बुधवार, २१ जून, २०२३

*PM किसान योजनेचा 14 वा हप्ता व महाराष्ट्र शासनाचे 2000 असे एकूण 4000 येत्या 10 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे*

 *PM किसान योजनेचा  14 वा हप्ता व महाराष्ट्र शासनाचे  2000  असे एकूण 4000 येत्या 10 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे*




ज्या शेतकऱ्यांना PM किसान मानधन मिळत नसेल अश्या शेतकऱ्यांनी *PM किसान ई kyc व बँक  kyc या दोन्ही ई KYC करू घेणे आवश्यकता आहे.*



*PM किसान नवीन नोंद चालु  आहे*


आवश्यक कागदपत्रे

1)आधार  कार्ड

2)7/12

3)बँक  पुस्तकं

4)रेशन कार्ड


PM किसान च्या आवश्यक साईड


1) पी एम किसान चा तुमचा तपशील पाहण्यासाठी


https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx


2) पी एम किसान इ केवायसी करण्यासाठी


https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx


3) पी एम किसान मध्ये आधार वरील नाव दुरुस्ती साठी


https://pmkisan.gov.in/EditAadharName_Pub.aspx


4) पी एम किसान नवीन नोंदणीसाठी


https://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.aspx


*पीएम किसान बद्दल काही अडचण असेल तर दर शुक्रवारी तहसील कार्यालय किंवा तुमच्या कृषी सहाय्यक याच्याशी संपर्क साधा*

शनिवार, २७ मे, २०२३

*10वी पासवर महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग मध्ये नवीन 446 जागांसाठी भरती जाहीर*

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग” मध्ये “पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, परिचर, उच्च श्रेणीचे लघुलेखक, निम्न श्रेणीचे लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, यांत्रिकी, बाष्पक परिचर पदाची भरती सुरु झाली आहे


.

🔔 पदाचे नाव: पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, परिचर, उच्च श्रेणीचे लघुलेखक, निम्न श्रेणीचे लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, यांत्रिकी, बाष्पक परिचर.

🔔  रिक्त पदे: 446 पदे

🔔  शैक्षणिक पात्रता: पशुधन पर्यवेक्षक: 10वी उत्तीर्ण/ पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य.

🔔  वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे. मागासवर्गीय: 18-43 वर्षे.

🔔  फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- , मागासवर्गीय: ₹900/-.

🔔 नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

🔔  अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.

🔔  अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 27 मे 2023.

🔔  अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023.

♦ शैक्षणिक पात्रता – 

  • Livestock Supervisor: 10th Pass, Livestock Supervisor Course Or Equivalent.
  • Attendant: 10th Pass Or Equivalent
♦ महत्वाच्या लिंक :
https://ibpsonline.ibps.in/idbiemar23/

गुरुवार, १८ मे, २०२३

सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी मुलाखतींचे या तारखेस धुळ्यात आयोजन

 

सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी मुलाखतींचे या तारखेस धुळ्यात आयोजन

* भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदाच्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. (Interview for Army Officer Pre Training held at 19 May Dhule news)या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी शुक्रवारी (ता. १९) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखतीला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. नीलेश पाटील यांनी केले आहे.सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी २९ मे ते ७ जून २०२३ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक-५३ साठी प्रशिक्षण देण्यात येईल. एस.एस.बी प्रवेशासाठी कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी परीक्षा (एनडीए) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असावे.एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये उमेदवार पास झालेला असावा. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी नियुक्तिपत्र असावे. तसेच विद्यापीठ एन्ट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस यादीत नावे असणारे उमेदवार पात्र राहतील.हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुलाखतीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे १९ मेस सकाळी अकराला उपस्थित राहावे.मुलाखतीस येताना विद्यार्थ्यांनी https://www.facebook.com/DSW.Maharashtra या फेसबुकवरील वेबपेजवर सैनिक कल्याण विभाग, पुणेवर सर्च करून त्यामधील एसएसबी-५३ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पूर्ण भरून सोबत आणावी. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक०२५३-२४५१०३२, ईमेल pctcoic@yahoo.in वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पाटील यांनी केले आहे.

शनिवार, १३ मे, २०२३

बियाणे अनुदान योजना 2023ऑनलाइन अर्ज सुरु.

 नमस्कार शेतकरी बंधूंनो आता पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शासकीय अनुदानावर बियाणे हवे असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या कारण बियाणे अनुदान योजना 2023 ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. तरी या योजनेचा भरपूर शेतकर्‍यांनी फायदा घ्यावा. चला तर मित्रांनो आता आपण बघूया या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करतात.



अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ?

महाडीबीटी पोर्टल वर खत बियाणे औषधे याचा अर्ज करत असताना लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.

1) 7/12 उतार

2) 8- अ उतारा

3) आधार कार्ड

4) बँक पासबुक

महाडीबीटी Maha dbt  राज्य  शासनाच्या या  पोर्टलवर शेतकरी योजना शीर्षका या अंतर्गत बी -बियाणे, औषधे आणि  खते इत्यादी घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा हि उपलब्ध करून देण्यात आली आहे.  आपण यामध्ये तुर, मुग,सोयाबीन,मका ,कापुस, उडीद, खरीप ज्वारी या बियाणे करीत तुम्ही  अर्ज हे करू शकता. या  योजनेमध्ये  अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची/ लाभार्थ्यांची  निवड प्राप्त सर्व अर्जा मधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याकजी निवड हि करण्यात येईल. या लॉटरी पद्धतीद्वारे  ज्या शेतकरी बंधूंची निवड होईल त्याच लाभार्थ्याला  अनुदाना स्वरूपावर बी- बियाणे मिळेल. अर्ज ज्या पिकाच्या बियाण्यासाठी केला आहे, उपलब्धतेनुसार त्याच  पिकाचे बियाणे व वाण  मिळेल.


▶बियाण्यास १००% अनुदान हे पिक प्रात्यक्षिका करिता राहील .

▶कमाल ५०% मर्यादेपर्यंत  प्रमाणित बियाण्याकरिता  अनुदान दिले जाईल.

*जर तुम्हाला शासकीय योजना विषयी अधिक माहिती साठी  आमच्या वेबसाईट भेट द्या* 

                                http://sulaicomputer.com





मंगळवार, ९ मे, २०२३

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत

 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत.




अ.क्र.योजनासविस्तर माहिती
1योजनेचे नांवअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत.
2योजनेचा प्रकारराज्य योजना
3योजनेचा उद्देशअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे राहणीमानात बदल व्हावा, या उद्देशाने सदरची योजना शासन पत्र क्रमांक एसटीएस-2011/प्र.क्र.439/अजाक-1, दिनांक 6 डिसेंबर, 2012 पासुन कार्यान्वीत करण्यांत आली.सदर योजनेंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करण्यांत येते.
4योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांवअनूसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी
5योजनेच्या प्रमुख अटीसदरची योजना एकूण 1 ते 13 अटी व शर्तींच्या अधिन राहून राबविण्यांत येते त्यापैकी महत्वाच्या तीन अटी खालील प्रमाणे-
  • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
  • स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
  • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख पन्नास हजार फक्त.) इतकी राहील, स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.
6दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुपमिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने.
7अर्ज करण्यांची पध्दतसंबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य अर्ज करु शकतील.
8योजनेची वर्गवारीआर्थिक उन्नती / रोजगार निर्मिती
9संपर्क कार्यालयाचे नांवसंबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय

शनिवार, ६ मे, २०२३

PM Kisan Samman nidhi योजना पुन्हा सुरु २००० रुपयासाठी करा अर्ज

 

PM Kisan Samman nidhi योजना पुन्हा सुरु २००० रुपयासाठी करा अर्ज


तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर PM-Kisan योजनेसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे

PM Kisan Samman nidhi संदर्भातील अर्ज पक्रिया.

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या २००० रुपयांच्या हफ्त्यासाठी कोणती प्रोसेस असते ते समजवून घेवूयात.

  • pm kisan sanman nidhi.gov.in या संकेत स्थळावर शेतकऱ्यांना त्यांची ऑनलाईन नोंदणी करावी लागते.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढावी.
  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट, संबधित कागदपत्रे आणि तलाठी याचा फॉर्म तहसील कार्यालय येथे सादर करावा.

PM किसान नोंदणी साठी कागदपत्रे

  1. आधार कार्ड (मोबाईल लिंक पाहिजे )
  2. बँक पासबुक
  3. 7/12 डिजिटल
  4. रेशन कार्ड RC नंबर
  5. मोबाईल 

शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती farmer personal details.

वैयक्तिक माहिती या सदरामध्ये शेतकऱ्याने खालीलप्रमाणे माहिती भरणे आवश्यक आहे.

  • शेतकऱ्याने त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, राष्ट्र, नाव, लिंग आणि कॅटेगरी व्यवस्थित टाकावी.
  • शेतकऱ्यांचा प्रकार या मध्ये जर शेतकरी लहान वर्गातील असेल म्हणजे १ ते २ हेक्टर जमीन असेल तर small हा पर्याय निवडावा आणि यापेक्षा मोठा असेल तर other हा पर्याय निवडावा.
  • शेतकऱ्याने त्यांचे खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेचे नाव, ifcs code, खाते नंबर इत्यादी माहिती व्यवस्थित टाकावी.
  • शेतकऱ्याने त्यांचा पूर्ण पत्ता, पोस्टल पिनकोड नंबर, ८ अ वरील खाते नंबर, राशन कार्ड नंबर, जन्मतारीख इत्यादी माहिती व्यवस्थित टाकावी.


शुक्रवार, ५ मे, २०२३

पीएम किसान चा 14 वा हप्ता मे महिन्यात होणार जमा, केवायसी आवश्यक

 

पीएम किसान चा 14 वा हप्ता मे महिन्यात होणार जमा, केवायसी आवश्यक





शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १४ वा हप्ता मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक आधारला जोडून घ्यावे. 

दरम्यान, फेब्रुवारी २०२३ दरम्यान १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान १४ वा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र मे महिन्यात १४ वा हप्ता जमा होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

यामध्ये सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दर तीन महिन्याला २ हजार रुपये रक्कम देण्यात येते. म्हणजे वर्षभरात ६ हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात येतात. दरम्यान 14 व्या हप्त्यासाठी ई-केवायसी करून घ्यावी.

तसेच भूमी अभिलेख नोंदी पोर्टलवर अपडेट कराव्यात असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे महाराष्ट्र राज्य अंमलबजावणी प्रमुख आहेत.

आजवर या योजनेचे १३ हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांचा खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना आता १४ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. याचा शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत आहे.

PM किसान E kyc खालील लिक वर जा

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

 तुमच्या PM किसा खात्या विषयी माहितीसाठी खालील लिंकवर जा 

https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx

सुलाई शासकीय योजना व नोकरीं विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 


   https://chat.whatsapp.com/FRxJeOEEy3r2bCSCHDiI5R 


मंगळवार, २ मे, २०२३

६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू

 


६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू (sand) आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • एक पासपोर्ट फोटो
  • मोबाईल क्रमांक ओटीपी साठी

अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या नवीन धोरणात काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यात, sand for sell

  • 10 जून ते 30 सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी असेल आणि या कालावधीमध्ये वाळू उत्खनन करता येणार नाही.
  • वाळूचे उत्खनन सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या कालावधीतच करता येईल.
  • नदीपात्रात जास्तीस्त जास्त 3 मीटर इतक्या खोलीपर्यंत निविदाधारक किंवा ठेकेदारास वाळूचे उत्खनन करता येईल.
  • रेल्वे किंवा रस्ते पुलाच्या कोणत्याही बाजूनं 600 मीटर अंतराच्या आत वाळूचे उत्खनन करता येणार नाही.

वाळूसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक जा


वाळू वाहतुकीचे नियम

नवीन वाळू धोरणानुसार, वाळू वाहतुकीसाठी पुढील नियम सांगितले आहेत.


वाळू मागणीची प्रक्रिया कशी असेल?
* ज्या ग्राहकांना वाळू हवीय, त्यांना महाखनिज (Mahakhanij) या पोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणं आवश्यक राहिल. ज्यांना हे शक्य नाही, त्यांना सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंद करावी लागेल. यासाठी लागणारं शुल्क जिल्हाधिकारी ठरवतील.
* याशिवाय मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही वाळूची मागणी नोंदवता येणार आहे. सध्या यावर राज्य सरकारचं काम सुरू आहे.
* एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 मेट्रिक टन वाळू मिळेल. अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्यानंतर वाळूची मागणी करता येईल.
* वाळूची मागणी नोंदवल्यानंतर 15 दिवसांच्या आत वाळू डेपोमधून वाळू घेऊन जाणे ग्राहकास बंधनकारक असेल. वाळू वाहतुकीचा खर्च ग्राहकास करावा लागेल.
* वाळू डेपोतून वाळू विक्रीसाठी ग्राहकाचा आधार क्रमांक अनिवार्य राहिल.
 
वाहतुकीचा खर्च धरून प्रती ब्रास 3,000 रुपये लागणार
शासनाच्या डेपोतून प्रती ब्रास 600 रुपये दरानं वाळू मिळणार असली तरी या वाळूवर जीएसटी लागणार का आणि गौण खनिज कर आकारला जाणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

वाळू स्वस्त झाली पण धोरणातील नवीन बदल काय आहेत

  1. राज्यातील नागरिकांना स्वस्त किमतीमध्ये वाळू मिळावी त्याचप्रमाणे अनधिकृत उत्खननाला आळा बसावा या उद्देशाने शासनामार्फत अपर जिल्हाधिकारी यांच्यास्तरावर समिती स्थापन करून वाळू उत्खनन, साठवणूक व डेपो व्यवस्थापन आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे डेपोतून वाळू विक्री करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
  2. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय, खनिकर्म विभाग, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेले आदेश, अटी व शर्ती विचारात घेऊन पर्यावरण अनुमती व खाणकाम आराखडा इत्यादीबाबत कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे.
  3. याअगोदर प्रति ब्रास या परिमाणानुसार वाळूची विक्री करण्यात येत होती. त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून आता प्रती टनामध्ये वाळू विक्री करण्यात येणार आहे.
  4. वाळू उत्खनन करण्यासाठी इ निविदा काढण्यात येईल.
  5. वाळूची विक्री करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करण्यात येईल. महाखनिज वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येईल किंवा यासाठी शासनाने नवीन वेबसाईट तयार केली तर त्यावर अर्ज कारवा लागेल.
  6. वाळू विक्री करण्यासाठी वाळू डेपो निर्मिती करण्यात येईल. हा वाळू डेपो शहर किंवा गावाजवळ असेल. शक्यतो शासकीय जमिनीवर हा वाळू डेपो निर्माण करण्यात येईल. जर शासकीय जमीन मिळाली नाही तर भाडे तत्वावर खाजगी जमीन घेवून त्या ठिकाणी वाळू डेपोची निर्मिती करण्यात येईल.
  7.  नदी असेल किंवा खाडी पात्र त्या ठीकांपासून ते वाळू डेपो पर्यंतचे क्षेत्र Geo fencing केले जाणार आहे.
  8. वाळू डेपो जवळच वाळूचे वजन करण्यात येईल शिवाय वाळू डेपोच्या परिसरात क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात येणार असून परीसारामध्ये काटेरी कुंपण करण्यात येणार आहे.
  9. जी वाहने वाळू वाहतूक करणार आहेत त्या वाहनांना जीपीएस बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
  10. डेपोतील वाळू संपेपर्यंत किंवा तीन वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी वाळू निविदा काढण्यात येणार आहे.
  11. जे वाहने वाळूची वाहतूक करणार आहेत त्यांना विशिष्ट रंग देण्यात येणार आहे.
  12. वाळू डेपोपासून ज्या ठिकाणी नागरिकांना वाळूची वाहतूक करायची असेल तो खर्च नागरिकांना करावा लगणार आहे.

तर अशा पद्धतीने वाळूचा लिलाव बंद करण्यात आला असून आता वाळू डेपोतूनच वाळू मिळणार आहे. त्यासाठी कोणत्या पद्धतीने नियम व अटी शासनाकडून लागू केल्या जाणार आहेत या विषयी अगदी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतली आहे.

यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल महाखनीज या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करा.


शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ! आता मागेल त्याला योजना मिळणार

कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ! आता मागेल त्याला योजना मिळणार




शेतकऱ्यांना दिलासा देत कृषी विभागाकडून 25 एप्रिल 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना मागील ती योजना मिळणार आहे.

MahaDBT मागेल त्याला योजना

हा शासनाचा उपक्रम मागेल त्याला योजना या नावाने ओळखला जाणार असून यामध्ये शेततळे, फळबाग, प्लास्टिक अस्तरीकरण, कॉटन श्रेडर, बीबीएफ पेरणी यंत्र, ठिबक, तुषारसह अनेक योजनांचा समावेश असणार आहे.



राज्यातील शेतकऱ्यांना शेती करत असताना विविध नैराश्यातून सामोरे जावे लागते, त्यासाठी त्यांना आर्थिक (Financial) मदत व विविध घटकांचे वाटप महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अनुदान तत्त्वावर शासनाकडून करण्यात येते.

2023-24 साठी 1 हजार कोटी मंजूर

त्या अनुषंगाने आता मागील त्याला शेततळे, फळबाग, प्लास्टिक अस्तरीकरण, कॉटन श्रेडर, बीबीएफ पेरणी यंत्र, ठिबक, तुषार हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्थापित आहे. या विविध योजनांकरता चालू वर्ष 2023-24 साठी 1 हजार कोटी रूपये नियतव्यय प्रस्तावित आहेत.

शासन परिपत्रक सुरू

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेला घटक मागणी केल्यानंतर तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठीचा शासन परिपत्रक सुरू करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना सदर घटक/बाब कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रचलित योजनाअंतर्गत व त्यांच्या ठरविण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार उपलब्ध करून देण्यात येतील, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • मागेल त्याला योजना या अंतर्गत विविध योजनांसाठीचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे (DBT Transfer) वितरित करण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत/घटकांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना यापूर्वी शेतकऱ्यांनी कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नाही याची खात्री करावी.
  • सदर योजनेची कृषी विभागामार्फत प्रचार प्रसिद्धी स्थानिक पातळीवर करण्यात यावी.

आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात-

7/12 व 8 अ,

बँक पास बुक,

आधार कार्ड,

 यंत्राचे कोटेशन,

 परिक्षण अहवाल,

 जातीचा दाखला.





गुरुवार, २० एप्रिल, २०२३

महाराष्ट्रात सलोखा योजना जाहीर ! आता शेतजमिनीची अदला बदल होणार सोपे

 

शेतजमीन मालकीवरून सुरु झालेला भाऊबंदकीचा वाद मिटणार ! सरकार सलोखा योजना राबवणार ; नेमकी कशी असेल ही योजना

 

शेतजमिनीचा ताबा व वहीवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटववण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लावण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु.1000/- व नोंदणी फी नाममात्र रु.1000/- आकारण्याबाबत सवलत देण्याची “सलोखा योजना” राबववण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

सलोखा योजना महाराष्ट्र
सलोखा योजना महाराष्ट्र 2023 

शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतजमिनीचे वाद काही नवीन नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून काही शेतकरी जमिनीच्या वादातून न्यायालयात जात आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे (औद्योगिकीकरण) शहरीकरणामुळे (शहरीकरण) शेतजमिनीची मागणी वाढली. शहरालगतच्या जमिनींना सोन्यासारखा भाव मिळू लागला. त्यामुळे तणाव वाढला. मात्र, या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आता 'सलोखा योजना' आणली आहे. यासाठी नाममात्र 1000 रुपये मुद्रांक शुल्क आणि 1000/- रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.

शेतजमिनी ताब्यात घेण्यावरून शेतकऱ्यांमध्ये अनेक वाद आहेत. त्या वादांवर तोडगा काढण्यासाठी आणि समाजात सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी ही सलोखा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत, एका शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या शेतजमीनीला दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर केलेल्या शेतजमिनीच्या अदलाबदलीबाबत नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाईल, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. (पहिल्या शेतकऱ्यालाच्या जमिनीला दुसऱ्या शेतकऱ्याचे नाव).



सलोखा योजना Highlights 

योजनासलोखा योजना महाराष्ट्र
व्दारा सुरुमहाराष्ट्र सरकार
योजना आरंभ 3 जानेवारी 2023
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
अधिकृत वेबसाईट----------------------------------
उद्देश्यशेतजमिनी ताब्यात घेण्याबाबत शेतकऱ्यांमधील वाद मिटवावेत आणि समाजात एकोपा निर्माण व्हावा आणि एकमेकांमध्ये शांतता व सलोखा वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सलोखा योजना आणली आहे
विभागमहसूल व वन विभाग
श्रेणीराज्य सरकारी योजना
वर्ष2023
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन (तलाठी यांचेकडे)
लाभया योजनेचे शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ आहेत, या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा हक्क मिळेल

पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...