रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

(BSF) सीमा सुरक्षा दलात 1524 जागांसाठी भरती

 Total: 26 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)18
2कॉन्स्टेबल (केनेलमन)08
Total26

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स   (iii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव.

शारीरिक पात्रता:

उंची/छातीपुरुष महिला 
उंची165 से.मी. 150 से.मी.
छाती 76-81 से.मी.

वयाची अट: 20 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत



Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023  06 मार्च 2023

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

PM kisan 13th installment चे वितरण 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे

 PM kisan 13th installment चे वितरण 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे.


देशातील गोर गरीब शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये अर्थ सहहाय देणारी एक महत्वाची योजना. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना २००० रुपयांच्या हप्त्याचा लाभ देत असतात अनेक बोगस लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.


या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या १3 व्या हप्त्याच वितरण 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

याच बरोबर अनेक शेतकऱ्यांची बँक खाती चुकीची जोडली गेलेली आहेत, राज्यात काही बँकांचे विलीनीकरण किंव्हा ईतर कारणाने IFSC code बदलले आहेत, परिणामी या शेतकऱ्यांना किसान निधी योजनेचा लाभ ही मिळत नाही. त्यांचे हप्ते त्यांच्या खात्यात जमा होत नाहियाच बरोबर केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेंतर्गत सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा करन्यात येणार आहेत.

यासाठी सर्व लाभार्थ्यांनी बँक खाती तात्काळ आधार संलग्न करावेत, असे निर्देश राज्याच्या कृषि आयुक्तांनी दिलेले आहेत.

याच बरोबर ज्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक नसल्यास अशा या योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२२ नंतरचे हप्ते अदा होणार नाहीत.

त्यामुळे राज्यात एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने राज्यात शिबिराचे (कॅम्प) आयोजन करुन प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक करण्याचे काम अशा सूचना ही सबंधित यंत्रणांना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या.

PM किसान E kyc खालील लिक वर जा

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

 तुमच्या PM किसा खात्या विषयी माहितीसाठी खालील लिंकवर जा 

https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx

सुलाई शासकीय योजना व नोकरीं विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 


   https://chat.whatsapp.com/FRxJeOEEy3r2bCSCHDiI5R 





बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

वारसाची नोंद, ई – करार नोंदणी, बोजा चढविणे, बोजा कमी करणे, मयताचे नाव कमी करणे आदी ७/१२ दुरुस्ती कामे आता सेतू वरून करून शकतात


खालील कामासाठी महा सेतू वरून अर्ज सादर करता येणार 

.                                



 १) वारसाची नोंद करणे

२) ई – करार नोंदणी. 

३) बोजा चढविणे.                                       

४) बोजा कमी करणे. 

५) मयताचे नाव कमी करणे.                          

६) अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे. 

७) एकत्र कुटुंब कर्ताची नोंद कमी करणे.         

८) विश्वस्तांचे नाव बदलणे 

९) संगणीकृत सात बारा मधील चूक दुरुस्ती करणे.


जाणून घ्या फेरफार म्हणजे काय

जमिनीच्या कामकाजात आपण किती वेळा फेरफार हा शब्द ऐकल असेल. पण बऱ्याच जणांना फेरफार म्हणजे काय किंवा त्याची नोंद कशी करावी या बद्दल माहीत नसण्याची शक्यता असते.

फेरफार म्हणजे गाव नमूना नंबर ६ मधील नोंदवाही ज्याला हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही पण म्हणतात.

या नोंदवाहित जमिनीचे सर्व व्यवहार होतात. हे सर्व व्यवहार ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच तलाठी कार्यालयात जावून होत असत. पण आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

ई- फेरफार प्रणालीद्वारे कोणते काम होणार.

ई- फेरफार प्रणालीमधून केलेल अर्ज तलाठयांना फेरफारमध्ये रूपांतरित करता येणार आहे. त्यामुळे तलाठयांना पुन्हा डाटा एंट्री करायची गरज पडणार नाही त्यामुळे त्यांचे काम खूप सोपे होणार आहे. 

फेरफारची नोंदणी कोण मंजूर करतात असा प्रश्न पडतो. काही जणांना असेही वाटत असेल कि फेरफाराची मंजुरू तलाठी करत असावेत पण असे होत नाही.

तलाठयाकडून फक्त फेरफाराची नोंदणी केली जाते. नोंदणी मंजूर करण्याचे काम मंडळ अधिकारी किंवा सर्कल भाऊसाहेब प्रणालीत करत असतात. सध्या तरी अशीच पद्धत आहे भविष्यामध्ये यामध्ये बदलही होऊ शकतो.

फेरफार कसा नोंदविला जातो

फेरफार नोंदणीसाठी चार स्तंभ आखले जातात. 

  • पहिल्या स्तंभात फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहिला जातो. 
  • दुसऱ्या स्तंभात हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकारचे स्वरूप लिहिले जाते. तचेच यामध्ये व्यवहाराचे स्वरूप, संबंधित खतेदारचे नाव, व्यवहाराचा दिनांक, मोबदला रक्कम अशा बाबींचा पण समावेश असतो. 
  • तिसऱ्या स्तंभात जमिनीच्या व्यवहारासाठी लागणारे गट नंबर किंवा सर्वे नंबर लिहिला जातो. 

चौथा स्तंभात फेरफारबद्दल संबंधीतांना नोटिस देवून, चौकशी करून केलेला फेरफार बरोबर आहे का याची खात्री केले जाते. संबंधित अधिकाऱ्यांचा आदेश या मध्ये देवून पदनाम लिहून स्वाक्षरी करतात.  

सुलाई शासकीय योजना व नोकरीं विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 


रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

PMFME अंतर्गत खाद्यपदार्थ प्रक्रिया(Food Processing) अंतर्गत उद्योग योजना 👇*

*PMFME अंतर्गत खाद्यपदार्थ प्रक्रिया(Food Processing) अंतर्गत उद्योग योजना 👇*



1) बेकरी उद्योग

2) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग 

3) बिस्किट निर्मिती उद्योग 

4) पोहा निर्मिती उद्योग 

5) काजू प्रक्रिया उद्योग 

6) ब्रेड/टोस्ट निर्मिती उद्योग 

7) केक निर्मिती उद्योग 

8) चॉकलेट  निर्मिती उद्योग 

9) कोकोनट मिल्क प

वडर निर्मिती उद्योग 

10) कस्टर्ड पावडर निर्मिती उद्योग 

11) दलीया निर्मिती उद्योग 

12) डाळमिल 

13) एनर्जी ड्रिंक निर्मिती उद्योग 

14) पिठाची गिरणी 

15) फ्रेंच फ्राय निर्मिती उद्योग 

16) फ्रुट ज्युस  निर्मिती उद्योग 

17) अद्रक - लसुण पेस्ट निर्मिती उद्योग 

18) ग्रेप वाईन निर्मिती उद्योग 

19) शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी तेल निर्मिती उद्योग (तेलघाना लाकडी/यांत्रिक)

20) हिंग निर्मिती उद्योग 

21) मध  निर्मिती उद्योग 

22) बर्फाचे तुकडे निर्मिती उद्योग 

23) आइस क्रिम कोन निर्मिती उद्योग 

24) आयोडिनयुक्त मिठ निर्मिती उद्योग 

25) जैम व जेली निर्मिती उद्योग 

26) लिंबू शरबत निर्मिती उद्योग 

27) नुडल्स/शेवई निर्मिती उद्योग 

28) सीलबंद पाणि उद्योग 

29) पाम तेल निर्मिती उद्योग

30) पनीर/चिज निर्मिती उद्योग 

31) पापड निर्मिती उद्योग 

32) पास्ता निर्मिती उद्योग 

33) लोणचे निर्मिती उद्योग 

34) आलू चिप्स निर्मिती उद्योग  

35) राईस ब्रान तेल निर्मिती उद्योग 

36) सुगंधित सुपारी निर्मिती उद्योग 

37) सोया चन्क निर्मिती उद्योग 

38) सोया सॉस निर्मिती उद्योग 

39) हळद / मसाले निर्मिती उद्योग 

40) शुगर कँडी निर्मिती उद्योग 

41) सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे निर्मिती उद्योग 

42) इम्लीपल्प निर्मिती उद्योग 

43) टोमैटो प्रोसेसिंग उद्योग 

44) चेरी(टूटी फृटी)निर्मिती उद्योग 

45) विनेगर निर्मिती उद्योग


*सदर उद्योगांकरिता 35% अनुदान उपलब्ध आहे.*


इच्छुक लाभार्थी यांनी आपआपली आवश्यक  कागदपत्रे खाली दर्शवलेल्या संसाधन व्यक्ती यांच्याकडे जमा करावी. 

तुमचा बँकेचा प्रस्ताव संबंधित संसाधन व्यक्ती तयार करतील. 

तसेच उद्योग स्थापनेबाबत मार्गदर्शन करतील. 

उद्योग स्थापन झाल्यावर अनुदान प्रस्ताव तयार करून अनुदान तुमच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया करतील.


*जर वरील यादी पैकी कोणताही उद्योग आधीच अस्तित्वात व वापरात असेल तर, त्या उद्योगाचे  विस्तारीकरण करण्यासाठी अर्ज करता येईल व विस्तारीकरण पूर्ण केल्यानंतर अनुदान सुध्दा भेटेल.*


*लाभार्थी :-* 

1) वैयक्तिक लाभार्थी

(शेतीची अट नाही)

2) गट लाभार्थी

(महिला व पुरूष गट)

3) शेतकरी उत्पादक कंपनी (FPO)

4) भागीदार संस्था


*आवश्यक कागदपत्रे*


1) PAN Card

2) आधार कार्ड 

3) लाइट बिल 

4) बँक स्टेटमेंट 

5) मशिनरी कोटेशन (आवश्यक असल्यास)


अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्रे आपल्या कृषी सहाय्यक साहेबांकडे द्यावे.


👉 अधिक माहितीसाठी संपर्क: 👈


🏛️ कृषि विज्ञान केंद्र, बारामती 🏛️


☎️ श्री.समाधान पानसरे: +91 97309 54897


☎️ श्री. अमोल पानसरे: +91 77749 45988



बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

कुसुम योजना

https://kusum.mahaurja.com/maintenancework/ 
 कुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे.

या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

  • सरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल
  • ३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
  • शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.

या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करू शकतो.

  • अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार
  • बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
  • ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
  • २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५  HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.

महत्वाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रेशन कार्ड
  • नोंदणी प्रत
  • प्राधिकरण पत्र
  • जमीन प्रत
  • चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते विवरण

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

या शेतकऱ्यांना PM किसान 13 हप्ता जमा होणार नाही

 पी एम किसान ई केवयसी करूनही जर आता जमा होत नसेल तर शेतकऱ्यांनी मग  बँक केवायसी बाकी असेल ती करून घ्यावी



 
सुलाई शासकीय योजनांचे व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचा 13 वा हफ्ता 15 फेब्रुवारी 2023

 मित्रांनो नमस्कार 



प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचा 13 वा हफ्ता *15 फेब्रुवारी 2023*  रोजी  लाभार्त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. *कृषि आणि किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली* मार्फत मिळालेल्या माहितीनुसार भारतातील 1.46 करोड तसेच महाराष्ट्रातील 14,08,401 लाभार्त्यांना आधार seeded बँक अकाउंट नसल्याने प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचा लाभ मिळत नाही आहे. यात आपल्या नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील बऱ्याच लाभार्त्यांचा समावेश आहे. आपल्याला सदर लाभार्त्यांचे खाते *10 फेब्रुवारी 2023* पर्यंत उघडण्याचे काम सोपविण्यात आले आहे जेणेकरून 15 फेब्रुवारी 2023 च्या आत सर्व खातेदारांचे आधार seeding पूर्ण होईल व सदर खातेदारांच्या IPPB खात्यात प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचे प्रत्येकी 2000 रुपये जमा होतील.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचे अंतर्गत IPPB अकाउंट उघडण्यासाठी special mandate तयार करण्यात आले आहे. 

1. PM KISAN Premium  

आपल्या अंतर्गत असलेल्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधि लाभार्त्यांची यादी आपल्या सर्वांना लवकरच देण्यात येईल. सदर यादीमध्ये *लाभार्त्यांचे नाव, गावाचे नाव आणि मोबाईल नंबर* दिलेले आहेत. सर्वांना विनंती आहे कि यादीमध्ये नाव असलेल्या लाभार्त्यांना लवकरात लवकर संपर्क करून त्यांचे IPPB अकाउंट  काढून घ्यावे. सदर IPPB अकाउंट *दिलेल्या mandate मध्येच* आणि *आधार seeding करूनच* उघडावेत व सदर योजनेचा लाभ न घेऊ शकणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांचा प्रधानमंत्री किसान सम्मान निधि मिळवून देण्यात मदत करावी. धन्यवाद.


डाक निरीक्षक

नंदुरबार सब डिव्हिजन

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

सौर कृषी पंप योजनेचा धुळे जिल्हाचा कोटा पूर्ण झाला आहे, फेक साईट वर फॉर्म भरू नये व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी किंवा मंजुरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये

धुळे जिल्ह्याचा कुसुमचा कोठा हा पूर्ण झाला आहे

 प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावाखाली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फोन कॉल द्वारे किंवा फेक मोबाईल एप्लीकेशन द्वारे व फेक साईट द्वारे पैसे जमा करण्याचे संदेश किंवा ऑनलाईन पेमेंट चे ऑप्शन शेतकऱ्यांची लूट होत आहे तरी शेतकऱ्यांनी सावधान राहावे धुळे जिल्ह्याचा कुसुमचा कोठा हा पूर्ण झाला आहे याची शेतकऱ्यानी नोद घ्यावी 

 प्रधानमंत्री कुसुम योजनेची लिंक 

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B



महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना

अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरु नयेत. तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषिपंपाकरीता अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.

तसेच असे निदर्शनास आले आहे की उपरोक्त योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषिपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषिपंप महाकृषि ऊर्जा अभियन पीएम- कुसुम घटक-ब योजने अंतर्गत आस्थापित करुन घेतात. अशी बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषिपंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिस्सा रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध FIR करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

आदेशानुसार



सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक

https://chat.whatsapp.com/L2Ucb7TRzNJ6gNWb6AmEx6


मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

ग्रामपंचायतीची घरपट्टी पानपट्टी घराचा उतारा जन्म व मृत्यू नोंद विवाह नोंद सर्व काही एकाच मोबाईल ॲप वर

 🔗🔗🔗🔗🔗 महाईग्राम अॅप  लिंक - 




https://play.google.com/store/apps/details?id=com.gov2egov.citizenforum

वरील-  लिंक वरुन MAHAEGRAM CITIZEN CONNECT अॅप Download करून घ्यावे.


- आपल्या मोबाईलमध्ये MAHAEGRAM CITIZEN CONNECT अॅप install करावे. 


- त्यानंतर रजिस्टर वर क्लिक करुन मोबाईल नंबर नोंद करा. 


- आपणास आपला आयडी व पासवर्ड आपल्या मोबाईलवर मेसेज द्वारे मिळतील.


-आपल्याला मेसेज द्वारे मिळालेल्या युजर व पासवर्डने लॉगीन करता येईल.


- आपण आपली ग्रामपंचायत निवडावी आणी    आपल्या ग्रामपंचायतची सर्व माहिती पहा. 


- या अॅप मधुन आपण आपल्या मिळकतीचा  नमूना नंबर 8 साठी अर्ज करु शकता, ग्रामपंचायत च्या कराची थकबाकी online payment gateway च्या माध्यमातून भरू शकतो.


- तसेच ग्रामपंचायत स्तरावरील (जन्म, मृत्यु, विवाह नोंदणी झालेले) प्रमाणपत्रांसाठी अर्ज करू शकता. 

MAHAEGRAM CITIZEN CONNECT अॅप  Installation करून सेवांचा लाभ घ्यावा.

धन्यवाद 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक

https://chat.whatsapp.com/L2Ucb7TRzNJ6gNWb6AmEx6

जुने नवे सर्व मतदान डिजिटल बारकोडवाले तयार करून मिळतील

 जुने नवे सर्व मतदान डिजिटल बारकोडवाले तयार करून मिळतील 



नवीन मतदान यादी नाव टाकण्यासाठी 
१)आधार कार्ड 
२)रेशनकार्ड 
३)फोटो व मोबाईल नंबर

डीजीटल मतदान कार्ड तयार करण्यासाठी 
मतदान यादीतील मतदार क्रमाक व मोबाईल नंबर 


मतदान कार्ड दुरूस्ती नाव, पत्ता, फोटो, मोबाईल नंबर 
 
१)आधार कार्ड 
२)रेशनकार्ड 
३)फोटो व मोबाईल नंबर

मतदान कार्ड आधार कार्ड लिंक  तयार करण्यासाठी 
१) आधार कार्ड 
२) मतदान कार्ड 
३) मोबाईल नबर 
मतदान कार्ड सर्व नवीन व दुरूस्ती साठी ओंफीस साईट वर भेट द्या 
                   https://www.nvsp.in/

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

लवकरच OBC क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना

ओबीसींसाठी घरांची नवी योजना आणणार ,   ओबीसींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना राबवण्यात येणार, आता  ओबीसींना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देणार 

 सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक

शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

बांधकाम कामगार पेटी चे फॉर्म भरणे सुरू आहे


आवश्यक कागदपत्रे 

आवश्यक कागदपत्रे 

1 आधार कार्ड 

2 बँक पासबुक

3 रेशन कार्ड 

4 वारस चे आधार कार्ड 

5 पासपोर्ट साइज फोटो 

फॉर्म भरण्याची फी 300 


बांधकाम कामगार योजना फायदे

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सहाय्य, आरोग्यविषयक सहाय्य, आर्थिक सहाय्य बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिली जाते. ते आपण सविस्तरपणे पाहू.

सामाजिक सुरक्षा

  • नोंदणीकृत लाभार्थ्याला स्वताच्या विवाहाच्या खर्चासाठी ३०,०००/- रुपये अनुदान म्हणून दिले जाते. त्यासाठी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नोंदणीकृत लाभार्थी कामगाराला मोफत मध्यान्ह जेवण सुविधा या योजनेअंतर्गत दिली जाते.
  • तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा बांधकाम कामगारांना लाभ दिला जातो.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदीत पात्र असलेल्या बांधकाम कामगारांना उपयुक्त असलेली अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला ५००/- रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते. त्यासाठी अवजारे खरेदी करणार असल्याचे हमीपत्र देणे गरजेचे आहे.
  • नोंदणीकृत कामगार लाभार्थ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातात.
  • तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत देखील या कामगारांना लाभ दिले जातात.
  • पात्र कामगारांना पूर्व शिक्षण आणि आवश्यक ते प्रशिक्षण या योजनेअंतर्गत मोफत दिले जाते.
  • सुरक्षा संच कामगारांना पुरवले जातात.
  • दिनांक ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी केलेल्या जीवित असलेल्या बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रति कामगार ३०,०००/- आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.

शैक्षणिक सहाय्य

  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या पणिल्या २ मुलांना पहिली ते सातवी मध्ये किमान ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असले, तर २,५००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी ७५ टक्के हजेरी बाबतचा दाखला देणे गरजेचे आहे.
  • नोंदणी केलेल्या दोन मुलांना इयत्ता आठवी ते दहावी मध्ये ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असले, तर रुपये ५००/- प्रतिवर्षी प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात.
  • नोंदणीकृत लाभार्थ्याच्या दोन मुलांना इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये कमीत कमी ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये १०,०००/- शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असल्याचे गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे.
  • कामगाराच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगार यांच्या पत्नीला पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्री साठी प्रतिवर्षी २०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून दिले जातत. त्यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा गुणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या ची पावती किंवा बोनाफाईड सादर करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थ्याच्या दोन पाल्यांना किंवा पत्नीला वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेत प्रवेश घेण्यासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक शेक्षणिक वर्षी पदवी अभ्यासक्रमासाठी रुपये १ लाख व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी रुपये ६०,०००/- शैक्षणिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या बाबतची पावती सादर करणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना शासनमान्य पदवीके मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलास प्रति शैक्षणिक वर्षी २०,०००/- रुपये आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास प्रति शैक्षणिक वर्षी २५,०००/- रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातत.
  • कामगाराच्या दोन मुलांना संगणकाचे शिक्षण एमएस-सीआयटी घेत असलेल्या नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शुल्काची परिपूर्ती, तसेच एमएस-सीआयटी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्याच्या फी शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाईल.
  • पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप या योजनेअंतर्गत केले जाईल.

आरोग्य विषयक साहाय्य

  • नोंदणीकृत स्त्री बांधकाम कामगार असो किंवा पुरुष बांधकाम कामगार पत्नीला नैसर्गिक प्रसुतीसाठी १५,०००/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २०,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचे प्रमाण पत्र आणि उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
  • जर कामगार लाभार्थ्याच्या कुटुंबीयांना गंभीर आजार झाले, तर त्याच्या उपचारासाठी १ लाख रुपये वैद्यकीय सहाय्य एकाच सदस्यास एकाच वेळी कुटुंबातील २ सदस्य पर्यंत मर्यादित डे आहे. तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने गंभीर आजाराबाबत दिलेले प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार कागदपत्रे.
  • कामगाराच्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली, तर त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १ लाख रुपये मुदत बंद ठेव लाभ दिला जाईल. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया बाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदार कामगाराला एक पेक्षा अधिक मुली नाहीत याचा पुरावा आणि शपथपत्र.
  • नोंदणी केलेल्या कामगाराला ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याला २ लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
  • जर बांधकाम कामगारांचे विमासंरक्षण असेल, तर विमा रकमेची परिपूर्ती किंवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जातो. त्यासाठी ७५ टक्के अपंगत्व असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍याकडे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा देखील लाभ घेता येणार आहे. कामगारांची वेळोवेळी तपासणी केली जाईल. त्यासाठी शासकीय केंद्रातून ऊपचार घेतल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

आर्थिक सहाय्य

  • नोंदणी केलेल्या लाभार्थ्याच्या कामावर असताना मृत्यू झाला, तर त्याच्या वारसाला ५ लाख रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला किंवा कामावर असताना मृत्यू झाला आहे असा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
  • नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर त्याच्या वारसाला २ लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.
  • नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराला अटल बांधकाम कामगार आवास शहरी योजने अंतर्गत २ लाख रुपयांची आर्थिक सहाय्य केले जाते. त्यासाठी तो कामगार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहे याचे सक्षम अधिकार्‍याचे पत्र देणे आवश्यक आहे.
  • घर बांधण्यासाठी ४.५ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते. त्यामध्ये केंद्र शासनाकडून २ लाख रुपये आणि कल्याणकारी मंडळाकडून २.५ लाख रुपये दिले जातात.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थ्याला लाभार्थी कामगाराचा जर मृत्यू झाला, तर त्याच्या नामनिर्देशित वारसाला १०,०००/- रुपये त्याच्या अंत्यविधीसाठी मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले मृत्युपत्र आवश्यक आहे.
  • कामगाराचा मृत्यू झाला, तर त्याच्या विधवा पत्नीला अथवा स्त्री कामगाराचा निधन झाले तर विधुर पतीला पाच वर्षापर्यंत प्रतिवर्षी २४,०००/- रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला गरजेचा आहे.
  • घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या होम लोन वरील व्याजाची रक्कम दहा लाख किंवा दोन लाख अनुदान स्वरूपात दिली जाते. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतले चा पुरावा किंवा कर्ज किंवा घर पती-पत्नीचा संयुक्त नावे असल्याचा पुरावा गरजेचा आहे.
  • महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांकरिता व्यसनमुक्ती केंद्र उपचाराकरिता नोंदीत कामगारास रुपये ६,०००/- आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातत.

पोस्ट ऑफिस भरती 40,000 पेक्षा अधिक जागांसाठी भरती 10 वी च्या टक्केवारीवर निवड कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही


पोस्ट ऑफिस भरती विषयी अधिकाअधिक गरजू मुलामुलीन पर्यत पोहचवा ग्रामीण भागात सरकारी नोकरी आहे 
 ज्या १० वी मध्ये ८० पेक्षा जास्त टके असलेल्या विद्यार्थी निवड होऊ शकते 

 🙋‍♂️ एकुण जागा: 40889 जागा 

💁‍♂️ पदाचा तपशील : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak)

1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर GDS (BPM)

2) GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

3) GDS डाक सेवकवेतन पगार : 10,000 ते 29,380


🧑‍🎓 शिक्षण पात्रता : 10 वी पास व मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

Post Office Bharti 2023 Age Limit 

🧔 वयोमर्यादा : 

16 फेब्रुवारी 2023 18 ते 40 [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक

https://chat.whatsapp.com/L2Ucb7TRzNJ6gNWb6AmEx6



🏢 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 

Post Office Bharti 2023 Required Document List 

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : 
1) आधार कार्ड (Aadhar card 
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर 
5) 10 वी चे मार्कशीट
6) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

💁‍♂️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना : 

1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.

2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.

3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.

4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.

5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.


पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...