केंद्र सरकार आणि राज्य शासन देशातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवित असतात.या योजनांपैकीच एक योजना म्हणजे महाज्योती फ्री टॅबलेट योजना जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्थेसोबत मिळून इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची योजना सुरु केली आहे.
MH-CET / IEL / NEET या परीक्षांच्या २०२३ पूर्व तयारीसाठी इमाव (OBC), वी जा भ ज (VJNT), वि मा प्र (SBC) या प्रवर्गामधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
१०वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर, मेडिकलसाठी तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नसते अशा विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेने ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षण उपक्रम सुरु केला आहे.
जर तुम्हाला फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घायचा असेल तर शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करायची सर्व पद्धत आम्ही खाली दिलेली आहे
आम्ही आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे आपण हा लेख जरूर वाचावा व या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा
विशेष सूचना: आम्ही महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी विद्यार्थी असतील जे महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण महाज्योती फ्री टॅबलेट योजना काय आहे, Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra, महाज्योती फ्री टॅबलेट योजना ऑनलाईन अर्ज, महाज्योती फ्री टॅबलेट योजना फायदे, महाज्योती फ्री टॅबलेट योजना वैशिष्ट्य काय आहेत, महाज्योती फ्री टॅबलेट योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र लाभ घेण्यासाठी किती टक्के गुणांची आवश्यकता आहे, फ्री टॅबलेट योजना कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे, फ्री टॅबलेट योजनेसाठी पात्रता काय आहे, फ्री टॅबलेट योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत,संपर्क क्रमांक, फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करायची पद्धत, फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
| योजनेचे नाव | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra |
| विभाग | शिक्षण विभाग |
| राज्य | महाराष्ट्र |
| योजना कोणी सुरु केली | महाज्योती संस्था |
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी |
| लाभ | अभ्यासक्रमासाठी मोफत टॅबलेट वितरण |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र उद्देश
Mahajyoti Free Tablet Yojana Purpose
- महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांनी इयत्ता ११वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे त्यांना ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.जेणेकरून विद्यार्थी घरी बसून स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
- राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील विद्यार्थ्यांचे महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या सहाय्याने जीवनमान सुधारणे.
- विद्यार्थ्यांना डिजिटल युगासोबत जोडणे.
- महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे.
- राज्यात डिजिटली शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे
- विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षा पूर्ण करता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये
Maharashtra Free Tablet Yojana Features
- या योजनेअंतर्गत १० वी पास झालेले विद्यार्थी ज्यांनी ११ वी सायन्स ला प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येते आहेत तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी दररोज ६ GB इंटरनेट सुविधा आणि उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके देण्यात येत आहेत.
- या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या टॅबलेट साठी विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत टॅबलेट चा लाभ दिला जातो.
- महाज्योति फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनद्वारे करण्यात आली आहे.
- राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली महाज्योती फ्री टॅबलेट योजना एक अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त अशी योजना आहे.
- महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यात 30 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप करण्याचा उद्देश्य निर्धारित करण्यात आलेला आहे.
- महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींना देखील लाभ दिला जाणार आहे.
- राज्यातील विद्यार्थ्याने शैक्षणिक भविष्य सुधारण्यासाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत मिळालेल्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थ्यांना देशातील विविध घडामोडींची माहिती मिळेल व त्यांचा सर्वांगीण विकास होईल.
महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे लाभार्थी
Mahajyoti Free Tablet Yojana Beneficiary
महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत.
महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक गुण
| इयत्ता १०वी | शहरी भागातील विद्यार्थी | ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. |
| इयत्ता १०वी | ग्रामीण भागातील विद्यार्थी | ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. |
महाज्योती फ्री टॅबलेट योजना फायदे
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज ६ GB इंटरनेट सेवा मोफत दिली जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके दिली जाणार आहेत.
- पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत JEE, NEET आणि CET ऑनलाईन कोचिंग क्लासेस ची मोफत सुविधा दिली जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट चा वापर करून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
- टॅबलेट च्या साहाय्याने विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसेच आपल्या शिक्षकांसोबत अभ्यासासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतील.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी विविध प्रकारचे ऑनलाईन शिक्षण व कोर्से पूर्ण करू शकतील.
- महाज्योती फ्री टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटली दुनियेत एक पाऊल पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- महाज्योती फ्री टॅबलेट च्या अंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी शिक्षणासाठी उपयुक्त पुस्तके डाउनलोड करून अभ्यास करू शकतील.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःची इतर कामे सुद्धा करू शकतील
महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र आवश्यक पात्रता
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी इयत्ता १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या अटी
- महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी मध्ये सायन्स ला प्रवेश घेतलेला असावा.
- शहरी भागातील विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
- ग्रामीण भागातील विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
- अर्जदार विद्यार्थ्यांने जर शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत टॅबलेट चा लाभ मिळवला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील सरकारी नोकरीत कार्यरत असतील तर अशा विद्यार्थाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- OBC (इ मा व)
- VJNT (वि जा भ ज)
- SBC (वि मा प्र)
महाज्योती फ्री टॅबलेट योजना कागदपत्रे
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा.
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- घरपट्टी
- विज बिल
- दहावी उत्तीर्ण मार्कशीट (ग्रामीण भागात ६० टक्के / शहरी भागात ७० टक्के)
- विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
- विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र.
- नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट
- विद्यार्थ्याने अकरावी मध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्याची पावती / पुरावा.
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- ई-मेल
- मोबाईल क्रमांक



.jpeg)


.jpeg)
.jpeg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpg)
.jpeg)




