी पात्रता –

  • जर एकुलती एक मुलगी असेल, आणि मातेने कुटुंब नियोजन केले असेल, तर ती मुलगी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
  • जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
  • दोन मुली व मातेने कुटुंब नियोजन केले असेल, तर ती मुलगी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना अटी आणि लाभ काय आहेत?

१.मुलीच्या जन्माच्या वेळी

सध्याच्या परंपरेनुसार कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा केला जातो. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमुळे मुलीचा जन्मोत्सव साजरा करण्यास प्रेरित होतील. जनमानसाच्या मानसिकतेत बदल होईल.

२. मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी –

कुटुंबामध्ये मर्यादित उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध असल्यामुळे, त्या स्रोतांचा उपयोग मुलांच्या पालन पोषणासाठी केला जातो. काही वेळा मुलींकडे याबाबतीत दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आर्थिक मदत दिल्यामुळे मुलींच्या पालन पोषणासाठी त्यांच्या आरोग्य दर्जा उंचावणे तसेच त्या मुलीस करावयाचे लसीकरण व इतर खर्चासाठी कुटुंबास मदत होईल.

३. मुलगी इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता ६ वी ते १२ वीत आर्थिक मदत –

या आर्थिक मदतीचे उद्दिष्ट्य मुलींचे शिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून पुढील मातांची पिढी सुशिक्षित होईल. त्यामुळे त्यांची मुले ही आरोग्यसंपन्न असतील. तसेच त्या शिक्षित मुली मुलामुलींमध्ये भेदभाव करणार नाहीत.

४. वयाच्या १८व्या वर्षीची आर्थिक मदत –

या आर्थिक मदतीचा उद्दिष्ट हे मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्याचे आहे. या शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण माता या आरोग्यसंपन्न मुलास जन्म देतील. त्यांच्या मुलांनादेखील शिक्षित करतील आणि मुला-मुलींना सामान ठेवतील.

५. मुलीचा जन्म झाल्यानंतर आजी-आजोबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार –

समाजातील बऱ्याच कुटुंबातील सासू-सासरे यांच्याकडून मुलगाच पाहिजे, असा दबाव सुनेवर टाकला जातो. त्यासाठी जन्म देणाऱ्या मातेच्या सासु-सासर्‍यांना एक सोन्याचे नाणे (रुपये ५,००० मर्यादेपर्यंत) आणि प्रमाणपत्र देऊन माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन किंवा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन किंवा राष्ट्रीय बालिका दिन किंवा महिला दिन अशा प्रसंगी सत्कार करण्यात येईल. यामुळे कुटुंबाचा समाजात आदर वाढेल.

६. गावाचा गौरव –

या योजनेअंतर्गत समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी ज्या गावांमध्ये मुला मुलीचे लिंग गुणोत्तर एक हजार पेक्षा जास्त असेल, अशा गावास माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्यामार्फत रुपये ५ लाखाचे पारितोषिक दिले जाईल. संबंधित मिळालेली रक्कम ग्रामपंचायतीने गावातील मुलींच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक राहील.

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी आणि शर्ती –

सुकन्या योजनेचा समावेश नव्याने सुरू करण्यात आलेल्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेत करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये लागू करण्यात येत आहेत. तसेच सुकन्या योजनेतील मुलींना माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

  • अर्जदार बालिकेचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र रेषेवरील एपीएल पांढरे रेशन कार्डधारक दोन मुलींना लागू असेल.
  • विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तिने इयत्ता दहावीचे परीक्षा उत्तीर्ण होणे व १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेची जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या, तर या दोन्ही मुली प्रकार दोनचे लाभार्थी प्रमाणे योजनेस पात्र असतील.
  • बालगृहातील अनाथ मुलींसाठी योजना अनुज्ञेय राहील.
  • एखाद्या परिवाराने अनाथ मुली दत्तक घेतले असेल, तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय ० ते ६ वर्ष सहा किंवा सहा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • प्रकार एक च्या लाभार्थी कुटुंबास एका मुलीनंतर व प्रकार दोनच्या लाभार्थी कुटुंबास दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
  • सदर योजनेअंतर्गत १८ वर्षानंतर जी रक्कम रुपये १ लाख मिळणार आहे, त्यापैकी किमान रुपये १०,०००/- हे मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात ती स्वतःच्या पायावर उभा असेल.

माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 ची कागदपत्रे

अर्जदाराचे आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
पत्ता पुरावा
मोबाइल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 साठी अर्ज कसा करावा?

राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या MKBY 2023 च्या अंतर्गत अर्ज करायचा असेल, तर त्यांनी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज पीडीएफ महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे नाव, आई-वडिलांचे नाव, मुलीची जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी भरावी लागेल.सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे फॉर्मशी जोडून तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जमा करावी लागतील. अशा प्रकारे आपला माझा कन्या भाग्यश्री योजना मधील अर्ज करावा लागेल.


सुलाई शासकीय योजना WhatsApp ग्रुप 









शनिवार, १ एप्रिल, २०२३

मागील वर्षाचे EWS प्रमाणपत्र चालू वर्षासाठी स्वीकारले जाणार

 


मागील वर्षाचे EWS प्रमाणपत्र चालू वर्षासाठी स्वीकारले जाणार




आधार कार्ड पैन कार्ड लिंक करा

 मुदतवाढ दिली

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अखेर आधार कार्ड-पॅनकार्ड जोडणीला मुदतवाढ दिली. गेल्यावर्षी निश्चित केल्याप्रमाणे ही मुदतवाढ 31 मार्च 2023 ही होती. आता ही तारीख वाढवून 30 जून, 2023 करण्यात आली आहे. सीबीटीडीनुसार, ही जोडणी करण्यासाठी नागरिकांना थोडी मुभा देण्यात आली आहे. ज्यांनी आतापर्यंत ही जोडणी केली नाही. त्यांनी 30 जूनपर्यंत ही जोडणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पाचवेळा मुदतीत वाढ करण्यात आली आहे.



पॅनकार्ड होईल निष्क्रिय


आता ही शेवटची संधी नागरिकांना देण्यात आली आहे. जर त्यांनी 30 जूनपर्यंत ही जोडणी केली नाही तर त्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल. त्यांना पुन्हा जोडणीची संधी देण्यात येणार नाही. पॅनकार्ड निष्क्रिय झाल्याबरोबर त्यांचे बँक खाते, डीमॅट खाते इतर ठिकाणाचा व्यवहार ठप्प होईल. त्यांना व्यवहार करताना अडचणी येतील. त्यामुळे या अंतिम मुदतीपूर्वी आधार कार्ड आणि पॅनकार्डची जोडणी करणे आवश्यत आहे. पण केंद्र सरकारने शुल्क माफीबद्दल एक चकार शब्दही काढला नाही.

पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक चेक करण्यासाठी लिंकवर पहा 

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status


तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले आहे की नाही, याविषयी शंका असेल, तर घरबसल्या तुम्हाला सोप्या पद्धतीने स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे लागेल.

पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक  करण्यासाठी लिंकवर पहा 

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar

स्टेप 1: सर्वात अगोदर, आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे. त्यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकवर क्लिक करावे लागेल

स्टेप 2: याशिवाय तुम्हाला 10 आकड्यांचा पॅन क्रमांक आणि 12 आकडी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर व्ह्यू लिंकवर जाऊन आधार स्टेटवर क्लिक करावे लागेल.

स्टेप 3: त्यानंतर तुमचा 10 अंकी पॅन कार्ड क्रमांक आणि 12 अंकी आधार क्रमांक टाका, त्यानंतर व्ह्यू लिंकवर आधार स्टेट्सवर क्लिक करा. जर तुमचा आधार क्रमांक अगोदरच लिंक असेल तर आधार क्रमांक दिसेल. तुमचा आधार क्रमांक अपडेट नसेल तर तुम्हाला लिकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

आयकर विभागाने एसएमएसच्या माध्यमातून पॅन-आधारकार्ड लिकिंग स्टेट्स चेक करण्याचा पर्याय दिला आहे. त्यासाठी करदात्यांना 567678 अथवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवणे आवश्यक आहे. जर दोन्ही कार्ड जोडण्यात आले असतील, तर त्याची माहिती तुम्हाला मिळेल.

एसएमएस फॉर्मेट असा असेल : UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन कार्ड क्रमांक>

यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या ते पहा!

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • आधार क्रमांक
  • मोबाईल नंबर

पॅन कार्ड हे आधार क्रमांक आपण www.incometax.gov.in या संकेतस्थळावरती भेट द्यावी.

हे संकेतस्थळ सुरू होताच मुख्य पानावर आपल्याला होम पेज (home page) लिंक वरती पॅन विथ आधार (pan with aadhar) असे इंग्रजी भाषेत लिहिलेल दिसेल आणि या पर्यायावर आपण क्लिक (click) करा.


सोमवार, २७ मार्च, २०२३

आयुष्मान भारत योजना 5 लाख पर्यंत मोफत उपचार

 आयुष्मान भारत योजना' ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना 'आयुष्मान भारत गोल्डन कार्ड' (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मोदी केअर योजना म्हणूनही ओळखले जाते.

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्याखालील प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येईल. 10 कोटी बीपीएल धारक कुटुंब (सुमारे 50 कोटी लोक) या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम असतील.भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी 14 एप्रिल 2018 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातून या योजनेचा शुभारंभ केला. 


वैशिष्ट्ये 

या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील सर्व गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करेल. याचा अर्थ असा की या योजनेस पात्र असणारी कोणतीही गरीब व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकते.

आयुष्मान भारत योजनेची गावाची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर जा


आयुष्मान भारत योजन चे  कार्ड डॉनलोड करण्यासाठी खालील लिंकवर जा

आयुष्मान भारत योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे :-

  1. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बीपीएल कुटुंबाला शासना कडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल. या योजनेचा लाभ शासना कडून सुमारे 50 कोटी बीपीएल कुटुंबांना देण्यात येणार आहे.
  2. या योजनेतर्गत पात्र लाभार्थींना शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतील.
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे.
  4. एखाद्याचे नाव लाभार्थींच्या यादीमध्ये नसेल आणि ते या योजनेस पात्र असतील तर आयुष्मान मित्राच्या साहाय्याने या योजनेअंतर्गत त्याची नोंदणी केली जाऊ शकते. एवढेच नाही तर गोल्डन कार्डही रुग्णालयात बनवले जाते.
  5. या योजनेत, अनेक प्रकारच्या गंभीर आजारांवर उपचार केले जातील, ज्यामध्ये रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्चही सरकारकडून खर्च करावा लागतो.
  6. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे आधार कार्ड आवश्यक आहे.
  7. आपल्या शहरातील किंवा खेड्यातील कोणत्या रुग्णालयाला या योजनेचा लाभ मिळत आहे.


आयुष्मान भारत गोल्डन कार्ड e-kyc कुठे व कशी करता येईल ?

आपल्या शहरातील व गावातील CSC Center किव्हा आपले सरकार सेवा केंद्र यांचाशी संपर्क साधा व यादीत आपले नाव चेक करा नाव असल्यास सदरील केंद्र चालक यांनी सागीतल्या प्रमाणे कागद पत्र सादर करा व आपली आयुष्मान भारत गोल्डन कार्ड e-kyc करून घ्या..

जर आपण e-kyc केली नाही तर आपण वरील योजने पासून वंचित राहणार...

सदरी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड e-kyc नि शुल्लक आहे.

बुधवार, २२ मार्च, २०२३

आता राज्य मध्ये सरकारी नोकरी नाही फक्त ९ खाजगी कंपनी मध्ये होणार भरती शासनाचा नवीन GR

आता राज्य मध्ये  सरकारी नोकरी नाही फक्त ९ खाजगी कंपनी मध्ये होणार भरती शासनाचा नवीन GR 

Privatization of Government Jobs : शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी नोकरभरती (Government Job) ही मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या खासगी नऊ कंपन्यामार्फत केली जाणार आहे. तसा निर्णय उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांनी घेतला आहे. प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं आहे. आता या धोरणाची व्याप्ती वाढवत सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण (Privatization) करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारशी सबंधित अन्य कार्यालयातील बाह्य यंत्रणेमार्फत नोकरभरती केली जाणार आहे.



प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यानुसार सुरुवातीला सफाई कामगार, शिपाई अशी चतुर्थ श्रेणीतील काही कर्मचारी बाह्ययंत्रणेतून घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता या धोरणाची व्याप्ती वाढवत सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

या नऊ कंपन्यांमार्फत होणार नोकरभरती

मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) नोकरभरती धोरणास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत उद्योग-कामागार विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णयही जारी केला आहे. या निर्णयानुसार आता कोणत्याही विभागाला नोकरभरती (Government Job) करताना सरकारने नेमलेल्या मनुष्यबळ पुरवठा एजन्सीकडूनच करावी लागेल. अ‍ॅक्सेंट टेक सर्व्हिसेस लि., सी.एम.एस. आयटी सव्‍‌र्हिसेस लि., सी.एन.सी ई-गव्‍‌र्हनन्स सर्व्हिसेस इंडिया लि., इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि., क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि., एस-2 इन्फोटेक इंटरनॅशनल लि., सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि., सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि., उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस या नऊ कंपन्यांमार्फत नोकरभरती होणार आहे. 


मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थांची नेमणूक पाच वर्षांसाठी

मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थांची नेमणूक पाच वर्षासाठी करण्यात आली आहे. तसेच संस्थाच्या पॅनलचे संपूर्ण व्यवस्थापन करण्यासाठी कामगार आयुक्तांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा या संस्था करणार असून त्याच्याकडून सरकार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थाना भरती करावी लागणार आहे.

GR पाहण्यासाठी खाली लिंक पहा 👇

https://drive.google.com/file/d/1FqiUNNdd1lLgduxicEj8wHWfSAtOeozt/view?usp=drivesdk


मंगळवार, १४ मार्च, २०२३

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी पाचवी यादी

  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोसाहनपर लाभ योजना



महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेची पाचवी यादी जाहीर 

 

 यात शिंदखेडा तालुक्यातील एकाही गावाचे यादीत नाव नाही
फक्त शिरपूर चे 2गाव व साक्री चे 1

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...